Wednesday, April 10, 2024

पहिल्या मताची पंधरा वर्षे...

वर्ष 2009 होतं, मी अजून वयाची विशी पूर्ण करतच होतो. सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या होत्या.. #बारामतीच्या काकांनी देशातील शेतकऱ्यांसाठी 70 हजार कोटींची कर्जमाफी बजेट मध्ये जाहीर एकूण निवडणुकीची दिशा ठरवली होती...

 भाजप अजून 2004 च्या शायनिंग इंडिया च्या धुंदीतून अजून बाहेर पडलं नव्हतं आणि विरोधातल्या पाच वर्षात भाजप नी प्रमोद महाजन सारखा हुकमी एक्का गमावला होता, शिवसेनेत उभी फूट पडून राज ठाकरे यांनी मनसे स्थापन केली होती. तरुण मतदार आकर्षित झाले होते अजून विशी गाठणार मी देखील त्यात वाहत गेलो...

अटलजींनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली होती आणि अजून मोदींचा उदय व्हायचा होता... दरम्यान पीएम इन वेटिंग अडवणींच्या नेतृत्वात भाजप ने निवडणूक लढवण्याची औपचारिकता पार पाडली परिणाम, 2004 च्या काँग्रेस च्या जागा 145 वरून 206 वर गेल्या आणि स्थिर UPA सरकार आलं...
आणि भाजप 136 चा 106 ला कोसळला...

पुण्यात काँग्रेस कडून सुरेश कलमाडी, ✋

भाजप कडून अनिल शिरोळे, 🪷
माजी सनदी अधिकारी  अरुण भाटिया 🔴

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएसके 🐘बसप कडून उभे होते
 आणि 

मनसे कडून रणजित शिरोळे 🚂(किती जणांना नाव आठवतंय?, आज महोदय कुठंयत काही पत्ता नाही) उभे होते.
मी कधीच काँग्रेस चा मतदार नव्हतो, आज ही नाही🙄🙈🙉🙊
राज ठाकरेंनी झंझावाती प्रचार करून महाराष्ट्र ढवळून काढला होता....
आम्ही पण मोठ्या आशेने इंजिन समोरच बटन दाबून पहिलं मत देवाला म्हणून वाया घालवलं.... त्यानंतर मात्र इंजिन अस काही भरकटतलं कधी डावीकडे कधी उजवीकडे करत करत अजूनही रुळावर येईना...
तेव्हापासून कानाला खडा इंजिन आयुष्यात परत कधीच नाही
जिथं राहतो तिथल्या स्थानिक परिस्थिती मुळे स्थानिक पातळीवर घड्याळाचा गजर करावा लागतो पण तो पण जुन्या मैत्रिखतर...

असो, अश्या रीतीने लोकशाही आम्हाला दिलेली पहिली संधी आम्ही आनंदाने पार पाडली, पण त्यावेळी सल होती आपला उमेदवार निवडून न आल्याची पण त्याची सव्याज भरपाई झाली ती 2014 साली....

हर्षद मोहन चाफळकर,
१००४२०२४०१४६

No comments:

Post a Comment

espncricinfo प्रश्न

मी विचारलेला प्रश्न espncricinfo वर प्रकाशित झाला