लग्न कुंडलीत लग्नी उचीचा गुरू, चतुर्थात चंद्र हर्षल अंशात्मक युती, पंचमात नेपच्यून, लाभेश लाभात दशमात स्वराशीचा मंगळ कुलदीपक योग स्वराशीचा बुध व्यायात
शनी राहू बंधन योग.
आता केपी कुंडली चा विचार करू
जितकी सध्या लग्न कुंडलीत पत्रिका अनुकूल दिसत होती ती तितकीच केपी कुंडलीत प्रतिकूल दिसते कशी तर प्रथमिक शिक्षण चतुर्थावरून बघतात केपी पद्धतीत चतुर्थाचा सब शुक्र 2,4,10,11 दाखवतो म्हणजे याचे शिक्षण होण्यास अनुकूलता दिसते.
मात्र जन्मतः महादशा गुरुची(1,6,7,8,9,12) महादशा ना 4थे स्थान ऑपरेट करते ना लाभ स्थान उलट पक्षी सगळे विरोधी भाव(8,12) ऍक्टिव्ह झालेत म्हणून मुलगा पहिल्यापासूनच शिक्षणाविषयी उदासीन असावा शिवाय गुरू च्या महादशेत आजारपणही आले असण्याची विशेषतः चंद्राच्या अंतर्दशेत जास्त त्रास झाला असावा.
आता ती महादशा वयाच्या 11व्या वर्षी संपली तिथून पुढे शनी ची महादशा शनी (1,4,7,8,10,11) ही स्थाने ऍक्टिव्ह करतो उमलत्या वयात शिक्षणाची गोडी लागली नाही ती शनीच्या महादशेत 4,8 ऍक्टिव्ह झाल्याने व 1,10,11 असल्याने या काळात प्रचंड अंगमेहनतिचे कामे जातकाकडून झाली असावीत ती महादशा 2009 पर्यंत म्हणजेच वयाच्या तिशी आली. शनी 7,11 ऍक्टिव्ह करत होता. पण मूळ कुंडलीतील चंद्र हर्षल युती आणि शनी राहू युती आपला प्रभाव थोडीच सोडणार आहे त्यामुळे ती शनी ची महादशा अनुकूल असून ही विवाह झाला नाही. शनी 4थे स्थान पण दाखवतोय तो कदाचित एका व्यक्तीच्या एकतर्फी प्रेमात ही असू शकतो शनीच्या महादशेत, शाळेतल्या मुलीच्या ही *शक्यता* आहे.
आता शिक्षण आणि विवाह साठी नवमांश कुंडली अभ्यासू शिक्षणासाठी बुध, गुरू तूळ नवमांशी शत्रू नवमांशी त्यामुळे लग्न कुंडलीत उचीचा आणि नवमंशात वायू राशीत असून ही उपयोग झाला नाही.
बुध लग्न कुंडलीत स्वराशीचा व्यायात आणि जल नवमांशत शिक्षणासाठी अनुकूल नाही.
विवाहासाठी गुरू, शुक्र, शनी, मंगळ यांना नवमांशत बळ असेल तर विवाह होईल
गुरू वायू तत्वात शत्रू नवमांशत❌
शुक्र मित्र नवमांशी पृथ्वी तत्वात✅
शनी शत्रू नवमांशी अग्नी तत्वात❌
मंगळ स्वराशीचा पण जल तत्वात❌
चार मुख्य ग्रहांपैकी तीन प्रतिकूल शिवाय नवमांश लग्नात स्वराशीचा केतू आणि सप्तमात स्वराशीचा राहू
विवाह न होण्यास पूरक आहेत.
आता पुढे काय??
बुधाची महादशा (3,5,9,10,11,12) पैकी 3,5,9,12 ही सगळी स्थाने रोजगार अथवा रोजीरोटी न मिळण्यासाठी पूरक आहेत.
येणाऱ्या अंतर्दशा ही तशाच आहेत , पण त्यातून मार्ग आहे तो म्हणजे ही धार्मिक स्थळी, तीर्थक्षेत्री शिक्षण संस्थेत शिपाई म्हणून कार्यरत राहू शकते त्या ठिकाणी स्थैर्य असू शकेल.
मी मला जितकं दिसलं तितकं सांगितलं आपण माझ्या पेक्षा वयाने,अनुभवाने मोठ्या आहात.
No comments:
Post a Comment