Sunday, June 30, 2024

विजेतेपदाचा सुखद धक्का


२००७ ते २०२३ : थोडी खुशी ज्यादा गम 

  २००७ च्या अपयशी कॅरेबियन सफरीत खेळाडू असणारे द्रविड आता मुख्य प्रशिक्षक होता आणि अजित आगरकर निवड समितीचा अध्यक्ष.. गेल्या  १७ वर्षात क्रिकेटच्या दोन पिढ्या पुढे सरकल्या होत्या.. २००७ पासून २०२४ पर्यन्त भारतीय संघ तीनदा विजयी झाला पण, अनेक वेळा भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन अपयशी ठरला अगदी मोजदाद करायची  म्हटली तर २००७ चा टी  २० विजय, २०११ चा मुंबई च्या वानखेडे मैदानात विश्व विजय, २०१३ चि चॅंपिन्स ट्रॉफी शेवटची त्यानंतर मात्र सातत्याने विजयश्रीने  हुलकवणीच दिली. २०१४ ला  अंतिम सामन्यात श्रीलंकेकडून पराभव,  २०१५ ला ऑस्ट्रेलिया कडून पराभव, २०१६ ळा वेस्ट इंडिज कडून पराभव, २०१७ ळा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान कडून प्रभाव, २०१९ ळा सगळे पत्ते आपल्या बाजूने असताना सुद्धा सेमी फायनल दोन दिवस चालली आणि न्यूझीलंड ने पुनः संधि साधली.. २०२१ पहिल्यांदा वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तान कडून हरलो  आणि परत तो वर्ल्ड कप फक्त होऊन गेला.. २०२२ ला ऑस्ट्रेलिया मध्ये सेमी फायनल पर्यन्त खूप चांगले खेळलो, विराट ने पाकिस्तान च्या तोफखान्याला लायकी दाखवणारी खेळी केली.. मात्र पुनः एकदा सेमी फायनल ला जॉस बटलर आणि इंग्लंड आडव आल.. २०२३ मध्ये तीन महिन्यांच्या अंतरात दोन संधि  येऊन पण आपण अपयशी ठरलो आधी टेस्ट चॅंपियनशिप आणि मग घरच्या मैदानावरचा एकदिवसीय वर्ल्ड कप अक्षरश: हातातून निस्टला...

२०२४ चे सरप्राइज 

२०२४ ला खरतर कोणाचीही अपेक्षा नव्हती कारण सगळ्यांनी गृहीत धरल होत की पुन्हा आपण सेमी  फायनल ला  जाऊ आणि ऑस्ट्रेलिया ,  इंग्लंड, वेस्ट इंडिज आस कोणीतरी आपल्याला गाठेल आणि पुन्हा एकदा आपण माती खाऊ.. स्पर्धेची गटवारी जाहीर होताच सगळ्यांना आस भारत-पाकिस्तान सामन्याची.. त्या ९ जून रोजी झालेल्या सामन्यात भारतीयांनी पहिल्यांदा बॅटिंग करताना ११९ धावा केल्या आणि थोडी धाकधूक वाढली.. पण, त्या दिवशी पाकिस्तान ने आम्ही तुमच्यापेक्षा किती वाईट खेळू शकतो याचा नमूनाच  दाखवला.. १२० करायचे असताना पाकिस्तान ११३ पर्यंतच धापा टाकत  पोहोचला.. तो विजय भारतीय संघला बूस्टर ठरला आणि पुढच खर आव्हान ऑस्ट्रेलिया च सुपर ८ गटात.. 

या स्पर्धेत अफगाणीस्तान  ने बऱ्यापैकी प्रगती केली त्यांनी ऑस्ट्रेलिया ला हरवून भरतीयांना ऑस्ट्रेलिया सेमी फायनल च्या आधी बाहेर काढायची संधि दिली आणि भारतीय संघाने ती साधली सुद्धा ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्यांदा बॅटिंग करताना २०० पार धावा केल्या नंतर ऑस्ट्रेलिया ला फिरकी च्या जाळ्यात अडकवून सिडनी चे तिकीट काढून दिले..  

दुसऱ्या बाजूने कधी नव्हे ते दक्षिण आफ्रिकेला सुर गवसला होता. अगदी लीलया सहज  नाही तरी कसेबसे अगदी कठीण सामने जिंकत जिंकत अजिंक्य राहत दक्षिण आफ्रिका सेमी फायनल ला पोहोचली.. मध्ये येणाऱ्या इंग्लंड, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड सारखे संघ बाद करत आफ्रिका सेमी फायनल ळा अफगाणिस्तान समोर उभी ठाकली. अफगाणिस्तान चि प्रगती आणि दक्षिण आफ्रिकेचा इतिहास बघता अफगाणिस्तान ला जवळ जवळ सगळ्यांनी संधि दिली  होती . पण रबाडा , नॉकिया, शमसी, महाराज यांच्या आक्रमाणपुढे अफगाणिस्तान ५६ धावात गारद झाली आणि दक्षिण आफ्रिका त्यांच्या इतिहासात पहिल्यांदा अंतिम  फेरीत पोहोचली.. 

भारतीय संघाला पहिल्या दिवसापासून माहीत होत की आपण सेमी फायनल ला पोहोचलो  तर आपला सामना गयाना च्या प्रॉव्हीडन्स  मैदानात होईल शिवाय दिवसा होईल. सेमी फायनल ला इंग्लंड समोर होते. २०२२ ची टी अडिलेड चि सेमी फायनल अजून विसरले नव्हते. पहिली  बॅटिंग करताना भारतीय संघाने १७१ धावा केल्या आणि इंग्लंड ने १०३ धावतच नांग्या टाकल्या भारतीय फिरकी त्रिकुट आणि बूमराह अरशदिप ची  बॉलिंग साहेबांना झेपली नाही आणि रोहित च्या संघाने २०२२ आणि २०२४ असा दुगना लगान  वसूल केला..  


अंतिम सामन्याचे नाट्य :

कायम सेमी फायनल/फायनल  ला येऊन हरणारा भारत आणि पहिल्यांदाच फायनल चे तिकीट मिळालेला दक्षिण आफ्रिका अंतिम सामन्यात आमने सामने होते. दोन्ही संघ मोक्याचा क्षणी हरण्यासाठी नावाजलेले होते. दक्षिण आफ्रिकेला तर दुर्दैवाचा इतिहास होता. कधी १९९२ साली पाऊस, कधी १९९९ मध्ये ऐनवेळी  केलेली हराकिरी, कधी २००३ साली घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध न सुटलेल डकवर्थ ल्युइस चे गणित, २००७ , २०१४, २०१५ ची अतिघाई असा सगळ्या इतिहासाचे ओझे पाठीवर घेऊन आफ्रिका फायनल ला पोहोचले होते. हा इतिहास पाहता भारतीय संघाला सगळ्यांनी फेवरेट चा टॅग  दिल होता. नाणेफेक जिंकून भारतीयांनी पहिल्यांदा बॅटिंग केली. पहिल्या  ओव्हर मध्ये संपूर्ण स्पर्धा शांत राहिलेला विराट कोहली तुटून पडला, दुसऱ्या बाजूने रोहित शर्मा फटकेबाजी करत असताना  केशव महाराज च्या फिरकीत रोहित शर्मा अडकला आणि त्याने विकेट फेकली. नंतर आलेला रिषभ पंत आणि सूर्यकुमार यादव दोघेही आल्या पावली  माघारी फिरले. ६ ओव्हर नंतर भारत ४२/३ 

इथून पुढे कोहली आणि अक्षर पटेल ने ढासळलेला किल्ला बांधायला घेतला अक्षरच्या ४७ आणि कोहली शेवटपर्यंत टिकून राहून  केलेल्या ७६ धावांनी  भारतीय संघाच्या धावसंख्येला आकार आला . त्याला शिवम दुबे आणि इतरांनी चांगली साथ दिली . १७६ धावा तश्या अंतिम सामन्यात खूप होत्या पण समोर दक्षिण आफ्रिका सहजासहजी हार पत्करणार नाही ही माहीत होत. 


आफ्रिकेचा पाठलाग सुरू झाला, पहिली  ओव्हर अरशदिप ने चांगली टाकल्यावर दुसरी ओव्हर बूमराह ने टाकली त्या ओव्हर मध्ये रिझा हेंड्रिक्स  ला टाकलेला बॉल फ्रेम करून घरात लवण्याजोगा होता.. पुढच्याच ओव्हर मध्ये अरशदिप ने मार्करम ची  विकेट काढली  आणि आफ्रिकेच्या डोक्यावर  इतिहासाचे भूत नाचू लागल. नवखा ट्रीस्टन स्टब्ज  आणि डी कॉक आफ्रिकेचा किल्ला लढवत राहिले.. १० ओव्हर पर्यन्त आफ्रिकेचा पाठलाग बरोबर मध्यावर आला होता. ८१/३ . पुढच्या दहा षटकात आफ्रिकेला ९६ धावा करायच्या होत्या ७ विकेट हातात होते. १२ व्या ओव्हर मध्ये १००, १५ व्या ओव्हर मध्ये १४७ इतक सुरळीत चालू होत. पण, अजून भारताने आपला अखेरचा हुकमी एक्का बाहेर काढायचा होता. मिलर आणि क्लासेन यांनी अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा सहज खेळून काढले होते. 



आणि ,आफ्रिकेच्या हराकिरी चा क्षण आला.. 

३० बॉल, ३० रन, ६ विकेट हातात..  इतके सरळ गणित समोर होत. एव्हाना सोशल मीडिया वर जडेजा, अक्षर पटेल यांनी शिव्या खायला सुरुवात केली होती . इथून सामना फिरला... बूमराह  ने १६ वी ओव्हर टाकली आणि ४ च रन  दिल्या १७ वी हार्दिक ने टाकली  क्लासेन ला घालवला आणि पुन्हा ४ च रन दिल्या.. १८ बॉल २२ रन ५ विकेट हातात... . १८ वी ओव्हर पुन्हा बूमराह आता त्याने यांसेन ची विकेट काढली आणि २ च रन दिल्या.. १२ बॉल २० रन..  मिलर अजून टिकून होता त्याला  २० रन म्हणजे ६ बॉल चा खेळ होता.  १९ वी  ओव्हर अरशदिप ने टाकली. केशव महाराज आणि मिलर यांची नाकेबंदी  खरेतर याच ओव्हर मध्ये झाली..

सगळी सूत्र आफ्रिकेच्या हातात असताना ते ३० बॉल ३० रन वरुन ६ बॉल १२ रन पर्यन्त येऊन पोहोचले यालाच क्रिकेटच्या भाषेत "चोकर्स " म्हणतात..

गेली तीन-चार महीने सोशल मीडिया वर प्रचंड ट्रॉल झालेला हार्दिक पंड्या शेवटची ओव्हर टाकणार होता.. आधीच आयपीएल मधली  कॅप्टनसी वरुन झालेला वाद, वैयक्तिक आयुष्यातली वादळ सगळी त्या शेवटच्या ६ बॉल पाशी येऊन थांबली.  इथून हार्दिक हीरो होणार होता  किंवा अक्षरश : मानसिक पातळीवर खचणार होता. कोण पहिले शस्त्र टाकतो यावरच फायनल येऊन ठेपली होती..  हार्दिक च्या ओव्हर चा पहिला बॉल मिलर खेळणार होता आणि तोच आफ्रिकेचा कर्ता करविता होता.. संपूर्ण दक्षिण आफ्रिका  त्याच्याकडे आस लावून होता.. हार्दिक ने एक लो फुलटॉस दिला आणि मिलर ने तो सरळ भिरकवला बॉल हवेत कित्येकांचा जीव टांगणीला.. बाउंडरी वर सूर्यकुमार यादव ने तो कॅच घेतला आणि क्रिकेट जगताला १९८३ च्या कपिल देव ने घेतलेल्या व्हीव रिचर्डस च्या कॅच ची आठवण झाली .. मिलर ची  विकेट पडली होती  आणि आफ्रिका आपले खरे रंग दाखवत होत.. आजवर असे  हाततोंडाशी आलेले अनेक घास आफ्रिकेने स्वकर्माने घालवले होते. काल त्याचीच पुनरावृत्ती झाली..१६ धावा पाहिजे असताना आफ्रिका ८ च करू शकली.. आणि भारताने आपला १३ वर्षांचा दुष्काळ संपवला.. भारत १७ वर्षांनी पुन्हा एकदा टी २० विश्वविजेता  झाला होता.. 

रो - को ची परफेक्ट एक्जिट:




रोहित शर्मा आणि विराट कोहली गेली जवळजवळ दीड दशक भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतायत. या विजेतेपदानंतर दोघांनी टी २०  प्रकाराला राम राम केला विजयाच्या शिखरावर असताना निवृत्ती घेण्याचे शहाणपण दोघांनी दाखवले. जे तेंडुलकर ला  २०११ साली आणि धोनी ला २०१९ साली जमल नाही ते या दोघांनी करून दाखवल.  लेख लिहीत असताना रवींद्र जडेजा ही त्यांना सामील झाल्याचे कळले.. राहूल द्रविड च्या प्रशिक्षक पदाची हि शेवटची स्पर्धा होती.. अंत भला तो सब भला या उकतीनुसार कोहली, रोहित, शर्मा, जडेजा आणि राहूल द्रविड यांची कारकीर्द सफल संपूर्ण झाली.. 

हर्षद मोहन चाफळकर, पुणे 

३००६२०२४२१४० 

No comments:

Post a Comment

espncricinfo प्रश्न

मी विचारलेला प्रश्न espncricinfo वर प्रकाशित झाला