Saturday, February 7, 2026

परीक्षेतील घोळ घोटाळे अन बरंच काही....

12वी इंग्लिश च्या पेपर ला मुलांना सहा गुण मिळणार - बातमी..

प्रश्नपत्रिका च्या ऐवजी model answer छापलं तर हेच करावं लागेल..

पण समजा अशी चूक प्रत्येक पेपर मध्ये करायची झालीच तर काय काय शकली लढवता येतील..

#फिजिक्स: वरती जनरल सूचना छापलेल्या असतात तिथंच एखाद दुसरा फॉर्म्युला छापून टाकायचा..
 हाय काय नाय काय...

#केमिस्ट्री: बहुपर्यायी प्रश्न असतात दहा मार्कांचे त्यात काय करायचं जे बरोबर पर्याय आहे त्याचा फॉन्ट साईझ वेगळा ठेवायचा.. चाणाक्ष मुलांना 10 मार्क फुकट..

#बायोलॉजी: जो दिर्घोत्तरी प्रश्न विचारला आहे त्याचीच एक नामनिर्देशित आकृती दुसऱ्या कुठल्या तरी पानावर छापायची... आकृती पाहून मूलं पानभर उत्तर खरडू शकतात.. यात मुलांचे निरीक्षण शक्ती तपासता येईल..

#गणित: जाऊ दे सगळं दिलं तरी विषय च अवघड हाय..

#भूगोल: नकाशा भरायच्या प्रश्नात जे प्रश्न विचारलेत तेच नकाशातून गायब करायचे...

- शिक्षण व्यवस्थेतला ह मो चा 
040320231535

No comments:

Post a Comment

परीक्षेतील घोळ घोटाळे अन बरंच काही....

12वी इंग्लिश च्या पेपर ला मुलांना सहा गुण मिळणार - बातमी.. प्रश्नपत्रिका च्या ऐवजी model answer छापलं तर हेच करावं लागेल.. पण समजा अशी चूक प...