समूहवरील ज्योतिष अभ्यासकांना हर्षद मोहन चाफळकर चा नमस्कार समूहात कृष्णमूर्ती पद्धतीचे अभ्यासक वाढतायत हे माझ्या सारख्या केपी अभ्यासकाला आणि अनुभव घेतलेल्या व्यक्तीला आनंददायी आहे.
समूहावर प्रश्न विचारलाय LSRD म्हणजे काय, त्याचा उपयोग कसा करतात?
तर मित्रांनो आपण पारंपरिक मध्ये जी प्रश्नकुंडली मांडतो अगदी तशीच प्रश्नकुंडली केपी त मांडतो.
त्या प्रश्नकुंडलीत खालील प्रमाणे RULING PLANET (RP) म्हणजेच "तात्कालिक कार्येश ग्रह" मिळतात या RP चा वापर करून
पुढच्या काही तासात निश्चित घडणाऱ्या गोष्टी(उदा. गेलेली लाईट कधी येईल) ते एक वर्षात निश्चित घडणाऱ्या घटना अचूक पणे सांगता येतात. (उदा. 11 वी ला प्रवेश कोणत्या कॉलेजात मिळेल. इच्छित कॉलेज मध्येच मिळेल का?)
एक दंडक मात्र ज्योतिषाने ठेवलाच पाहिजे तो म्हणजे LSRD ही "यक्षिणी ची कांडी" आहे. जेव्हा ज्योतिष्याच्या अगदी गळ्याशी आले असेल तेव्हा आणि तेव्हाच LSRD चा वापर करावा.
🔷त्या प्रश्नकुंडली चा लग्नराशीचा स्वामी हा L
🔷त्या दिवशी जे चंद्र नक्षत्र असते ते तो नक्षत्रस्वामी STAR हा S
🔷त्यादिवशी जी राशी असते त्याचा स्वामी हा R
🔷तर त्या दिवशी जो वार आहे तो DAY होतो D
जर या चार स्तरात एकाच ग्रहांचे प्राबल्य आले तर हातचा म्हणून लग्ननक्षत्र स्वामी LS घेऊ शकतो.
याशिवाय या चार ग्रहांच्या युतीत ले, त्यांच्यावर दृष्टी असणारे (लक्षात घ्या या चार ग्रहांवर ज्या ग्रहांची दृष्टी आहेत ते ग्रह, ता ग्रहांची दृष्टी नको.) ग्रह घेऊ शकतो.
जर LSRD मध्ये राहू किंवा केतू आला तर त्यांचा राशी स्वामींचा प्राधान्याने विचार करावा उदा. सध्या राहू मिथुन व केतू धनू राशीत आहे आणि समजा RP मध्ये राहू आला तर बुधाचा विचार प्राधान्याने करावा लागेल कारण प्रश्नकुंडलीत (फक्त प्रश्नकुंडलीतच राहू केतू राशी स्वामी प्रमाणे फळ देतात.)
समजा या LSRD मध्ये आलेला ग्रह वक्री असेल तर तो ग्रह मार्गी होई पर्यंत घटना नक्की घडणार नाही.
LSRD मध्ये
1.कुठेही शनी आला तर उत्तर नकारात्मक द्यावे किंवा विलंब सांगावा हे त्या प्रश्नकुंडली पुरतेच समजावे.
2. गुरू आला तर नक्की घटना घडेल असे सांगावे.
3. बुध आला तर दोन शक्यता सांगाव्यात.
4. चंद्र आला तर घटना लवकर घडेल असे सांगावे.
5. मंगळ, राहू, केतू आला तर थोडा त्रास मनस्ताप संभवतो असे सांगावे.
6. शुक्र आला तर स्त्री कडून काम होऊ शकेल असे सांगावे.
7. सरकारी काम असेल आणि LSRD मध्ये रवी आला तर आशादायक असते.
📆आता कालनिर्णय कसा करायचा?📆
🔷घटना काही तासात होणे अपेक्षित असेल तर आलेल्या LSRD च्या लग्न, लग्ननक्षत्र, सब, सब सब मध्ये घटना घडेल असे सांगावे. बुध असेल तर पहिले लग्न सोडावे.
🔷घटना काही दिवसात मात्र एका महिन्यात होणार असेल तर चंद्राचे वर आलेल्या LSRD च्या राशी, नक्षत्र, सब, मधून भ्रमण होत असताना घटना घडेल असे सांगावे.
🔷घटना वर्षभरात घडणार असेल तर रवीचे LSRD च्या राशी, नक्षत्र, सब, सब सब मधून होत असताना घटना घडेल असे सांगावे
🔷 वर्षभर पेक्षा जास्त कालावधी असेल तर LSRD चा वापर करू नये. सरळ जन्मलग्नकुंडली पहावी.
आता शेवटी LSRD मध्ये आलेल्या ग्रहांचे महत्व किती तर
L- 100%
S- 75%
R- 50 %
D- 25%
लग्ननक्षत्रस्वामी (LS) हा नक्षत्रस्वामी(S) पेक्षा बलवान जाणावा.
माझ्या अल्पमती ला जेवढे सुचले तेवढे लिहून काढले काही गोष्टी राहून गेल्या असतील, चुकल्या असतीलतर चुकभुल देणे घेणे.
🙏।।श्रीदत्तात्रयर्पणमस्तू।।🙏
हर्षद मोहन चाफळकर,
ज्योतिष विशारद, पुणे
०४१२२०१९१९२४
No comments:
Post a Comment