अजून 6 टप्पे बाकी आहेत, अन सहज एक अभ्यास म्हणून आणि साधारण अंदाज म्हणून मी हा ब्लॉग लिहीत आहे...
18व्या लोकसभेसाठी ची काही ठळक निरीक्षणे
▶️ ही निवडणूक सात टप्प्यात होत आहे ते सात टप्पे पुढील प्रमाणे 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे 25 मे, 1 जून 2024
▶️ या सगळ्या सातही टप्प्यात रवी - गुरू युती आहे अपवाद फक्त 7 मे आणि 13 मे या दोन टप्प्यांचा या दोन टप्पांमध्ये गुरू वृषभेत जातो पण रवी शनी च्या तिसऱ्या दृष्टीत राहतो.
▶️पक्षांचा विचार करता काही प्रमुख पक्ष आणि त्यांचे पक्ष प्रमुख यांचा विचार करूया..
▶️ भाजप: जगतप्रकाश नड्डा (कन्या चंद्र, वृश्चिक रवी) यांच्या रवी चंद्राचा अभ्यास केला असता 30 एप्रिल चा गुरू पालट हा पनौतीतील रवीला काहीसा दिलासा देईल आणि एकूण भाजप ला थोडा पेपर सोपा करेल.. कन्या चंद्राला सहावा शनी सहजासहजी यश भाजप पक्षाला देणार नाही मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यापासून भाजप च्या जागा वाढत जातील..
▶️ कॉंग्रेस: मल्लिकार्जुन खडगे: (तूळ चंद्र, कर्क रवी)
काँग्रेस पक्षाला खडगे यांच्या रवी चंद्राचा विचार करता खऱ्या अर्थाने फक्त पहिल्या दोन टप्प्यात (19 आणि 26 एप्रिल) संधी आहे. कारण 30 एप्रिल चा गुरू पालट हा खडगे यांच्या चंद्राला आठवा व रवीला अकरावा असला तरी रवीला आठवा शनी असल्याने रवीला पनौती असल्याने एकूणच काँग्रेस पक्षाला पुढच्या टप्प्यात फारशी संधी दिसत नाही..
▶️ तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी (धनु रवी, वृषभ चंद्र) ममता बॅनर्जी बंगाल बहुमताने राखतील.. बंगाल मधील 42 पैकी किमान 30 तरी जागा मिळतील..
▶️ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (मेष चंद्र, वृश्चिक रवी): राज्यातील 10 पैकी किमान 3 ते 4 जागा मिळवतील.. अकरावा शनी काही ठिकाणी फसगत करू शकतो.
▶️ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (कुंभ चंद्र, कर्क रवी) अजित पवार गट लढत असलेल्या जागांवर युतीला पराभव होताना दिसत आहे. साडेसातीची मधली अडीचकी आणि रवीला आठवा शनी पहिल्या दोन टप्प्यातील जागा गमावताना दिसत आहे, गुरू पालट झाला की एखादी जागा आली तर येईल..
▶️ शिवसेना उद्धव ठाकरे (सिंह चंद्र, कर्क रवी) गोचर शनी ची पूर्ण दृष्टी चंद्रावर पूर्ण दृष्टी आधीच खूप नुकसान करून गेली आहे आता कर्क रवीला आठवा शनी आणि चंद्र शनी च्या दृष्टीत अश्या दुहेरी कात्रीत उद्धव ठाकरे यांचे रवी चंद्र सापडले आहेत..गुरू पालट चंद्राला दहावा आणि रवीला अकरावा असल्याने एखादा चमत्कार शक्य आहे..
▶️ शिवसेना एकनाथ शिंदे (धनु चंद्र, मकर रवी): श्री शिंदे यांच्या मूळ शनी वरून शनी चे गोचर सुरु आहे. तिसऱ्या टप्प्यापासून मूळ रविवर गोचर गुरू नवपंचम आणि नववी दृष्टी टाकत असल्याने शिंदे यांच्या मे महिन्यातील टप्प्यातील जागा निश्चितपणे सुरक्षित म्हणता येतील..
▶️सुप्रिया सुळे (धनु चंद्र, मिथुन रवी): बारामतीतून निसटता विजय शक्य आहे. मतदानाच्या दिवशी रवीला बारावा गुरू आणि गोचर रवी गोचर शनी च्या दृष्टीत शक्य असल्याने अगदी थोड्या फरकाने जय - पराजय होऊ शकतो..
▶️ राहुल गांधी(वृश्चिक चंद्र, मिथुन रवी) यांना वायनाड मध्ये मतदान पार पडताना चंद्राला सहावा गुरू, रवीला अकरावा गुरू अतिशय उत्तम मताधिक्याने निवडून येतील.
▶️ आम आदमी पार्टी अरविंद केजरीवाल (मेष चंद्र, कर्क रवी): अरविंद केजरीवाल यांचा चंद्र हा गोचर शनी च्या दृष्टीत आहे आणि रवी ला शनी आठवा आहे. याचाच परिणाम म्हणून की काय जुनी प्रकरणे बाहेर निघत आहेत. एप्रिल नंतर होणारा गुरू पालट पक्षाला थोडा लाभ मिळवून देईल पण, फार मोठा फरक पडेल असे वाटत नाही..
▶️ नरेंद्र मोदी (वृश्चिक चंद्र, कर्क रवी) विद्यमान सरकार चे प्रमुख म्हणून मोदींचा आणि पर्यायाने त्यांच्या सरकार चा विचार करताना गुरू पालट हा मोदींना लाभदायी ठरत आहे. चंद्र पनौतीत असला तरी त्या चंद्रावर शनी गुरू ची संयुक्त दृष्टी मूळ रवी चा गोचर गुरू शी नवपंचम आणि दृष्टी योग सरकार आणखी भक्कम होण्याकडे कल दाखवत आहे...
▶️ द्रमुक एम के स्टालिन (सिंह चंद्र, कुंभ रवी): द्राविडी पक्षांचा अखेरचा शिलेदार म्हणून ज्यांच्याकडे आज पाहिले जात आहे त्या स्टालिन यांच्या रवी वरून शनी चे गोचर आणि शनीची चंद्रावर सातवी दृष्टी तामिळ नाडू मध्ये अनपेक्षित निकाल दर्शवते. मुख्य प्रतिस्पर्धी के अण्णामलाई (कर्क चंद्र, वृषभ रवी) जोरदार लढत देताना दिसत आहे.. या निवडणुकीत तामिळ नाडू ने धक्का दिला तर आश्चर्य वाटायला नको...
▶️ 7 मे आणि 13 मे या दोन टप्प्यात जे कोणी विद्यमान खासदार (कुठल्याही पक्षाचे) पुन्हा उभे राहिले आहेत त्यांच्या खुर्ची ला धोका संभवतो. जर पक्षाने या दोन टप्प्यातील उमेदवार बदलले असतील तर हा धोका आपोआप नाहीसा होतो..
- हर्षद मोहन चाफळकर,
ज्योतिष विशारद,पुणे
१९०४२०२४२३४५
No comments:
Post a Comment