भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सोमवारची सकाळ संस्मरणीय म्हणावी लागेल . ज्या देशात आपण 70 वर्षे दौरे करत आहोत कित्येक भारतीय दिग्गज ऑस्ट्रेलिया च्या भूमीवर खेळले असतील पण या विराट सेनेने भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण पान लिहले. खर तर ऑस्ट्रेलिया काही भारतीय क्रिकेट संघासाठी अनुकूल देश नाही तेथील खेळपट्ट्या, वातावरण सगळंच वेगळं पर्थ चा वेग, एडीलेड, सिडनी ची फिरकी, मेलबर्न ची उसळी सगळंच निराळं. नवीन मैदान, नवीन आव्हान.....
गेली सत्तर वर्ष लाला अमरनाथ, पतौडी, गावसकर, अझरुद्दीन, बिशनसिंग बेदी, गांगुली, धोनी यांनी सर्वांनी मिळून 31 दौरे केले साधारण 98 कसोट्या खेळल्या काही हातावर मोजण्याइतके विजय ही मिळवले पण ऑस्ट्रेलिया मधला मालिका विजय खासच असतो....
तशी भारत - ऑस्ट्रेलिया मालिका कधीच आकर्षणाचे केंद्र कधीच नव्हती पण शतक बदललं आणि 2001 च्या कोलकाता कसोटी ने या मालिकेला खरी उर्जितावस्था दिली(कोहली सातवीत)
त्या पराभवाने चवताळलेल्या कंगारुनची गाठ 2003 च्या विषवचषकाच्या अंतिम फेरीत गाठ काय पडावी आणि पॉंटिंग ते आव्हान एकहाती काय भिरकावून लावावं त्यांनी या लढतीची धार आणखी वाढली (कोहली नववीत)…
2003 साली भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेल्यापासून मी खऱ्या अर्थाने कसोटी क्रिकेट पाहू लागलो समजावून घ्यायला लागलो सगळे सामने स्वच्छ आठवतात पहिल्या ब्रिस्बेन कसोटीत गांगुलीची दादा सेंच्युरी, मग एडिलेड ला पॉंटिंग चा द्विष्टकानंतर चा flaying kiss त्याला लक्ष्मण द्रविड ची तिलांजली आणि मग अज्जू आगरकर चे दुसऱ्या डावात 6 बळी शेवटच्या दिवशी राहुल ची "द वॉल" विजयी खेळी...
मेलबर्न ची तिसरी कसोटी भारताने एक सत्रात घालवली आणि मालिका पोहोचली सिडनी ला तत्कालीन ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह वॉ कारकिर्दीची शेवटची कसोटी खेळत होता आणि त्याने मोक्याच्या वेळी नांगर टाकला आणि हाता तोंडाशी आलेला मालिका विजय भारताला बरोबरी वर समाधान मानवुन गेला (कोहली इयत्ता दहावीत) ऑस्ट्रेलिया 1-1भारत...
2007-08 वाढतच जास्त गाजली सगळं जग भारतीय क्रिकेट कडे वर्णद्वेषाच्या नजरेने पहात असताना कुंबळे चे ते वाक्य कंगारुनची फार बोचरी लागलं There was only one team playing in the spirit of game !!!
वातावरण बदललं मालिका हरली होती हरभजन वर बंदी होती अश्यावेळी भारतीय संघाने एकजूट दाखवून पर्थ ला बाजी फिरवली (कोहली U19 जगजेत्ता कर्णधार) मालिका ऑस्ट्रेलिया 2-1भारत...
2011-12 भारत जगजेता झाला होता सगळ्यांना वाटलं होतं अबकी बार ऑस्ट्रेलया पार, पण काळाने आरसा समोर उभा केला ज्या पाच दिग्गजांच्या बळावर भारत कित्येक वर्षे क्रिकेटचं मैदान गाजवत होता त्यांनी आता इतरांसाठी मार्ग मोकळा करावा इतका स्वच्छ संदेश त्या मालिकेने दिला.. (कोहली चा कसोटीत उदय) ऑस्ट्रेलिया4-0 भारत....
2014-15 विषवचषकाच्या अगदी दोन महिने आधी ऑस्ट्रेलिया दौरा धोनी संघ घेऊन मैदानावर उतरला खरा पण मालिकेच्या मध्यात त्याने कसोटी क्रिकेट ला राम राम केला आणि कसोटी सारखा अवघड प्रकार कोहली च्या खांद्यावर सोपवला.... या मालिकेत कोहली ने 2018-19 च्या नेतृत्वाची बीजे रोवली त्याने नेतृत्व केलेल्या दोन्ही कसोट्या भारताने ड्रॉ केल्या निकाल ऑस्ट्रेलिया 2-0 भारत...
2018-19 जे भारतीय क्रिकेट मधल्या भल्या भल्या कर्णधारांना जमलं नाही ते यावेळी नक्की होणार हे सगळे म्हणत होते अगदी 1991 पासून भारतीय संघाबरोबर सावली सारखा फिरणारा हर्षा भोगले ही म्हणाला या वेळी India start favourites!!!
ह्या संघात अस काय होतं जे मागच्या संघात नव्हतं, मला अस वाटतं आजवर भारतीय संघाकडे दादा फलंदाज होते पण तेवढी ताकदवान गोलंदाज नव्हते...
कसोटी सामना जिंकायचा असेल तर प्रतिस्पर्धी संघाचे 20 बळी मिळवावेच लागतात... गतकाळातील वेस्ट इंडिज चा संघ पहा संपूर्ण 1980 आणि 1990 च्या दशकात त्यांच्या कडे गार्नर, होल्डिंग, मार्शल आणि रोबर्ट्स कायम होते नंतर त्यात अम्ब्रॉस आणि वॉल्श आले... 1990 च्या दशकात ऑस्ट्रेलिया कडे मॅक्ग्रा, गिलेसपी, मॅकडॉरमट, कासप्रॉव्हिच होते 2000 च्या दशकात त्यांच्याकडे ली, जॉन्सन होते. दक्षिण आफ्रिका कडे 1990 च्या दशकात अॅलन डोनाल्ड, पोलॉक, डिव्हीलीयर्स होते 2000 च्या दशकात स्टेयन, एनटिनी, पोलॉक, मॉर्केल यांच्या तुफान वेगावर या संघांनी दशक गाजवली असे वेगवान गोलंदाज भारताला पहिल्यांदा मिळाली या दशकात....
या वेळी पहिल्यांदा सातत्याने 140 किमी प्रतितास वेगाने चार गोलंदाज कायम विराट कडे होते आणि ते त्याने अतिशय सुरेख रीतीने वापरले
इशांत शर्माची टप्पा, बुमराह चा वेग, शमी चा रिव्हर्स स्विंग आणि उमेश यादव ची उसळी अशी उत्तम भट्टी जमली की कांगरूंनी शरणागती पत्करली... आणि त्यांना पुजारा, कोहली, पंत ने सुरेख बॅटिंग करून साथ दिली
सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि एक संस्मरणीय विजय साकार झाला...
आता आस 2019 विश्वचषकाची, लोर्ड्स बोलवतय!!!