मुलाचे मकर लग्न लग्नेश लाभात शत्रू राशीत चंद्राचा सानिध्यात व्यक्तीचा आत्मविश्वास कमी करते.
विवाहासाठी आणि वैवाहिक सुखासाठी द्वितीय, पंचम, सप्तम लाभ स्थानांचा आणि भावेशांचा विचार करू.
पहिल्यांदा कुटुंब स्थान बघुयात कुटुंब स्थानात कोणतही ग्रह नाही कुटुंबश शनी लाभात शत्रू राशीत निषफल झाला.
पंचमात बुध षष्ठेश होऊन, त्यावर शनी चंद्राची दृष्टी पंचम स्थान बाधित करते.पंचमेश शुक्र चतुर्थात स्वतःच्या व्यायात म्हणजे मुलाकडे *प्रेम* हा विषय सोडूनच द्या.
सप्तमेश लाभात हा चांगला योग आहे मात्र तो परत शनी नेच दूषित झालाय.
आता शेवटचं लाभ स्थान म्हणजे जोडीदाराचे प्रणय स्थान त्यात शनी चन्द्र एकत्र.
व लाभेश षष्ठात सप्तम च्या व्यायात म्हणजे जोडीदाराकडून ही प्रेम मिळण्याची शक्यता नाही असा हा विचित्र योग दिसतो.
आता नवमांशत जर गुरू, शूक्र, शनी, मंगळ या ग्रहांना बळ असेल तर कुंडली विवाहास पोषक आहे असं म्हणता येईल.
मंगल शुक्राच्या तूळ नवमांशत निरबली झाला❌
गुरू वायू नवमांशत निरबली झाला❌
शुक्र मेष नवमांशत निरबली❌
आणि
राहिला शनी तो फक्त स्वराशीत बलवान झाला✅ चार मुख्य ग्रहांपैकी प्राणयाचा कारक शुक्र, संतती चा गुरू आणि शारीरिक क्षमतेचा मंगल निरबली झाले त्यामुळे पत्रिका विवाहासाठी 75% अनुकूल नाही.
आता केपी कुंडलीत येऊ.
लाभात शनी, हर्षल, चंद्र युती त्रासदायक
पंचम चा सब गुरू(3,4,6,9,12) चा कार्येश आहे 7 चा नाही
सप्तमाचा सब बुध(4,6,8,9) हा 2,7,11 पैकी एकाचाही कार्येश नाही.
आणि त्यामुळे सगळा गोंधळ आहे. चालू महादशा शुक्राची शुक्र 3,5,8,10 चा कार्येश प्रणयाचे 5 वे स्थान दाखवत असला तरी सोबत 8 आहे म्हणजे हा कदाचित संतती साठी तयार नसावा.
अंतर्दशा राहुची राहू 1,2,11 चा कार्येश आहे तो विवाह मोडण्यास तयार होणार नाही.
थोड्या वेळाने मुलीची पत्रिका बघेन तेव्हा कळेल की नक्की पुढे काय करायचे?
मुलीचे वृषभ लग्न लग्नेश शुक्र व्ययेश मंगळा च्या युतीत बाधित झाला.
परत विवाहासाठी 2,5,7,11 स्थान आणि भावेश चा विचार करू.
द्वितीयात नीच केतू कुटुंब वृद्धीस अडथळा आणतो.
पंचमात चंद्र कन्या राशीत शिवाय सुख स्थानात शुक्र मंगळ अंशात्मक युती.
सप्तमेश व्ययेश मंगळ सुखात शुक्राच्या युतीत कारणास्तव विवाहास अडचणींचा दिसतो. लाभेश गुरू उचीचा तृतीयात पोषक आहे
आता नवमंशात मंगल, गुरू, शुक्र, शनी ला बळ आहे का बघूया
मंगळ मिथुन नवमांशी वायू राशीत बळ आहे✅
शुक्र बुधाच्या राशीत बलहीन❌
गुरू कुंभ नवमांशी ❌
आणि शनी मेष नवमांशी❌
परत तेच चार पैकी एकच ग्रह पोषक
आता केपी कुंडलीत सप्तमाचा सब शुक्र (1,2,4,6) चा कार्येश आहे. वैवाहिक सुखासाठी 2,7,11 लागते ते नाही
पंचमचा सब चंद्र 3,5 आहे तो पण 2,7,11 दाखवत नाही
चालू महादशा गुरू ची(2,3,5,8,11)
अंतर्दशा शनी ची (1,2,4,6)
येणारी बुधाची महादशा (2,3,5) संतती साठी पूरक आहे एकदा संतती झाली की मग मतभेद मागे राहतील.
काय करता येईल?
दोघांनाही कौंसेलिंग ची गरज आहे.
जरा कौंन्सलर नी संवाद साधून दोघांच्या मनातली एकमेकांच्या मनातला अविश्वास दूर केला की सगळी कामे नीट होतील
काळजी करू नका फक्त तज्ञ समुपदेशकाकडून समुपदेशन करून घ्या.
आणि हो...
दुसरा कुठलाही विचार मनात आणू नका विवाह विच्छेद करा असे मी म्हणणार नाही.
कोर्टाच्या पायऱ्या चढू नका निकाल विरोधात लागतील.
बाकी काय लिहू, करता करविता श्रीगुरुदेव दत्त