Saturday, November 30, 2024

जोडगोळी

 पूर्वप्रसिद्धी : क्रिककथा दिवाळी अंक २०२४

संपादक : कौस्तुभ चाटे

१९८३ चे जसे महत्त्व भारतीय क्रिकेट मध्ये अनन्यसाधारण आहे, अगदी तसेच काहीसे २००७ चे म्हणावे लागेल. या एका वर्षात भारतीय क्रिकेट ने दुसऱ्यांदा कात टाकली. २००७ च्या वन डे वर्ल्ड कप ला  जो भारतीय संघ उतरला होता तो कुठल्याही अर्थाने लेचापेचा संघ नव्हता तरी श्रीलंका, बर्मुडा, बांग्लादेश असलेल्या गटातून तो  दिग्गज क्रिकेटपटू असलेला संघ प्राथमिक फेरीतून बाहेर पडला आणि सौरव गांगुली ने २००० सालानंतर उभ्या केलेल्या या संघात थोडा फार बदल करण्याची गरज भासू लागली. प्राथमिक फेरीतून लवकर बाहेर पडल्यामुळे भारतीय संघ चक्क दोन महीने बसून होता. विचार करायला बदल घडवण्यासाठी, क्रिकेट वर्तुळात नवीन रक्त शोधण्यासाठी व्यवस्थापनाला वेळ मिळाला होता.

भारताचा युके दौरा २००७

वर्ल्ड कप नंतर भारतीय संघाची पहिली मोठी परीक्षा भारताचा आयर्लंड, स्कॉटलंड, इंग्लंड चा दौरा होता. आयर्लंड मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ वन डे सामन्यांची मालिका होती. तगडा आफ्रिकी संघासमोर तुलनेने अनुभव आणि युवा चा भरणा असलेला भारतीय संघ बीसीसीआय ने उतरवला होता. भारतीय क्रिकेट ला नवीन राग - रंग द्यायचा असेल तर ही करणं गरजेचं  होत. या संघात मुंबई चा नवीन मुलगा रोहित शर्मा ही होता. रोहित शर्मा ही नाव पहिल्यांदा भारतीय क्रिकेट प्रेमींना ऐकायला मिळाले त्या आधी रोहित शर्मा  २००६ साली पीयूष चावला  च्या नेतृत्वात अंडर १९ वर्ल्ड कप खेळला होता. पण,खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्तरावर रोहित आयर्लंड च्या दौऱ्यात वन डे मध्ये दिसला. पहिल्या काही सामन्यात फारशी संधी न मिळाल्याने अजून रोहित शर्मा आजचा हिटमॅन  व्हायचा होता.

आयसीसी वर्ल्ड टी २० २००७

रोहित खऱ्या अर्थाने अवतरला तो २००७ च्या वर्ल्ड टी २० मध्ये. धोनी च्या नेतृत्वात अगदी नवखा संघ त्या स्पर्धेत उतरला होता. सचिन, द्रविड, गांगुली, झहीर, कुंबळे यांच्या शिवाय गेल्या १० वर्षात पहिल्यांदा कुठल्याही आयसीसी स्पर्धेत उतरणार होता भारतीय प्रेक्षकांनी फार अपेक्षा ही ठेवल्या नव्हत्या. स्पर्धेतल्या सुपर ८ गटात भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होता, त्या एका सामन्यावर भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका  तिघांचे स्पर्धेतलं भवितव्य अवलंबून होतं. त्या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना भारताची ३ बाद ३३ अशी बिकट अवस्था झाली होती. त्यावेळी रोहित शर्मा खऱ्या अर्थाने उभा राहीला. आधी रॉबिन उत्थापा नंतर धोनी सोबत भागीदारी करून त्याने डाव नुसता सावरला नाही तर भारतीय गोलंदाजांना संधी दिली. ३ बाद ३३ वरुन ५ बाद १५३ अशी समाधानकारक धावसंख्या उभी राहिली त्याला आधार रोहीत शर्माच्या अर्ध शतकाचा होता . पुढे आफ्रिकेच्या डावात त्याने जस्टीन केम्प चा केलेला रन आऊट अजुनही नजरेसमोर तरळतो. पुढे त्याच स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध अंतिम सामन्यात अखेरच्या काही षटकात त्याने केलेली फटकेबाजी भारताच्या  विजेतेपदात निर्णायक ठरली.   रोहित शर्मा ही नाव घरोघरी घेतलं जाऊ लागलं.

पुढची काही वर्ष रोहित शर्मा मधल्या फळीत खेळत राहील पण त्याची कारकीर्द बहरली ती  २०१३ नंतर जेव्हा त्याने सलामीवीर म्हणून खेळायला सुरुवात केली. रोहित शर्मा सातत्याने टी २० प्रकारात नवनवे विक्रम करत राहीला  ते अगदी २०२४ च्या त्याच्या निवृत्ती पर्यन्त. २०२२ साली रोहित शर्मा च्या नेतृत्वात टी २० वर्ल्ड  कप  मध्ये अगदी जवळ जाऊन सेमी फायनल मध्ये भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडला. पण २०२४ मध्ये रोहित च्याच  नेतृत्वात भारतीय संघाने टी २० वर्ल्ड कप जिंकला. ज्या स्पर्धेमुळे आणि ज्या दक्षिण आफ्रिकेमुळे रोहित शर्माला ओळख मिळाली त्याच स्पर्धेत त्याच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रोहित शर्मा ने विजेतेपद मिळवून टी २० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अलविदा केला.

रोहित च्या टी २० आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील लक्षात राहणाऱ्या आणखी काही खेळी:

1. ७९* वि ऑस्ट्रेलिया, ब्रिजटाउन २०१०

ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2010 च्या टी 20 वर्ल्ड कप मध्ये सुपर 8 च्या त्या सामन्यात ऑस्ट्रेलिया ने उभ्या केलेल्या 185 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा ने एकट्याने खिंड लढवली. दुसऱ्या बाजूने विकेट पडत असताना रोहित ने 79 धावांची नाबाद खेळी केली, त्या सामन्यात भारताची इतर कोणताही फलंदाज 20 धावा करू शकला नाही  आणि  तो सामना भारताने गमावला.

2. 118 वि  श्रीलंका, इंदूर, 2017

श्रीलंका तसं रोहित च आवडतं  गिऱ्हाईक जेव्हा जेव्हा रोहित श्रीलंकेविरुद्ध खेळला हमखास चालला. असाच एक टी 20 मालिकेच्या सामन्यात श्रीलंका रोहीत च्या तडाख्यात सापडली. इंदूर इथे झालेल्या त्या सामन्यात रोहित ने लंकेच्या गोलंदाजांची तूफान धुलाई केली. 12 चौकार आणि 10 षटकारांसह केलेल्या 118 धावा लंकेच्या जिव्हारी लागल्या.

3. 92 वि ऑस्ट्रेलिया, सेंट लुशिया 2024

घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया कडून वन डे वर्ल्ड कप चा पराभावाने रोहित बेचैन होता. हातातोंडाशी आलेला वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया ने हिरवला होता. त्याचा वचपा काढायची संधी रोहित ला  2024 च्या टी 20 वर्ल्ड कप मध्ये मिळाली होती. पहिल्यांदा बॅटिंग करताना रोहित अक्षरश: मिशेल स्टार्क वर तुटून पडला. त्याच्या एक ओव्हर मध्ये  23 रन वसूल केल्या.

रोहीत शर्माची टी २० आंतरराष्ट्रीय कारकीर्द:

सामने

धावा

सरासरी

स्ट्राईक रेट

५०/100

१५९

४२३१

३२.०

१४०.९

३२/5



जशी रोहित ची कारकीर्द 2007 च्या टी 20 वर्ल्ड कप मध्ये सुरु झाली अगदी काहीच महिन्यानी भारतीय संघ 2007/08 च्या ऑस्ट्रेलिया च्या दौऱ्यावर कॉमनवेल्थ बँक तिरंगी मालिका जिंकत असताना एक नवीन झंझावात मलेशिया इथे सुरु असलेल्या  अंडर 19 वर्ल्ड कप मध्ये जन्म घेत होता. इकडे ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच  एकदिवसीय मालिका जिंकण्याचा जल्लोष भारतीय क्रिकेट चाहते साजरा करत असताना विराट कोहली च्या नेतृत्वात भारताने अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला होता. विराट कोहली या नावाची कुजबूज सुरू झाली होती. विराट ची गुणवत्ता त्याला फार काळ भारतीय संघाच्या बाहेर ठेवणार नव्हती आणि झालंही तसंच.  2008 च्या श्रीलंका दौऱ्यावर विराट कोहली ने आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं आणि पुढे घडलेला इतिहास भारतीय क्रिकेट रसिकांनी याची दही याची डोला पाहिला.  2009, 2010, 2011 चा वन डे वर्ल्ड कप वर्षा मागून वर्ष सरत होती आणि विराट प्रत्येक वर्षी त्याची कारकीर्द सजवत होता. कव्हर ड्राइव्ह, तंत्रशुद्ध फटके मारत विराट नावाप्रमाणे दिवसागणिक विराट होत चालला होता. त्याने एके काळी एकदिवसीय शतकांची मालिकाच लावली होती. काही काळ विराट चे शतक आणि भारताचा विजय अगदी परवली चे शब्द झाले होते.

2012 ते 2018: विराट युग

2012 च्या आपल्या पहिल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तिरंगी मालिकेत होबार्ट च्या मैदानावर लसिथ मलिंगा ची पिसे काढल्यानंतर क्रिकेट जगताला  विराट कोहली ची धडकी भरू लागली होती. 2012 पासून कोहली जी स्पर्धा किंवा मालिका खेळला त्यावर त्याने स्वत:ची छाप पाडली. टेस्ट, वन डे , टी 20 सगळ्या प्रकारात यत्र तत्र सर्वत्र विराट कोहली चा दबदबा होता. आयपीएल मध्ये सुद्धा त्याच्या रॉयल चॅलेंजर बंगलोर या फ्रांचायजी साठी ख्रिस गेल, विराट कोहली ए बी डिव्हिलीयर्स अक्षरश: धुमाकूळ घालत होते. 2014/15  चा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात  विराट कोहली किंग कोहली झाला. अचानक आलेलं कसोटी कर्णधार पद तोंडावर आलेला वन डे वर्ल्ड कप आणि ऑस्ट्रेलिया ने कसोटी मालिकेत काढलेला घाम या सगळ्यातून कोहली तावून सुलाखून निघाला. वर्ष सरत होती आणि कोहली शतकामागुन शतके सहज करत सुटला होता. तो इतका पुढे निघून गेला की कारकीर्दीचा एका टप्प्यावर कोहली सचिन तेंडुलकर च्या 100 शतकांची बरोबरी कधी करेल यावर क्रिकेट प्रेमींमध्ये पैजा लागल्या. पण 2019 च्या वन डे वर्ल्ड कप नंतर विराट कोहली च्या फॉर्म ला ग्रहण लागलं आणि गंमत म्हणून शतके करणारा विराट कोहली ला कधी कधी दोन  आकडी धावसंख्या ही हुलकावणी देऊ लागली.

2022: रिटर्न ऑफ द किंग:

2019 च्या अखेरी पर्यन्त कोहलीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये तब्बल 70 शतके झाली होती. पण त्यानंतर एकाहत्तरावे शतक यायला खूप वाट पहावी लागली. 2022 साली होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप आधी संयुक्त अरब अमिराती मध्ये टी 20 आशिया कप झाला. वर्ल्ड कप ची  तयारी म्हणूनच त्याकडे पाहिलं गेलं. त्या आशिया कप स्पर्धेत तब्बल चार वर्ष विराट कोहली वर रुसून बसलेला त्याचा बॅटिंग फॉर्म परतला. अफगाणिस्तान विरुद्ध च्या साखळी कोहली ला  फॉर्म गवसला आणि ते सातत्याने हुलकावणी देणारे एकाहत्तरावे शतक अखेर त्या सामन्यात झाले. त्या दिवशी विराट कोहली च्या चेहऱ्यावरचे भाव बघण्यासरखे होते. एकदाचे ते एकाहत्तराव्या शतकाचे भूत मानगुटीवरून उतरल्याचे चेहऱ्यावर स्पष्ट  दिसत होतं. त्यानंतर कोहली ने परत मागे वळून पाहिले नाही. पुन्हा एकदा शतकांची गाडी सुरू झाली. हा लेख लिहीत असताना  80 आंतरराष्ट्रीय शतके  त्याच्या नावावर आहेत.

विराट च्या टी २० आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील लक्षात राहणाऱ्या आणखी काही खेळी:

1. 82* वि पाकिस्तान, मेलबर्न 2022

2021 साली संयुक्त अरब अमिराती मध्ये झालेल्या मानहानीकारक पराभवाच्या जखमा अजूनही ताज्या होत्या. मेलबर्न सारख्या भरगच्च मैदानात भारत विरुद्ध पाकिस्तान ब्लॉकबस्टर ठरण्याची सगळ्यांनाच अपेक्षा होती. भारताने पहिल्यांदा गोलंदाजी करून पाकिस्तान 159/8 अश्या आवाक्यातल्या धावसंख्येवर रोखलं. 160 धावांचे लक्ष मेलबर्न च्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांना फारसे अवघड जायला नको  होतं पण, नियतीने असे काही डाव खेळले की त्या धावांचा पाठलागाचा कर्ता करविता कोहली झाला. सगळे आघाडी चे फलंदाज बाद होऊन तंबूत परतले होते. 10 षटकात जेमतेम 60 धावा झाल्या होत्या आणि हार्दिक पांड्या आणि कोहली पाकिस्तान चा तोफखाना परतवून लावत होते. सामना इतका उत्कंठेला पोहोचला की 8 बॉल मध्ये 28 धावा गरजेच्या असताना कोहली, विराट झाला. समोर हारिस  रौफ 150 च्या स्पीड ने गोलंदाजी करत होता आणि.. भारतीय क्रिकेट इतिहासातील ते दोन अजरामर बॉल टाकले गेले. 18.5 आणि 19.0 हे दोन बॉल भारतीय क्रिकेट इतिहासात दंतकथा झाले. कॉमेंटरी मध्ये हर्षा भोगले चे ते शब्द Kohli goes down the ground, kohli goes out of the ground क्रिकेट रसिकांच्या कानात आजही ताजे आहेत. भारताने तो सामना शेवटच्या बॉल वर जिंकला आणि 2021 फ्लूक असल्याचे दाखवून दिले.

2. 82* वि ऑस्ट्रेलिया, मोहाली 2016

2016 च्या टी 20 वर्ल्ड कप मधली सुपर 10 मधला तो सामना दोन्ही संघांसाठी करो या मरो चा होता. हरणारा संघ स्पर्धेबाहेर जाणार होता. ऑस्ट्रेलिया ने पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतासमोर 160 धावांचे आवाहन ठेवले होते. धावांचे पाठलाग सुरू असताना आठव्या षटकात 3 बाद 49 असा येऊन सामना निर्णायक टप्प्यावर फसळा होता. गरज होती शांत संयमी खेळीची. कोहली ने संधी साधली आधी युवराज सिंग मग महेंद्रसिंग धोनी ळा बरोबर घेत ऑस्ट्रेलिया ला मायदेशाचे तर भारताला सेमी फायनल चे तिकीट काढून दिले. 2016 साली तसंही विराट आपल्या यशाच्या शिखरावर होता.

3. 74* वि दक्षिण आफ्रिका, ढाका 2014

2014 च्या टी 20 वर्ल्ड कप ची ती सेमी फायनल होती. आफ्रिकेच्या 172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेस मास्टर विराट कोहली पुन्हा एकदा उभा राहीला. सुरेश रैना सोबत महत्त्वाची भागीदारी करून आफ्रिकेला त्यांच्या पहिल्या अंतिम फेरी पासून दूर ठेवलं. 

4. 76 वि दक्षिण आफ्रिका, ब्रिजटाउन 2024

विराट कोहली, रोहित शर्मा दोघांचाही हा शेवटचा टी 20 वर्ल्ड कप होता. दोघांनाही त्याची पुरेपूर जाणीव होती. भारत आणि आफ्रिका दोन्ही संघ अंतिम सामन्यात अपराजित आले होते. या दिवशी कोणतातरी एक संघ नक्की हरणार होता. आफ्रिका 1998 नंतर पहिल्यांदाच कुठल्याही आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचलं होतं. ते इतिहास पुसायला निघाले होते तर भारत गेल्या एका कॅलेंडर वर्षातले तिसरी फायनल खेळत होता. विराट कोहली या स्पर्धेत येताना त्याच्या स्ट्राईक रेट साठी प्रचंड ट्रोल झाला होता आणि स्पर्धेत ही अंतिम सामन्यात येईपर्यंत 8 सामन्यात केवळ 70 च्या आसपास धावा केल्या होत्या. कोहली सलामीला यायचा अट्टहास का करत आहे ? असाही प्रश्न क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेट पंडित विचारत होते. पण आपण शेवटचा  टी 20 आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहोत ही कोहली  ला पक्क माहीत होतं. भारताने पहिली बॅटिंग केली. रोहित, पंत, सूर्यकुमार यादव  लवकर बाद झाले. कोहली ने अक्षर पटेल, शिवम  दुबे या नवख्या खेळाडूंना हाताशी घेऊन डाव सावरायला घेतला. 59 चेंडूत 76 धावा करत भारतीय डाव 176/7 सारख्या आवाहनात्मक धावसंख्येपर्यंत पोहोचवला. कोहली च्या कष्टाचं गोलंदाजांनी सोनं केलं आणि भारताने 13 वर्षांचा वर्ल्ड कप चा दुष्काळ संपवला.

विराट कोहली ची टी 20 आंतरराष्ट्रीय कारकीर्द:

सामने

धावा

सरासरी

स्ट्राईक रेट

५०/100

125

4188

48.69

137.04

38/1



रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांनी 2024 च्या टी 20 वर्ल्ड कप च्या विजेतेपदासह क्रिकेटचा टी 20 प्रकराला राम राम केला. आणि अश्या रीतीने भारतीय टी 20 संघातली 1980 ची पिढी संपली. गेली दीड दशक दोघांनी ही भारतीय क्रिकेटला टी 20 मध्ये अनेक आठवणी दिल्या. पुढील आणखी काही वर्ष रोहित आणि विराट वन डे आणि कसोटी खेळताना दिसतील,त्याचा आनंद क्रिकेट रसिक घेतील.

-         हर्षद मोहन चाफळकर

वडगावशेरी, पुणे- 411014

मोबाईल: 9765417361  

Wednesday, September 25, 2024

हर्षल नेपच्यून प्लुटो चा बर्म्युडा ट्रँगल आणि मिलेनियल्स (१९८१-१९९५)

जवळ जवळ तीन चार वर्ष झाले रोजच्या अनुभवातून आमचे फ्रेंड फिलॉसोफर आणि गाईड दीपक पंडीत आणि एक साधारण पाचशे एक पत्रिका डोळ्याखालून घातल्यावर माझ्या डोक्यात एक विषय घोळत होता, त्याला आज शब्दबद्ध करत आपल्या समोर या ब्लॉग द्वारे ठेवत आहे. सोशल मीडिया आणि जवळपास सगळीकडे आजकाल आपण जेन-झी, मिलेनियल्स असे शब्द ऐकतो. हा काय प्रकार आहे बुवा म्हणून जरा गुगल महाराजांना विचारणा केली तर त्यांनी आणखी चार नवीन नावांची भर घातली. 

Baby boomers: 1946 ते 1964 

Gen X: 1965 ते 1980 

 Millenials : 1981  ते 1995 

Gen Z: 1996 ते 2010 

थोडक्यात काय तर आपल्या माय मराठीत आजी - आजोबा, आई - वडील, तरुण आणि नवतरूण.. 

आता या झमेल्यात मिलेनियल्स का विशेष आहेत ही समजून घेतल पाहिजे. 1980 ते 1995 ही ती पिढी आहे ज्याने जुन्यातले थोडं अनुभवलं आहे आणि नवीन सगळ्या गोष्टींचा उपभोग घेत आहे.. असो.. तो विषय नाही या ब्लॉग चा.. या पिढीचा एक प्रॉब्लेम आहे तो म्हणजे विवाह. सध्या व्हाट्सअप्प आणि इतर समाज माध्यमावर "विवाह एक समस्या"  हा लेख फार जोरदार फिरतोय. आणि ही समस्या असलेली हीच ती मिलेनियल्स ची पिढी आहे...

टप्प्या टप्प्या ने एकावर एक थर चढवत आपण समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करूया, ज्योतिषीय दृष्टिकोनातून. 

या पिढीची सुरुवातच मुळात 1980-81 साली कन्या राशीत झालेल्या गुरू-शनी युती ने होते... आणि जेव्हा अश्या दोन celestial giants ची युती होते तेव्हा ते दीर्घकालीन परिणाम देतात किंबहुना या पिढीचा पाया base ही कन्या राशीतली गुरू - शनी युती आहे...

(फोटो: गुगल, हर्षल नेपच्यून प्लूटो यावर गुरुवर्य म दा भट यांनी वेगळं पुस्तक लिहिले आहे..)

आता पुढचा थर चढवू.. निसर्ग कुंडलीत सप्तम स्थानात तुळ रास येते आणि या तुळ राशीत प्लूटो 26 नोव्हेंबर 1980 ला एन्ट्री घेतो आणि इथून या पिढीच्या विवाहाचा विषय बिघडायला सुरुवात होते. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे प्लूटो चा शोध जरी 1930-31 साली मिथुन राशीत लागला असला आणि आपण वैज्ञानिक दृष्ट्या त्याला ग्रह मानत नसलो तरी आपण आपल्या पूजे मध्ये  यमधर्म म्हणून पूजन करतच होतो आता प्लूटो काही गुरू सारखा दर 12 वर्षानी किंवा शनी सारखा 30 वर्षांनी त्याच राशीत येत नाही.. प्लूटो ला राशीचक्र पूर्ण करायला सरासरी अंदाजे 240 वर्ष लागतात... त्यामुळे प्लूटो तुळ राशीत असणारी ही एकमेव जिवंत पिढी आहे.. साक्षात यम निसर्ग कुंडलीत सप्तम स्थानात आल्याने या पिढीचा विवाहाचा प्रश्न बिकट होत गेलाय..

हा प्लूटो नोव्हेंबर 1983 मध्ये स्वाती नक्षत्रात आणि नोव्हेंबर 1988 मध्ये विशाखा नक्षत्रात येतो आणि 1988 पर्यंत ची पिढी कशीतरी विवाह निभावून नेताना दिसत आहे पण हा विशाखा नक्षत्रातला प्लूटो डिसेंम्बर 1993 पर्यंत आहे आणि ही 1988 ते 1993 बॅच वैवाहिक जीवनात सगळ्यात जास्त त्रस्त आहे... कारण विशाखा हे उग्र नक्षत्र असून ते बऱ्याच अंशी धोकादायक ही आहे.. विशाखा नक्षत्रातले ग्रह बऱ्यापैकी त्रासदायक ठरतात... प्लूटो हा समूहाचा कारक असल्याने 1980 ते 1995 या संपूर्ण पिढीवर त्याचा अंमल आहे...

या पिढीचं आणखी एक वैशिष्ट्य आहे ही पिढी जरी वैवाहिक आयुष्यात रखडत असली तरी ती अध्यात्माकडे लवकर वळाली आहे म्हणजे आज ही पिढी 30- 45 वयोगटाची असेल तर इतक्या कमी वयात अध्यात्मकडचा ओढा आश्चर्यकारक नक्कीच आहे.. यांच्या आधीच्या पिढीने आधी संसार सुखाचा केला मग हरी हरी करायला मोकळे झाले.. ही पिढी मात्र गृहस्थाश्रमाचा टप्पा बायपास करून एकदम अध्यात्माकडे लवकर जायला बघत आहे.. त्यालाही काही कारण आहे.. नेपचून जो अंतर मनाचा कारक आहे तो या 1980 - 1995 या कालावधीत निसर्ग कुंडलीत नवम जे धर्माचे, नवसंशोधनाचे, नाविन्याचे स्थान आहे अश्या धनु राशीतून गोचर करतोय... तो 1981 ते 1987 मूळ नक्षत्रात, 1987 ते 1993 पूर्वषाढा नक्षत्रात आणि 1993 पासून पुढे उत्तराषाढा नक्षत्रात प्रवास करतोय उच्च आध्यात्मिक अनुभूती देणारा नेपच्यून जेव्हा धर्म स्थानातून प्रवास करतो तेव्हा नकळत पणे त्या पिढीवर याचा प्रभाव पडतो....

या पिढीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही पिढी खूप उच्चशिक्षित आणि तंत्रज्ञान लवकर आत्मसात करणारी आहे.. त्याला कारण या 1981 ते 1995 या काळात हर्षल जो लहरी ग्रह म्हणून कुप्रसिद्ध आहे त्याची दुसरी सकारात्मक बाजू म्हणजे संशोधक वृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन कोणतीही गोष्ट तावून सुलाखून अगदी नियमात सिद्ध करून स्वीकारणारा हर्षल ग्रह आहे.. कोणीतरी सांगितलं म्हणून ऐकणाऱ्याला हर्षल ग्रह नव्हे.. हा हर्षल या 1981-1995 या कालावधीत निसर्ग कुंडलीत वृश्चिक आणि नवमतल्या धनु राशीतून प्रवास करतो तो वृश्चिकेत असताना 1984 च्या आसपास जगाला असाध्य अश्याया HIV - AIDS या रोगाची माहिती मिळते पहिला रुग्ण सापडतो. लक्षणे कळतात आणि तो 1987 साली नवमातल्या धनू गेल्यावर सर्वत्र नावीन्याचे धुमारे फुटतात... हा हर्षल 1990 पर्यंत धनु राशीतल्या मूळ नक्षत्रात आहे.. पुढे तो फेब्रुवारी 1993 पर्यंत पूर्वाषाढा नक्षत्रात आणि पुढे आणखी काही काळ उत्तरा नक्षत्रात आहे...

आता वर जे सांगितले आहे ते मोठया तीन ग्रहांचे गोचर आहे .. या तिन्ही ग्रहांचे गोचर या पिढीला आणि त्यांच्यातल्या स्वभाव आणि एकूण विचारसरणी साठी फार महत्त्वाचे आहे. कारण धनु राशीतला हर्षल दर 84 वर्षांनी येतो.. त्यामुळे तश्या पत्रिका मागच्या 100 वर्षातल्या लोकांच्या सापडतील.. पण धनु राशीतल्या नेपच्यून 144 वर्षानी आणि तुळेतला प्लूटो 240 वर्षांनी येत असल्याने असं COMBINATION असणारी ही एकमेव पिढी आहे.. त्यातल्या त्यात 1987 ते 1995 या काळात हर्षल नेपच्यून युती आहे धनु राशीत...

या पिढीची वैवाहिक समस्या का आहे हे समजून घेताना आता विशिष्ट स्थाने आणि ग्रह योग बघितले पाहिजे...

वैवाहिक सौख्याला 2 (कुटुंब), 5 (प्रणय), 7 (विवाह) आणि 11 (लाभ, जोडीदाराचे प्रणय) ही स्थाने कटाक्षाने पाहिली पाहिजेत.. 

कुंडलीतल्या 12 पैकी ही 4 स्थाने या वरच्या तीन ग्रहांनी व्यापली असतील तर 1980- 1995 या कालावधीतली 33% जनता वैवाहीक सुखाला मुकली आहे, मुकते आहे.. कारण रोज जन्माला येणाऱ्या जातकांमध्ये 1980 -1995 या कालावधीत 4/12 म्हणजे 33% मुला मुलींच्या पत्रिकेत हे ग्रह योग या चार स्थानात असणारच आहेत...

आता यापैकी जून 1989 ते जुलै 1991 (लेखक स्वतः याच बॅच चे आहेत) या काळात गुरू शनी प्रतियोगात आहेत फार थोडा काळ असा आहे जानेवारी 1990 ते मे 1990 मध्ये शनी मकरेत आणि गुरू मिथुनेत आणि जून 1990 ते नोव्हेंबर 1990 मध्ये गुरू कर्केत आहे नाहीतर या दोन वर्षात गुरू शनी प्रतियोगात आहे आणि या विशिष्ट कालावधीत जन्मलेली आणि वर सांगितलेल्या चार स्थानात हर्षल नेपच्यून प्लूटो चे ग्रह योग असणारी पिढी अध्यात्माच्या आहारी गेली आहे...

हे मिलेनियल्स (1981- 1995) एवढ्यासाठीच विशेष आहेत कारण ते एकीकडे तंत्रज्ञान नाविन्याचा उपभोग घेतात आणि त्याच वेळी अध्यात्म, मानसिक शांतता, एक प्रकारची ईश्वरप्रतिची आसक्ती याकडे कललेली आहे...

आता या सगळया कचाट्यातून वाचलं कोण??

वर म्हटल्याप्रमाणे फक्त 33% जनताच या गोष्टीची अनुभूती घेत आहे ... मग बाकी 67% जनतेचं काय?

या पिढीच्या पत्रिकेतही हे ग्रह योग आहेत.. पण ते या चार स्थानात नाहीत म्हणून यातून सुटलेत आणखी खोलात जायचं तर या 67% जनतेला विवाह योग्य वयात 2,5,7,11 या विवाह पूरक ग्रहांची दशा सुरू आहे.. यात असेही भाग्यवान आहेत जे एक विवाह मोडून दुसरा विवाह झाला आहे आणि समाधानी आहेत किंवा समाधान मानून घेतलं आहे...

या ग्रहयोगांची खरी झळ कोणाला बसली आहे??

तर या कालावधीत जन्मला आलेले आणि ज्यांना विवाह योग्य वयात (वय वर्ष 21- 40) 6 (रोग, विवाहाचे व्यय स्थान), 8 (मृत्यू स्थान) 9 (धर्म- संशोधन, अध्यात्म) 12 (व्यय स्थान) यांच्या दशा सुरू आहेत. शुक्र-केतू युती, मंगळ-केतू युती चंद्र-शनी युती, चंद्र-हर्षल युती असणारे ते खऱ्या अर्थाने या ग्रह योगात होरपळले गेले आहेत यांना विवाह करायचा नाही, झाला तरी समाधानी नाहीत, मनाला शांतता नाही आणि अक्षरशः भरकटले आहेत, त्यांना हे कळत नाही की इतकं शिकून, सावरून, चांगल्या नोकऱ्या मिळवून ही लग्न का होत नाहीत???लाखो रुपयांचे मल्टी नॅशनल कंपन्यांचे पॅकेज असून ही यांना मुले मिळत नाहीत.. 

आणखी बरेच बारकावे आहेत.. 

सध्या इतकेच भेटू पुन्हा...

- ज्योतिष विशारद हर्षद मोहन चाफळकर, पुणे

मोबाईल : 9765417361

Monday, September 16, 2024

विडंबन: का मैत्री जपून ही अन..

#मूळकविता: लाजून हासणे अन हसून ते पाहणे..
#कवी: मंगेश पाडगावकर

का मैत्री जपावी अन् सत्तेतही उपाशी राहावे
मी ओळखून आहे सारे पराभवाचे बहाणे

पक्षास "दादांचा" का सांग भार व्हावा?
मिटताच (कमळाच्या) पाकळ्या अन् का शून्यही दिसावा?
हे प्रश्न जीवघेणे हरती जिथे "शहा"णे
मी ओळखून आहे सारे पराभवाचे बहाणे

हाती धनुष्य ज्याच्या 🤣 त्याला कसे आवरावे?
हृदयात सल ज्याच्या त्यालाच दुःख ठावे!
तिरप्या चाली सोळा, आम्ही इथे उताणे
मी ओळखून आहे सारे पराभवाचे बहाणे

का मैत्री जपावी अन् सत्तेतही उपाशी राहावे
मी ओळखून आहे सारे पराभवाचे बहाणे

Sunday, September 15, 2024

महाराष्ट्राच्या राजकारणात काय होईल? - विधानसभा 2024

अतिशीर्ष टीप: हे केवळ ज्योतिषीय अंदाज आहेत कोणीही याचा उपयोग सट्टा, पैजा यासाठी करू नये.


भारताच्या मतदारांनी गेल्या दशकातील अतिशय अनपेक्षित आणि धक्कादायक निकाल केंद्रात मतदान केल्यानंतर साऱ्या देशाचे लक्ष हरयाणा, जम्मू काश्मीर, झारखंड आणि महाराष्ट्र या चार राज्यांच्या निवडणुकीकडे लागले आहे.

आपण महाराष्ट्रात राहतो, त्यामुळे आपण फक्त महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करू... मुख्य निवडणूक आयोगाची मान्यता असलेले सात पक्ष यांचा विचार करूया.. त्यासाठी मुंबई चे तुळ संक्रमण कुंडली आणि प्रत्यक्ष निवडणूक ज्या महिन्यात होण्याची चिन्हे दिसतंय असे नोव्हेंबर चा उत्तरार्ध आणि डिसेंबर चा पूर्वार्ध 2024 चे मुंबई चे वृश्चिक संक्रमण पाहुयात....
टप्प्याटप्प्याने अंदाज घेत आपण आपण साधारण सत्ता कोणाची येईल याचे जितके जमेल तितके सुस्पष्ट चित्र उभारण्याचा प्रयत्न करू...

काही गोष्टी ठरवून घेऊ...
हा लेख लिहिताना रवी सिंह राशीत आहे आणि गोष्टी 18 सप्टेंबर 2024 पासून घडायला सुरू होतील..
१. जनता जनमानस लग्नातून बघायचा..
२. सत्ताधारी (शिवसेना शिंदे) दशमातून 
३. त्यांचे मित्र (भाजप/अजितदादा) अष्टमातून
४. विरोधक (काँग्रेस) चतुर्थातून
५. त्यांचे मित्र (उद्धव ठाकरे आणि शरद पवार) चतुर्थाच्या लाभातून म्हणजे द्वितीय स्थानातून बघायचं...
६. जागा वाटप हा एकप्रकार चा करार असतो तो तृतीय स्थानातून पाहतात.. आता दशमाचे तृतीय म्हणजे व्यय आणि विरोधकांचे तृतीय म्हणजे षष्ठ स्थान निश्चीत करू
७. न्यायालयाची भूमिका महत्त्वाची आहे दोन गट आपत्रतेच्या उंबरठ्यावर आहे आणि त्यात न्यायालय महत्त्वाचे आहे.. ते नवम स्थानावरून बघुयात...
८. अति महत्त्वाचे : 18 सप्टेंबर 2024 पासून पितृ पंधरवडा आहे.. म्हणजे निवडणूक आयोगाने जर 18 सप्टेंबर 2024 च्या आधी निवडणूक नाही जाहीर केली तर ती सर्वपित्री नंतर म्हणजे घटस्थापनेला होण्याची अतीदाट शक्यता आहे...

पहिल्यांदा निवडणुकीची रंगभूमी सजवणारा सप्टेंबर/ऑक्टोबर 2024 (कन्या संक्रांती) ची कुंडली ⬇️
ठळक दिसणाऱ्या गोष्टी:
लग्नात द्विस्वभावी राशी आणि राहू नेपच्यून आहे म्हणजे जनता अजूनही संभ्रमावस्थेत आहे. नक्की काय चाललंय काही कळत नाही.

व्यय स्थानात चंद्र शनी युती आणि षष्ठात बुध शनी च्या दृष्टीत म्हणजे दोन्ही कडचे जागावाटप निश्चित नाही. सत्ताधाऱ्याचे जागावाटप मनासारखे होणार नाही... विरोधकांचे जागावाटप सुसंवादाभावी अर्धवट राहील.. विरोधकातील मुख्य पक्ष (काँग्रेस) ने अडेलतटू पणाची भूमिका घेईल... तृतीयेश सिंह या स्थिर राशीत शनीच्या दृष्टीत..

न्यायालयाने अपात्रतेची केस 21 ऑक्टोबर 2024 पर्यंत अधांतरी ठेवलंय... जे नवमेश मंगळ मिथुन या द्विस्वभावी राशीतून दिसतंय...

19 सप्टेंबर 2024 ला शेअर बाजार गटांगळ्या खाईल...

सत्ताधाऱ्यामधील मित्र पक्षाचे प्रतिनिधित्व शुक्र करत आहे तो रवी आणि केतू च्या युतीत आहे. शुक्र असल्याकारणाने ज्या पक्षाने स्त्रीसुलभ भूमिका घेतली आहे अजितदादा (गुलाबी रंग, गुलाबी पोस्टर सगळंच गुलाबी) कदाचित राजीनामा देऊ शकतील... कारण केतू तुकडे पाडतो, वेगळा करतो, अलिप्त करतो.. (हे 18 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2024 पर्यंत होऊ शकते)

एखादे गोड आश्वासन देऊन मराठा आरक्षण थंड बस्तानात टाकले जाईल....

दशमेश गुरू विरोधकांच्या व्ययात आहेत म्हणजे किमान सप्टेंबर/ऑक्टोबर एकनाथ शिंदे यांना अनुकूल आहे..

आता जाऊ तुळ संक्रांती (17 ऑक्टोबर 2024 ते 16 नोव्हेंबर 2024) कडे...⬇️

ठळकपणे दिसणाऱ्या गोष्टी...
17 ऑक्टोबर 2024 पर्यंत निवडणुका जाहीर झाल्या असतील महाराष्ट्रात आचारसंहिता लागली असेल.
 
लग्नात लाभेश रवी आला आहे जनतेला सरकारी योजनेचे लाभ पोहोचून दृश्य परिणाम दिसू लागतील कारण रवी हा सरकारी गोष्टींचे प्रतिनिधित्व करतो.. 

दशमेश चंद्र राहू - नेपच्यून च्या युतीत आहे.. सत्ताधारी शिंदे शिवसेना यांच्यात चलबिचल सुरू होईल.. आता शिंदेंच्या शिवसेनेत धावपळ सुरू होईल... हीच वेळ आहे जेव्हा सत्ताधाऱ्यांनामध्ये जगावाटपावरून फिस्कटणार आहे कारण व्यय स्थानात केतू आहे.. याच काळात सत्तेतल्या मोठ्या पक्षाच्या महिला नेतृत्व पक्षांतर करून विरोधकांचे चेहरा होऊ शकते...

शष्ठेश अष्टमात गुरू स्थिर राशीत आहे. विरोधातला धार्मिक पक्ष(उबाठा) आणि सत्तेतला धार्मिक पक्ष (भाजपा) यांचे गुप्त (अष्टम स्थान) चर्चा सुरू होऊ शकते.. पडद्यामागच्या हालचालीना वेग येईल कारण चर लग्न आहे.. भाजप हळूहळू सेंटर स्टेज ला येऊ शकेल...

जर अजितदादांनी स्वतःहुन राजीनामा दिला नाही तर भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढू शकतात याचा निर्णय घटस्थापनेच्याअलीकडे पलीकडे होऊ शकतो..

कोर्टाची पुढची तारीख 21 ऑक्टोबर 2024 आहे.. नवमेश बुध लग्नात चर राशीत आहे म्हणजे निर्णय प्रक्रियेत गती येईल पण निर्णय होणार नाही.. एक शेवटची तारीख दिली जाईल.. 

मुख्य विरोधी पक्ष चतुर्थात प्लूटो आहे आणि चतुर्थेश पंचमात स्थिर राशीत दशमाच्या अष्टमात आहे. काँग्रेस चा फोकस शिंदेंच्या शिवसेनेकडे जाऊन एकनाथ शिंदे टीकेचे धनी होऊ शकतात.. स्वतः काँग्रेस मध्येही काही दिग्गज नेत्यांना मोठी जवाबदारी मिळू शकते... विरोधी पक्षांचे मित्र (उद्धव ठाकरे आणि शरद पवार) महिला मुख्यमंत्री चा चेहरा पुढे करू शकतात...

आता खरोखरचे घोडा मैदान अर्थात निवडणुका (वृश्चिक संक्रमण 16 नोव्हेंबर 2024 ते 15 डिसेंम्बर 2024) ⬇️
आता मात्र रणांगण आहे.. 
या कुंडलीचा विचार करता आधी हे बघू कोर्टात काय होतंय...
लग्नेश मंगळ नवमात आहे नवमेश चंद्र गुरू बरोबर स्थिर राशीत आहे. न्यायचा कारक शनी ची दशमेशावर दृष्टी आहे. दोन्ही फुटीर गटातील आमदार अपात्र होण्याची शक्यता कमी आहे.

निवडणूक ज्या वृश्चिक संक्रमणात होणे जवळपास निश्चितपणे दिसत आहे तिथे दशमेश रवी गुरू, हर्षल, शनीच्या संयुक्त दृष्टीत आहे. पंचमात राहू नेपच्यून शेअर बाजार मध्ये अनिश्चितता राहील.. विरोधी पक्षाचा कारक शनी स्वराशीत स्थानात आहे त्या अर्थी काँग्रेस प्रबळ पक्ष राहील. 

केंद्रात गुरू असल्याकारणाने पूर्ण धार्मिक आधारावर झालेली पक्ष - युती हर्षल बरोबर असल्याने अनपेक्षित वाढीव जागा मिळतील.. 

पक्ष निहाय अंदाज:

काँग्रेस: 70-75 (चतुर्थताला शनी) गेल्या तीन निवडणुकीतील सगळ्यात चांगले आकडे..
भाजप: 90-95 (केंद्रातला हर्षलयुक्त गुरू)
शिंदे: 30-35 ( गुरू हर्षल शनीच्या दृष्टितला रवी)
ठाकरे: ~ 30
शरद पवार: ~ 40
अजितदादा: ~ 10-12
इतर: 15-16

- हर्षद मोहन चाफळकर,
150920240025

परीक्षेतील घोळ घोटाळे अन बरंच काही....

12वी इंग्लिश च्या पेपर ला मुलांना सहा गुण मिळणार - बातमी.. प्रश्नपत्रिका च्या ऐवजी model answer छापलं तर हेच करावं लागेल.. पण समजा अशी चूक प...