Wednesday, May 25, 2022

जे का गंजले भंगले..

#विडंबन #विभंग

मूळ रचना: संत तुकाराम

जे का गंजले भंगले ।
त्यासि म्हणे जो आपुलें ॥१॥

तो चि "नवाब" ओळखावा ।
"मलिक" तेथें चि जाणावा ॥२॥

जैसे दैनंदिन खवळीत।
तैसे "संजयाचे" पित्त ॥३॥

जोही घोटाळे काढी ।
त्यासि "किरीट" म्हणा हृदयी ॥४॥

दया करणें जें "परबासी" ।
ते चि "मातोश्री" चे दासी ॥५॥

हर्षा म्हणे सांगू किती ।
यांच्या घोटाळ्याच्या कीर्ति ॥६॥

#NawabMalik #KiritSomaiya #SanjayRaut #AnilParab

- हर्षद मोहन चाफळकर , पुणे
२६०२२०२२००५३

Saturday, May 14, 2022

मतदार

जवाहर राठोड यांच्या #पाथरवट या कवितेच्या प्रेरणेतून...

#मतदार..

आम्ही मतदार..
नेमाने करतोय मतदान..
ज्या मताने तुम्हाला दिलेत सत्ता आणि अधिकार..
आम्ही मात्र रोजगारासाठी, सुसह्य आयुष्यासाठी,
रोजच नुसती धावपळ करतो..
दुसर काय? दुर्दैव आमचं...

आम्हीच निवडून दिलेल्या सरकार 
कडून आम्हीच पिसले जातोय..
आमच्या मंत्र्याने तर एकदा कमालच केली..
जिथे तिथे भ्रष्टाचार करून स्वप्न आमची चोरली गेली..
उद्ध्वस्त झालेल्या आमच्या आयुष्याच्या आरश्यातून
मतपेट्यांच गणित तुम्ही पाहता अन् म्हणता,
ताई! माई!!  अक्का!!!

तुमच्या पंजा, घड्याळ, कमळाला
बाणाला, इंजिनाला..
आम्हीच मत दिलीत..
आता तुम्हीच खर सांगा..
तुम्ही आमचे नेता की
आम्हीच तुमचे पिता??

अरे ! आमच्या मतासाठी नट, नट्या, खेळाडू 
आमच्या दारात उमेदवाराचे सोंग घेवून आले...
त्यांना आम्ही निराश केलं नाही...
उदार कर्णासारखे विश्वास आणि मते 
त्यांच्याही झोळीत आम्हीच टाकलीत...
त्याच जोरावर आज भत्ते आणि पेन्शन ओरबाडतायत..

मतदारांनो सावध व्हा!!!
आता यांना प्रश्न विचारावे लागतील...
जेव्हा वापरू आपल्या हाती असलेला NOTA
तेव्हा हेच नेते पाहतील केविल वाण्या नजरेने
यांच्यातील भ्रष्टाचारी भस्मासुराचा शेवट झालेला...

- हर्षद मोहन चाफळकर , पुणे
१४०५२०२२१००६

आरंभी धरीन अयोध्येच्या वाटा

#TempleRun #AyodhyaVisit #RamJanmabhoomi 

#विभंग (अभंगाचे विडंबन)

मूळ अभंग: समर्थ रामदास...

आरंभी धरीन अयोध्येच्या वाटा ।
सध्याचिया काळा गरज असे ।।१।।

पावेल का राम? "राज"संकट काळी।
रामनाम "राजा" उच्चरित ।।२।।

उच्चारितां राम होय साफ भूत (काळ) ।
"राजा"चा निश्चय रामभूमी ।।३।।

रामभूमी "राज"कारण्यासी आठवे ।
"राज"धर्म नाठवें काही केल्या ।।४।।

काही केल्या मनसे मत का मिळेना?।
हर्षा म्हणे मतदार व्हा चाणाक्ष ।।५।।

- हर्षद मोहन चाफळकर ,
१००५२०२२२३४२

परीक्षेतील घोळ घोटाळे अन बरंच काही....

12वी इंग्लिश च्या पेपर ला मुलांना सहा गुण मिळणार - बातमी.. प्रश्नपत्रिका च्या ऐवजी model answer छापलं तर हेच करावं लागेल.. पण समजा अशी चूक प...