टीप: हा सर्वसाधारण फलादेश आहे, प्रत्येकाच्या दशा आणि कर्म - प्रारब्ध प्रमाणे फरक पडेल.
♈मेष रास/लग्न: धन स्थानातून होणारे गुरुचे गोचर आर्थिक उत्पन्न वाढवेल. परदेशातून कमाई शक्य आहे.कुटुंबात सुख शांती वैभव नांदेल. धार्मिक सहली घडू शकतील.. तोंडाचे विकार संभवतात. खण्यापिण्यावर खर्च वाढतील.
♉ वृषभ रास /लग्न: राशीतील गुरू पालट गेल्या वर्षभरातील रखडलेली कामे मार्गी लावेल. धर्म त्रिकोणातून होणारे गुरू गोचर तीर्थ यात्रा घडवेल. नवीन एखादी गोष्ट शिकण्यास चांगला कालावधी आहे. गुरुबळ पूर्ण असल्याने लग्न, मुंज तत्सम शुभ कार्य करता येईल. अचानक एखादी चांगली संधी समोर उभी राहील.
♊मिथुन रास/लग्न: व्यय स्थानातून गुरू चे गोचर वैवाहिक आणि नोकरी याबाबतीत थोडे कालावधी कठीण दिसतो. नोकरी निमित्त परदेश प्रवास किंवा लांबचा मुक्कामी प्रवास होऊ शकतो परदेशातुन नोकरीच्या संधी मिळतील. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. एखादी हॉस्पिटल वारी शक्य.
♋ कर्क रास/लग्न: लाभातून होणारे गुरू गोचर विशेष फलदायी होताना दिसते. स्पर्धात्मक यश दिसत आहे, कोर्ट कचेरी जुने खटले निकाल आपल्या बाजूने लागण्याची शक्यता. उत्पन्न वाढ शक्य.
♌ सिंह रास/लग्न: दशमातून होणारे गुरू गोचर नोकरी व्यवसाय आपली समाजातील पत प्रतिष्ठा वाढवणारा कालावधी आहे. मुलांचा गुणगौरव होईल. मुलांमुळे समाजात प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत जुन्या चुका झाल्या असतील तर त्या डोकं वर काढतील. शनीच्या कठोर दृष्टीतील चंद्राला हा येणारे वर्ष काही काळ एसी चा गारवा देईल..
♍ कन्या रास/लग्न: नवमातून गुरुचे गोचर जोडीदाराचा भाग्योदय दर्शवतो. नवीन एखादे घर खरेदी करण्याचे भाग्य लाभेल. तीर्थयात्रा, नवस फेडणे यासाठी उत्तम कालावधी. मुक्कामी परदेश प्रवास शक्य..
♎तूळ रास/लग्न: अष्टमातून गुरू चे गोचर आर्थिक मानसिक शारीरिक परीक्षा पाहणारे. कागदपत्रे चोख सांभाळा. छोट्या प्रवासात त्रास शक्य. लहान भावंडांशी/ मामांशी वाद होण्याची शक्यता.
♏वृश्चिक रास/लग्न: सप्तमातून गुरू गोचर विवाह जमण्यास उत्तम कालावधी. जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. आवडीच्या गोष्टीत यश मिळतील. आर्थिक आवक वाढेल. कागदपत्रांची रखडलेली कामे मार्गी लागतील. मे/जून २०२४ मध्ये सरकारी कामे मार्गी लागतील.
♐ धनू रास/लग्न: षष्ठ स्थानातून गुरुचे गोचर आरोग्याच्या तक्रारी वाढवेल. नवीन स्थावर मालमत्तेसाठी कर्ज मिळेल. आर्थिक गणिते पक्की होतील. नोकरीत प्रमोशन, घसघशीत पगारवाढ शक्य. स्पर्धात्मक यश मिळेल. मे/जून २०२४ आणि नोव्हेंबर/डिसेंम्बर २०२४ विशेष सरकारी कृपेचा...
♑ मकर रास/लग्न: पंचमातून गुरू गोचर वैवाहिक जीवनात गुलाबी दिवस आणेल साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यातील शेवटचे वर्ष त्यातल्या त्यात शांत जाईल. संतती सौख्य उत्तम राहील. पाळणा हलवण्यास उत्तम कालावधी.. प्रवास सुखासुखी होतील.. शेअर्स मधून जॅकपॉट शक्य...
♒ कुंभ रास/लग्न: चतुर्थातून गुरू गोचर स्थावर मालमत्ते तुन सुख दर्शवते. नवीन वाहन खरेदी, घर खरेदी शक्य. मातृसौख्य चांगले राहील. साडेसातीच्या peak मध्ये हे वर्ष आल्हाददायक जाईल..
♓ मीन रास/लग्न: तृतीयातून गुरुचे गोचर सरकारी कामे मार्गी लावतील. वडील, लहान बंधू यांच्याशी संबंध चांगले राहतील. छोटे प्रवास घडतील. कोर्ट प्रकरणात नुकसान होणार नाही.
तळटीप: हे ढोबळ फलादेश आहेत, काहींना लग्न राशीकडून, काहींना चंद्र राशीकडून, काहींना दोन्ही चंद्र/लग्न दोन्ही चे अनुभव येऊ शकतात.. शेवटी अनुभव श्रेष्ठ..
- हर्षद मोहन चाफळकर,
ज्योतिष विशारद, पुणे
२४०४२०२४०११५