बऱ्याच दिवसांनी काही तरी डोक्याला खाद्य मिळालं म्हणून हा ब्लॉग लिहित आहे. आणि कृष्णमूर्ती पद्धत नाही तुम्हाला आम्हाला कुठल्याही साध्या ज्योतिष अभ्यासकाला कळेल अशी पारंपरिक पद्धतीने जाऊ... घरच्या गणपती प्रतिष्ठापनेसाठी चिंचवड ला गेलो होतो कित्येक वर्षे आमचा घरचा गणपती चिंचवड ला काकांकडे बसतो. प्रतिष्ठापना झाली, आरती झाली, दुपारचे जेवण झाल्यावर वामकुक्षीला वळणार तेवढ्यात माझी काकू "हर्ष्या, तुला एक काम आलंय... " मी म्हटलं काय झालं? तेवढ्यात शेजारच्या काकू घरात आल्या गणेशाचं दर्शन घेतलं. आरासाच कौतुक वगैरे एक दोन मिनिटं चाललं आणि त्यांनी ही⬇️
कुंडली पुढ्यात टाकली आणि मुद्द्याला हात घालत म्हणाल्या "ही माझ्या मुलीची पत्रिका आहे, बरेच प्रयत्न करून ही संतती राहत नाही.."
दीर्घ उसासा सोडला आणि डोकं खुपसलं कुंडलीत वर वर पत्रिका खूप मोठ्या व्यक्ती ची वाटेल कारण पत्रिकेत शनी उच्च, चंद्र उच्च, गुरू स्वराशीचा नेपच्यून, मंगळ युक्त...
आता संतती साठी काय अडचणी आहेत म्हणून बघूया..
संतती व्हायला आधी विवाह तर झाला पाहिजे.. तो टिकला पाहिजे.. नवरा बायकोत शारीरिक आकर्षण निर्माण झालं पाहिजे हे सगळं होईल तेव्हा संतती होईल ना???
वैवाहिक सौख्य आधी बघू मग संतती..
विवाह सप्तम स्थानावरून बघणार.. मुलीचं सप्तम स्थान कोरं करकरीत आहे कोणीच नाही तिथं.. मग दृष्टी कोणाकोणाची आहे?? तर सरळ सरळ समोरून शनी, बुध, आणि प्लूटो ची दृष्टी आहे तृतीय स्थानातून गुरू ची पाचवी दृष्टी आहे.. ठोकताळे काय काय होऊ शकतात?? शनी विलंब करेल बुध नवरा बायकोत वयाचं अंतर कमी ठेवेल आणि खरा अडचणींचा भाग प्लूटो ची दृष्टी हा आहे...
प्लूटो चा कसाही सप्तम स्थान ,सप्तमेश यांच्याशी संबंध आला तर वैवाहीक सौख्य देत नाही.. (ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ...) त्याला जर 6,8,12 या स्थानांच्या दशेची जोड मिळाली तर आगीत तेल...
आता सप्तमेश मंगळ तर गुरू नेपच्यून च्या युतीत आहे तृतीय स्थानात. गुरू सारखा असता पाठीराखा.. साक्षात गुरू सप्तमेशच्या पाठीशी आहे म्हटल्यावर कितीही अडचणी आल्यातरी मुलीचा विवाह होणार म्हणजे होणारच.. टिकेल का ? हा नंतरचा प्रश्न.. साक्षात गुरू महाराज सप्तमेशच्या पाठीशी असूनही या मुलीचे दोन विवाह झाले? Why???
सगळं चांगलं आहे हो पण काय आहे स्वतः शनी महाराजांनी सप्तम स्थान आपल्या करड्या नजरेत ठेवलंय आणि शनी महाराज तिथं थांबले नाहीत त्यांनी सप्तमेश मंगळावर पण तिसरी ही अतिकृर दृष्टी ठेवली आहे.. अकेला गुरू क्या करेगा?? सप्तमावर गुरू शनीची संयुक्त दृष्टी आहे.. शनी सुखी राहू देत नाही गुरू संसारातून बाहेर पडू देत नाही.. दशेत सप्तम स्थान ऍक्टिव्ह आहे.. त्यामुळे जोडीदार असणार नाही असं शक्यच नाही.. अश्या सगळ्या कात्रीत सापडलेल्या या मुलीचे वैवाहिक जीवन आहे.. एवढं करूनही गुरू शनी या मुलीची परीक्षा घेणं थांबवत नाहीत.. शनी महाराज जसे सप्तमेश मंगळावर दृष्टी ठेऊन आहेत तसेच ते गुरू आणि नेपच्यून वर पण नजर ठेवून आहेत... गुरू अध्यात्माचा कारक त्याला खेटायला नेपच्यून सारखा उच्च अध्यात्मिक अनुभूती देणारा ग्रह.. याला शनी महाराजांसारख्या वैरागी शनी ची दृष्टी....
"आमची मुलगी फार देवाचं करते हो.. प्रदोष कर, पारायण कर, गुरूचरित्र वाच 😱😱, अजून चार पोथ्या वाच.. तरी तिच्या नशिबी असं का?" - मुलीची आई
काकू एवढं सगळं बघितल्यावर एकच सांगतो पत्रिका वैवाहिक सुखाला चांगली नाही... - मी
हा हे बरोबर आहे, आमच्या गावाकडच्या एका माणसानं हे सांगितलं होतं - मुलीची आई
काकू ते संतती चा प्रश्न बघायचा म्हणजे मुलगा मुलगी दोघांची पत्रिका बघावी लागेल ना एकटाच थोडी संतती जन्माला घालतो...
या मुलीच्या पतीराजांची कुंडली मिळेल का? फार काही नाही फक्त जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण एवढ्या तीनच गोष्टी लागतील... - मी
आता नाही माझ्याकडे, पण मी घेऊन ठेवते.. - मुलीची आई.
थोडा वेळ विषयांतर झालं.. इकड तिकडच्या गप्पा मारल्या आईसाहेबांना करमेना मुलीचं ऐकून तश्या बेचैन झाल्या होत्या.. थोड्या वेळ त्यांच्या घरी गेल्या आणि ही⬇️
काकू या माणसाची एकूणच लग्न करण्याची, मूल जन्माला घालायची, संसारात रमायची इच्छा कितपत आहे?? - मी
तुम्ही बोलताय ते खरं आहे हे लग्न जेव्हा 2018 ला झालं तेव्हा मुलाच्या घरच्यांनी पाहण्याचा कार्यक्रम ते साखरपुडा आणि लग्न सगळं आठ दिवसात केलं...😱😱 नंतर मुलाच्या घरच्यांनी सांगितलं की आम्ही तेव्हा घाई केली नसती तर या मुलाने संन्यास घेतला असता.... - मुलीची आई..
मुलगा फार गुणाचा आहे, खूप शिकलाय वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी 2024 मध्ये पण उच्च शिक्षण घेतोय, अनेक ग्रंथ पारायण, अमुक तमुक काय काय वाचतो.. अभ्यासू आहे ब्ला ब्ला ब्ला.. - मुलीची आई
काकू पत्रिकेत मुलाच्याही पत्रिकेत वैराग्य योग आहे, गुरू शनी लग्नात आहेत. यांच्या पण पत्रिकेत गुरू,शनी, प्लूटो ची दृष्टी सप्तमावर आणि सप्तमेश मंगळावर आहे. याच्याही पत्रिकेत वैवाहिक सौख्य नाही.- मी
हा बरोबर आहे, या मुलाचं पण हे दुसरं लग्न आहे - मुलीची आई
असो... म्हणून पुन्हा दीर्घ श्वास सोडला आता पुढं...
दोघांच्या पत्रिका पार खोलात जाऊन उकरून काढल्यावर..
आता मूळ संतती प्रश्नाला हात घालू..
मुलीचं पंचम स्थान कोरं आहे, पंचमात कुठलाही पापग्रह नाही.. पंचमावर कुठल्याही पापग्रहाची दृष्टी नाही उलट पक्षी पंचमेश लग्नात आहे..
मुलीचे मेडिकल रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत का? - मी
हो आहेत की दोघांचे मुला - मुलीचे दोघांचे मेडिकल रिपोर्ट नॉर्मल आहेत - मुलीची आई..
मग घोडं अडलंय कुठं?? फिर ऐसा लोचा क्यू हो रेला है??
संतती सौख्य बघताना किंवा एकूणच संतती होईल का यासाठी काही गोष्टी दोघांच्या पत्रिकेत बघाव्याच लागतात..
१.शरीरातील पाणी आणि मेद (गुरू)
२. शरीरातील शुक्राणू कळणाऱ्या मराठीत sperm (शुक्र)
३. एकूणच शारीरिक क्षमता (मंगळ)
वरच्या तीन गोष्टींपैकी किमान दोन गोष्टी ओक्के असतील तर मग
४. दशा आणि गोचर
सदर मुला मुलीच्या पत्रिकेत गुरू आणि मंगळ हे दोन ग्रह शनी महाराजांच्या दृष्टीत येऊन आपल्या चाचणीत फेल झालेत म्हणजे त्यांची फळ देण्याची क्षमता निम्म्यावर अली आहे.. आता दोघांचे शुक्र तपासू..
मुलीचा शुक्र वृश्चिक या जल राशीत आणि कर्क या जल नवमांशात आहे (म्हणूनच मुलीचे मेडिकल रिपोर्ट नॉर्मल आहेत) मुलीचे शुक्राणू ओक्के आहेत असं म्हणू..
आता मुलाचा शुक्र..
मुलाचाही शुक्र वृश्चिक या जल राशीत पण तुळ या वायू नवमंशात आहे.. मुलाचा शुक्र निम्यावर म्हणजे 50% वर आला.. हे मेडिकल रिपोर्ट मध्ये दिसणार नाही...
डॉक्टर मेडिकल रिपोर्ट ओक्केच देणार...
आता दोघांचेही मंगळ, शनी च्या तिसऱ्या क्रूर दृष्टीत आहेत. इसका मतलब ये की, दोघांचीही शारीरिक क्षमता (बेडरूम गाजवण्याची) कमीच आहे...
गुरू, मंगळ, शुक्र तिन्ही ग्रह या ना त्या मार्गाने शनी शी संबंधित आले आहेत...
दोघांनाही देव देव करायची भयंकर आवड आहे.. म्हणूनच वरच्या दोघांची गाठ मारली असं इथं म्हणावं लागेल..
पण मुलीचे आई- वडील सासू सासरे याना नात नातू पाहिजे हो.. त्याचं काय???? मूळ प्रश्न आम्हाला संतती पायजेल...
बाकी काय बो नको..
दोघांच्या वर्षफल कुंडल्या तपासल्या..
मुलगा 42, मुलगी 40 वय असतानाही जानेवारी 2025 नंतर एक नैसर्गिक चान्स (सूज्ञास सांगणे न लगे ) घ्यायला लावला आहे. कारण मुलीची गुरू ची दशा डिसेंम्बर 2024 मध्ये संपते आणि पंचमेश शनी ची दशा सूरु होते. मुलाची लाभेश रवी जो कुटुंब स्थानात बसला आहे त्याची अंतर्दशा सुरू आहे ती एप्रिल 2025 मध्ये संपेल. मुलाला पाचवा गुरु, मुलीला पहिला गुरू म्हणजे संतती साठी दोघाना पूर्ण गुरूबळ आहे.
हे सगळं समोर बसलेला गजानन पाहत होता.. देव करो आणि कर्म फळो...
उपाय:
१. दोघांनाही पोथी पुराण, व्रत वैकल्य पासून थोडा काळ लांब न्या. कारण या साधनेतून जी सात्विक ऊर्जा, तेज निर्माण झाली आहे ती संतती साठी उपयुक्त नाही.
२. मुलाला शारीरिक संबंधांसाठी उद्युक्त करा. तो लाख तत्वज्ञानाच्या गोष्टी सांगेल, मुलीने त्याला कामशास्त्र शिकवलं पाहिजे.
३. डॉक्टरी उपाय, टेस्ट ट्यूब, IVF या इतर मार्गांचा विचार करा.
ज्योतिषांसाठी:
१. विशाखा नक्षत्र हे त्या अर्थाने घातक नक्षत्र आहे. वि- शाखा, शाखा विस्तार न होऊ देणारं. विशाखा नक्षत्रातले ग्रह काळजीपूर्वक तपासा...
२. तुळ लग्न by default संतती होण्यासाठी त्रासदायक आहे कारण या लग्नाचा पंचमेश हाच चतुर्थेश शनी आहे, त्यात शनी विलंब लावतो आणि संतती आणि त्याचे व्यय असे दोन्ही स्थाने या लग्नात शनी एकत्र ऍक्टिव्ह करतो.. (TnC apply)
३. तुळ लग्नाचा लग्नेश शुक्र हाच अष्टमेश आहे. या लग्नाच्या व्यक्तींना फ्रस्ट्रेशन लवकर येऊ शकतं. (TnC apply)
४. गुरू शनी युती, दृष्टी योग हा वैराग्याला पूरक आहे.
शुभं भवतु...🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment