जवाहर राठोड यांच्या #पाथरवट या कवितेच्या प्रेरणेतून...
#मतदार..
आम्ही मतदार..
नेमाने करतोय मतदान..
ज्या मताने तुम्हाला दिलेत सत्ता आणि अधिकार..
आम्ही मात्र रोजगारासाठी, सुसह्य आयुष्यासाठी,
रोजच नुसती धावपळ करतो..
दुसर काय? दुर्दैव आमचं...
आम्हीच निवडून दिलेल्या सरकार
कडून आम्हीच पिसले जातोय..
आमच्या मंत्र्याने तर एकदा कमालच केली..
जिथे तिथे भ्रष्टाचार करून स्वप्न आमची चोरली गेली..
उद्ध्वस्त झालेल्या आमच्या आयुष्याच्या आरश्यातून
मतपेट्यांच गणित तुम्ही पाहता अन् म्हणता,
ताई! माई!! अक्का!!!
तुमच्या पंजा, घड्याळ, कमळाला
बाणाला, इंजिनाला..
आम्हीच मत दिलीत..
आता तुम्हीच खर सांगा..
तुम्ही आमचे नेता की
आम्हीच तुमचे पिता??
अरे ! आमच्या मतासाठी नट, नट्या, खेळाडू
आमच्या दारात उमेदवाराचे सोंग घेवून आले...
त्यांना आम्ही निराश केलं नाही...
उदार कर्णासारखे विश्वास आणि मते
त्यांच्याही झोळीत आम्हीच टाकलीत...
त्याच जोरावर आज भत्ते आणि पेन्शन ओरबाडतायत..
मतदारांनो सावध व्हा!!!
आता यांना प्रश्न विचारावे लागतील...
जेव्हा वापरू आपल्या हाती असलेला NOTA
तेव्हा हेच नेते पाहतील केविल वाण्या नजरेने
यांच्यातील भ्रष्टाचारी भस्मासुराचा शेवट झालेला...
- हर्षद मोहन चाफळकर , पुणे
१४०५२०२२१००६
No comments:
Post a Comment