Sunday, June 23, 2024

लेफ्ट आर्म चायनामन -कुलदीप यादव

 सकाळी 7 ला कॉलेजात पोहोचलो..
दोन लेक्चर घेतले मग ऑफ होता म्हणून टेस्ट मॅच मध्ये डोकावलं... (हो, मी #INDvsBAN टेस्ट मॅच ही बघतो...)

तोपर्यंत टॉस होऊन बांगलादेश ची बॅटिंग सुरू झाली होती.. मग नंतर चर्चा सुरू झाली कुलदीप यादव ला बसवला म्हणून....मागच्या मॅच मध्ये #POTM होता तो... आणि या मॅच मध्ये बसवला??? It happens only in India...

अस पहिल्यांदा झालंय का अजिबात नाय.. श्री श्री श्री राहुल (इंदिरा नगर का गुंडा) द्रविड हे #मुलतान2004 मध्ये कॅप्टन होते.. तेंडुलकर 194* होता.. पण सेहवाग ची ट्रिपल सेंच्युरी बघून कंटाळलेल्या ट्रिपल श्री राहुल (इं न का गुं) द्रविड यांनी हात वर उंचावून डाव घोषित केला... तेंडुलकरची एक डबल सेंच्युरी राहून गेली हा खदखद कायम राहिली.. बहुतेक सचिन ने ते लिहल पण आहे बहुतेक...

असो... विषय कुलदीप यादव चा आहे.. एकतर रिस्ट स्पिनर (मनगटी फिरकी गोलंदाज) ही फार तुरळक जमत आहे.. फार लोकं याच्या भानगडीत पडत नाहीत...

अगदी मोजता येण्यासारखे लेगस्पिनर माहीत आहेत जगात..
सोबर्स चा आवडता सुभाष गुप्ते...
पाकिस्तान चा अब्दुल कादिर
ऑस्ट्रेलिया चे रिची बेनो आणि लेगस्पिन चा कोहिनुर हिरा शेन किथ वॉर्न...

मला एवढेच लख्ख आठवतात (बाकी जाणकार कॉमेंटतील)...

कुलदीप यादव हा लेफ्ट आर्म चायनामन..
आजच्या काळात किंवा नजीकच्या भूतकाळात जरी डोकावलं..

तर, कुलदीप यादव, ब्रॅड हॉग, लक्षण संदकन, दोन अडीच दशकापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा पॉल एडम्स (चायनामन??) इतकेच डोक्याला ताण देऊन आठवतात...
कुलदीपचं नशीब इतकं खराब आहे की, त्याला उपखंडात मोक्याच्या मॅच ला बसवतात आणि लोर्ड्स, न्यूझीलंड सारख्या हिरव्यागार खेळपट्टी वर खेळतात... 

आज त्याने काय त्या राहुल च घोड मारलं होत राहुल लाच माहीत...

हर्षद मोहन चाफळकर
२२१२२०२२१०१६


No comments:

Post a Comment

espncricinfo प्रश्न

मी विचारलेला प्रश्न espncricinfo वर प्रकाशित झाला