Friday, March 20, 2020

KYAPV Case Study

*।।श्रीगुरुदेव दत्त।।*
जातकाचे च धनू लग्न, लग्नात नेपच्यून, लग्नेश गुरू लाभात dynamic व्यक्तीमत्व, लग्नेश लाभात गेल्याने कायम पॉझिटिव्ह विचार आणि मोठा फ्रेंड सर्कल असणारी मुलगी मित्र पण सगळे कामाचे...

द्वितीयात हर्षल आर्थिक बाबतीत मोठी उलाढाल दाखवतो... लागली तर एकदम लॉटरी नाहीतर एकदम खड्डा म्हणून थोडा आर्थिक गुंतवणूक जपून...

कोणत्याही खासगी, सहकारी किंवा कॉर्पोरेट बँकेत पैसे गुंतवू नये... फटका बसू शकतो नॅशनलाईझड बँक चालेल...

तुझा खरा प्रॉब्लेम तृतीय स्थानात आहे तेथे शनी, मंगल,आणि बुध आहे... शनि स्वराशीचा आणि मंगल व्ययेश होऊन आणि बुध दशमेश होऊन आल्याने सगळं गोंधळ आहे..
शनी मंदगतीने जातो किती हळू तर एका महिन्याला एक डिग्री आणि मंगल 45 दिवसात एक  राशी पार करतो म्हणजे एक एकदम high mobility वाला आणि दुसरा एकदम slow... आणि असे दोन विरुद्ध स्वभावाचे ग्रह जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते एकमेकांचे गुणधर्म कॅन्सल करतात तुझ्या पत्रिकेत त्या शनी ला जो कष्टाचा कारक आहे त्याला मंगळ व्ययेश होऊन बाधित केलाय त्याच मंगळाला जो पंचमेश ही आहे त्याला शनी ने चेक लावलाय म्हणजे तो मंगळ फळ देण्यास असमर्थ झाला...

आणि या दोघांच्या भांडणात तो बिचारा बुध जो दशमेश आणि सप्तमेश(lord of the 10th and 7th house)कात्रीत विनाकारण सापडलाय... म्हणून खूप जवळ जाऊन सुद्धा ऐन मौके पे rejection येतंय...😢😢
चतुर्थात उचीचा शुक्र लाभेश(lord of the11th house) होऊन आल्याने तुला सगळ्या सुख सोयी मिळणारच आहेत शिवाय चतुर्थेश(lord of4th house) लाभात गेल्याने डबल आनंद...
रवी नवमेश होऊन आल्याने वडिलांकडून (सासरे नाही)स्थावर चा लाभ होऊ *शकतो*
षष्ठात केतु स्किन ऍलर्जी ची शक्यता आहे...(मेकअप जरा जपून... दिसलं म्हणून सांगितलं)

सप्तमात चंद्र अष्टमेश होऊन सासुरवाडी वर खर्च संभवतो... सासुरवाडीशी वाद होऊ शकतात...(होऊ नये ही दत्तचरणी प्रार्थना पण दिसतंय तस. I can be wrong...)

व्यय स्थानातील राहू कधी तरी प्रचंड मानसिक टेंशन देईल.. काळजी घ्या स्टे पॉझिटिव्ह...

आता परत तेच पॉईंट बघू जे विशाल चे बघितले होते...

*पैसे कुठून?*
द्वितीयचा सब रवी आहे तो 2,7 म्हणजे पार्टनर्शीप मधून पैसे दाखवतो खर्च as such दिसत नाही.😮😮😮

How about नोकरी???

षष्ठाचा सब राहू आहे आणि तो2,3,4,5,11,12 चा कार्येश आहे म्हणजे नोकरीसाठी तुझ्याकडे एकच ऑप्शन आहे तो म्हणजे *multinational company* कदाचित जॉइनिंग नंतर एखादी फॉरन टूर ही करावी लागेल..

बिझिनेस करायचा का?
 
सप्तमाचा सब गुरू आहे... तो 1,10 दाखवतो म्हणजे करायचाच असेल तर तो फक्त आणि फक्त तुझ्या नावावर करायचा... दुसरा कोणताही पार्टनर नको(I repeat *कोणताही*)..

दशमचा सब बुध आहे तो 2,3,4,5,7,11,12 चा कार्येश आहे... 

बुध फूड इंडस्ट्री पेक्षा कौंसेलिंग किंवा तुझं फायनान्स झालंय म्हटल्यावर त्यासंबंधी कन्सल्टन्सी चांगली चालेल पण this is only valid after *september2025* that will at the age of 32 still young. Mean while you can gain required experience by working in MNC.

जॉब शोधत राहणे you are very close. 19 एप्रिल 2020 नंतर अंतर्दशा बदलेल. राहुची सुरू होईल...

त्या अंतर्दशेत जॉब लागेल...

There is a very strong chance that in between *20th April 2020 to 2nd June 2020* you may crack an interview. Best of luck.💐💐💐

🙏 *।।श्रीदत्तात्रयर्पणमस्तू।।* 🙏

DV Case Study

🌼 *।।श्रीगुरुदेवदत्त।।*🌼

जातकाचे मकर लग्न हेच मुळात थोडे कष्टदायी, आणि कठोर परीक्षा घेणारे आहे...

कुठल्याही गोष्टी सहजासहजी मिळणार नाहीत... सध्या जरी वरवर all is well दिसत असलं तरी at one point he is going to face struggle.

मुळात अशी सुरुवात करू की ह्याच्या नशिबात पैसे आहे का आणि कसा?

त्यासाठी द्वितीय स्थान पाहूया. द्वितीयात शनी आलाय तोही लग्नेश होऊन द्वितीयातला शनी मुळातच आर्थिक उत्कर्ष उशीरा घडवतो. पैसे खर्च करताना चैनी पेक्षा गरज priority वर आणतो...

द्वितीयचा सब शनीच आहे(underlined in the भाव आणि उपनक्षत्रस्वामी chart.) तो उपनक्षत्रपातळीवर 7,11 दाखवतोय म्हणजे पैसा येताना जोडीदार कडून(म्हणजे तुझ्याकडून) येणार आणि खर्च होताना तो कुटुंब, आई, भावंड,वडील यांच्यावर खर्च होणार आहे....
 

थोडा नोकरीचा विचार करून बघू...

नोकरीसाठी 6 वे स्थान पाहू षष्ठेश बुध षष्ठात... नोकरीसाठी उत्तम योग वरकरणी दिसतो थोडं खोलात जाऊन बघूया...

षष्ठाचा उपनक्षत्रस्वामी शुक्र आहे... तो उपनक्षत्रपातळी वर 5,6,8 चा कार्येश आहे त्याने कधी नोकरी केली जरी असेल तर बॉस किंवा अथोरिटी कडून त्रास झाला का विचार(तो normally सगळ्यांनाच होतो.😆😆 पण in his case specially.)

Next point ह्याने पार्टनर्शीप आणि मुळात बिझिनेस करावा का?

सप्तमेश चंद्र व्यायात गेलाय म्हणजे तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीशी याने पार्टनर्शीप करून *उपयोग नाही* करायचे असल्यास बायको ला पार्टनर करावी...
सप्तमाचा उपनक्षत्रस्वामी गुरू आहे.... तो 5,6,8 चा कार्येश आहे.... बिझिनेस करावा पण पार्टनर घरचा असावा... बाहेरचा नको(बाहेरचा प्रयत्न त्याने केला होता मला माहित आहे, आणि तो वर्क आउट होत नाही हे माझं आणि जातकाचे बोलणं झालं आहे)...

दशमात गुरू/ राहू चांडाळ युती आहे... 

गुरू व्ययेश होऊन दशमात आलाय... त्रासदायक आहे म्हणूनच growth as such दिसत नाही...
 दशमचा सब बुध आहे... तो कायम दोन ऑप्शन देत राहणार... side business होऊ शकतो...
*प्रॉपर्टी डीलरशिप???( Possibility As a side business.)*


Now let's come to the point and it is महादशा...
जो कुछ भी होता है महादशा के वजह से होता है....

सध्या चंद्राची महादशा 
चंद्र 2,3,4,5,9,10,11,12 दाखवतोय म्हणजे पैसे is coming but खूप ठिकाणी खर्च होतोय... कधी घरच्यांचा आजारपण कधी गाडीच त्रास देते तिचा खर्च निघतो in short पैसा येतो एक दाराने आणि जातोय दहा दारांनी....
आणि ही झोळी ला पडलेली holes लवकर बुजताना दिसत नाहीत. पैसे येणार नाही असं कधीच होणार नाही पण टीकण्याचे चान्सेस बहुत कम दिख रहे है।
thats the bitter truth...

त्याला एक मार्ग आहे पण तो ते करेल का नाही नाहीत नाही...

तो तुला चांगला माहीत आहे thats is 😇 _*महालक्ष्मी अष्टक*_😇

रोज किमान 3 वेळा संध्याकाळी दिवा लागल्यावर...


हे त्याने केलं तर अतिउत्तम नाही तर better half म्हणून तू तरी करावेस...

जातका ला कर्माबरोबर थोडी साधनेची आणि आर्थिक शिस्तीची आवश्यकता आहे *च!!!*

बिझिनेस मध्ये up downs होत राहणार downs कमी कसे करता येतील एवढंच प्लॅन करावे लागेल...

🙏 _*श्रीदत्तात्रयर्पणमस्तू*_🙏

तेजीत चाललेला बिझिनेस ढेपळला

🌼 *।।श्री गुरुदेव दत्त।।*🌼

श्री सुदाम कट्टीजी तुम्ही म्हटलं की आपण गेली 20 वर्ष व्यवसाय करताय.. आणि त्यात कोणतीही अडचण अली नाही...

त्याला कारण गेली 20 वर्षात म्हणजे साधारण 2000 सालापासून आपल्या महादशा चेक केल्या तर 1999 ला चंद्राची महादशा सुरू झाली... ती नक्षतरस्वमी प्रमाणे 2,7,11 चा कार्येश आहे म्हणजे याकाळात आपले इन्कम सुरू राहीले व्यासायात वाढ झाली असावी.. त्या चंद्राच्या महादशेत म्हणजे 1999 ते 1 2009 याकाळात खर्च ही झाले असावेत... 
2009 ते 2016 यावर्षात मंगळाची महादशा पुन्हा एकदा 10 ची कार्येश असल्याने पुन्हा एकदा व्यवसाय वृद्धी आणि आर्थिक इन्कम वाढण्यास पूरक ठरली आहे...

2016 मध्ये राहू ची महादशा सुरू झाली. राहू अष्टमात शनीच्या युतीत बंधन योगात आहे... म्हणून त्रास सुरू आहे...राहुने आर्थिक स्थाने 2,10,11 सोडली आणि तुंमचे उत्पनाचे स्रोत हळूहळू कमी होत गेले...

गुरुची अंतर्दशा 2,11 दाखवते म्हणजे थोडा काही काळ सोडला तर इन्कम सुरू होण्याचे चान्सेस आहेत...

प्रयत्न करावेत!!!

आणखी काही असेल तर कळवावे!!!

माझी फी 501/-₹ 
गुगल पे 9765417361

धन्यवाद!!!
🙏 *श्रीदत्तात्रर्यपणमस्तू*🙏

परीक्षेतील घोळ घोटाळे अन बरंच काही....

12वी इंग्लिश च्या पेपर ला मुलांना सहा गुण मिळणार - बातमी.. प्रश्नपत्रिका च्या ऐवजी model answer छापलं तर हेच करावं लागेल.. पण समजा अशी चूक प...