Friday, December 2, 2022

डोळे हे जुलमी गडे

#मूळकवी: भा. रा. तांबे

डोळे हे जुलमि गडे रोखुनि मज पाहुं नका!
छेडाछेडी त्यांत पुरी टक लावून पाहुं नका.

मोजू कशी सेकंदे मी? 14 भरता होई गुन्हा!
नजरा नजर वाढता कारावास होईल पुन्हा.

खळबळ होई समाजमनीं! हसतात सारे फेसबोके;
साधील जो संधी बघुनि त्यास म्हणा अस्सल बोका....

#चाफळCurry

Friday, October 21, 2022

कॉमेंट्री वाल्या बोलाव आपल्या पलटन ला

डॉल्बी वाल्या बोलाव माझ्या डिजे ला...

या चाली वर वाचावे....


हे ब्रिंग इट ओन भावा...
पोर्र जमली गल्लीमधी
चर्चा बोरिंग झाली,
चल रे भावड्या खेळायला
मग मैदानावरती आली, (X2)
स्टंप म्हणून रचली सायकल
दादा ने मग घेतला रन अप
चल रे पिंट्या फोडू आपल्या
सोसायटीच्या काचेला
कोमेंट्रीवाल्या बोलाव आपल्या पलटन ला पलटनला….
कोमेंट्रीवाल्या बोलाव आपल्या पलटन ला पलटन ला…. (X2)

आर्र खेळायच नसून
मॅच मंदी हा घुसतोया बॅटिंग ला..
अन घुमवून घुमवून बॅटीला 
ह्याच्या बॉल लागतुया अंगाला (X2)

आला मैदानात भावड्या
कधी दांडिया खेळतुया भावड्या
स्टंप उखडाया मागं गोविंदा
खाली नॉन स्त्राईक ला पळतोय भावड्या
मारला बाऊंसर फुटले डोके
प्यांट फाटुन तुटले जोडे
गिरक्या घेतो करून सदरा
देतो सोडून बॅटीला
कोमेंट्रीवाल्या बोलाव आपल्या पलटन ला पलटन ला….
कोमेंट्रीवाल्या बोलाव आपल्या पलटन ला पलटन ला…. (X2)

आली मॅच बी रंगात
टू चु टू चू खेळून करतो टाईमपास
भावड्या खेळून ओव्हर्स 
करतो खल्लास बॅटिंग TOP to BOTTOM (X2)
आला Drinks घेऊन भावड्या
कसा झिंगाट खेळतोय भावड्या
बसला दमून नॉन स्ट्राईक ला पिंट्या
त्याला खेचून ओढतोय भावड्या
काच फोडून म्हणला SORRY
पिंट्या पार्टनरशिप आपली भारी
कोहल्यासंग रोहित जैसा
आपला हाय एक दुजेला
कोमेंट्रीवाल्या बोलाव आपल्या पलटन ला पलटन ला….
कोमेंट्रीवाल्या बोलाव आपल्या पलटन ला पलटन ला…. (X2)

काय बी कर पण मार तू सिक्सर..
बॉलर त्याला भ्येतो… 
बॉलर ची बाचाबाची घालून राडे
शॉट भारी नाचली पोरे...
भावड्या देतो घुमवून बॉल षटकाराला
कोमेंट्रीवाल्या बोलाव आपल्या पलटन ला, पलटन ला...

घुमव म्हणजे घुमव
हे भावड्या हिट इट भावड्या..
भावड्या… माइंड ब्लोविंग भावड्या
भावड्या… घुमवून घे भावड्या

Friday, October 7, 2022

हर्षद चाफळकर यांचा परिचय

*सुवर्णपुष्प परिवारातील आपली युवाशक्ती श्री हर्षद मोहन चाफळकर यांचा या प्रसन्न व्यक्तीमत्वाचां अल्पपरीचय:*

श्री हर्षद चाफळकर हे पुणे स्थित रसायनशास्त्राचे प्राध्यापक आहेत.. कॉलेज मध्ये अध्यापनाचे कार्य करतानाच गेली दहा वर्षे फेसबुक, व्हाट्सअप्प सारख्या समाजमाध्यमातून सामाजिक राजकीय, क्रीडा सारख्या विविध विषयांवर लेखन करतात. *Harshad Unplugged* या नावाने युट्युब चॅनेल (https://youtube.com/channel/UCSR3O5A31F3t5lpVCbjcV5g) चालवतात.
श्री चाफळकर हे ज्योतिष अभ्यासक असून फलज्योतिष अभ्यास मंडळ,पुणे येथून *ज्योतिष विशारद* ही पदवी प्राप्त केली आहे, याशिवाय अंकशास्त्र, कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धती यावर ही चाफळकर यांचा हातखंडा आहे.. मोबाईल वरून ऑनलाइन भविष्य सांगणे ज्योतिष विषयक लेख लिहिणे यासाठी श्री. चाफळकर यांनी फेसबुक व युट्युब वर *Seven Astrology by Harshad Chaphalkar* हे फेसबुक पेज (https://www.facebook.com/astrobhimsen) व युट्युब चॅनेल (https://youtube.com/channel/UCa0TOuXPd4RMot1P71d0JEQ) चालू केले आहे....

श्री. हर्षद चाफळकर हे *चाफळCurry* या टोपण नावाने विडंबन कविता करतात . आजवर विविध विषयांवर 35 विडंबन कविता फेसबुक वर प्रसिद्ध केल्या आहेत... *Harshad Writes* (https://se7enpen.blogspot.com/?m=1) या नावाने ते ब्लॉग ही प्रसिद्ध करतात.

Thursday, September 29, 2022

जानेवारी 2023 नंतर ची राजकीय भाकिते

जानेवारी 2023 पासून पुढचे राजकीय भाकिते....

💠येणारी जानेवारी 2023 पासून पुढची तीन वर्षे भाजप च्या मोदी शहा या जोडगोळी ला त्रासदायक ठरण्याची शक्यता...

💠अमित शहा यांना आरोग्याच्या दृष्टीने कठीण काळ... खांदेपालट अटळ....

💠मुंबई महापालिका जर जानेवारी 2023 नंतर झाली तर शिंदे गट टॉपर राहण्याची शक्यता...

💠राज्यातील पंकजा ताई, उद्धव ठाकरे, फडणवीस, अजितदादा या सगळ्यांना सबुरीचा काळ.. नजर हटी दुर्घटना घटी... 

💠 राजस्थानात सध्या पेल्यातले वादळ... राजस्थानात एप्रिल 2023 च्या अलीकडे पलीकडे काही महिन्यासाठी नवीन मुख्यमंत्री शक्य....

💠 अरविंद केजरीवाल यांची विश्वासार्हता कमी होऊन पक्ष फुटण्याची शक्यता... 2024 लोकसभेत दोन आकडी संख्या...

💠 डिसेंबर 2023 नंतर काँग्रेस अध्यक्षपदी पुन्हा राहुल गांधी शक्य....

💠 ममता बॅनर्जी केंद्रात 2024 ला पुन्हा मुसंडी मारू शकतात...

Thursday, July 14, 2022

टी20 साठी वर्ल्ड कप चा बळी???

टी20 साठी वर्ल्ड कप चा बळी???

पुढच्या वर्षी ऑक्टोबर - नोव्हेंबर 2023 मध्ये भारतात वन डे वर्ल्ड कप होतोय.. 
त्यात पात्र होण्यासाठी आयसीसी ने वन डे सुपर लीग तयार केली ज्यात तेरा नियमित वन डे खेळणारे देश आहेत...
त्यातील पहिले 9 संघ आणि भारत यजमान म्हणून पात्र होणार तो वर्ल्ड कप 10 देशांचा होणार जसा 2019 ला झाला होता...
आता हे पोस्टायच कारण काय तर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलिया विरुद्ध च्या आपल्या तीन वन डे ची मालिका जी जानेवारी 2023 मध्ये होणार होती ती रद्द केली त्या मालिकेचे पोंइंट्स ऑस्ट्रेलिया असे खिरापत म्हणून देऊन टाकले कारण काय तर दक्षिण आफ्रिका स्वतःची T20 लीग सुरू करू इच्छिते त्या मालिके आड ही आंतरराष्ट्रीय मालिका येत असल्याने आंतरराष्ट्रीय मालिका रद्द करून आयपीएल सारखी देशांतर्गत साखळी सुरू करायची आहे.. 

एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे याआधी मांझी सुपर लीग आणि ग्लोबल टी 20 अश्या दोन प्रयत्न दक्षिण आफ्रिकेचे फसले आहेत... मांझी सुपर लीग तर त्यांना टीव्ही वर फुकट दाखवावी लागली.. त्याच वेळी आयपीएल साठी बीसीसीआय ने पैशाचा पाऊस पाडला... पण यावेळी दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाच्या पाठीशी #सुपरस्पोर्ट ही आफ्रिकेतील सगळ्यात मोठी टीव्ही ब्रॉडकास्टर आहे....बघूया काय होतंय ते....

गेली जवळजवळ दशक भर दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड भिकेला लागलंय... 2023 मध्ये नियमाने त्यांच्याकडे वर्ल्ड कप व्हायला पाहीजे होता, पण त्यांनी हात वर केल्यावर भारताने विडा उचलला....

तर याचा परिणाम असा की, दक्षिण आफ्रिका 2023 च्या वर्ल्ड कप ला थेट पात्र होणार नाही त्यांनी झिम्बाब्वे मध्ये जाऊन वर्ल्ड कप पात्रता फेरी खेळायचं ठरवलंय...
पण जर डाव उलटला (शक्यता कमी किंबहुना नाहीच) तर 1992 नंतर पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिकेशिवाय होईल....

यातून अजून एक गोष्ट अधोरेखित झाली... क्रिकेट मंडळ आता टी20 कडे सोन्याचं अंड नव्हे तर सोन्याचं घबाड देणारे साधन म्हणून पाहू लागलंय... पण या सगळ्यात विकेट पडणार ती वन डे क्रिकेटची.....

- हर्षद मोहन चाफळकर  ( Harshad Chaphalkar )

Cricket Australia  Cricket South Africa  #CWCSL #CricketWorldCup2023 #India2023 SuperSport

Wednesday, July 6, 2022

टिक टिक वाजते घड्याळ

टिक-टिक वाजते घड्याळ.....
धड धड धावते इंजिन....
कधी कमळ कधी पंजा....
अंतर संपते तिकिटात......
सेना ही तु मनसे ही तु
कितीही केले तरी ठाकरेच तु
CM ची खुर्ची नको, सत्तेचा remote हवा हातात..... #Vidhansabha2014

सेना सांगा कोणाची???

सेना भाजप युती ला आणि काय हवं

Sunday, June 19, 2022

विधानपरिषद निवडणूक

#मूळकवी: मंगेश पाडगावकर

सांग सांग भोलानाथ । निवडून येईन काय ?
आमदारकीच्या वनवासातून सुट्टी मिळेल काय ॥धृ॥

भोलानाथ ! दुपारी अपक्ष भेटतील काय
मते हळुच वळवताना आवाज होईल काय
भोलानाथ ! भोलानाथ !!
सांग सांग भोलानाथ । निवडून येईन काय ॥१॥

भोलानाथ ! भोलानाथ !! खरं सांग एकदा
आखाड्यात उद्या टिकेल  का रे दुसरा?
भोलानाथ ! भोलानाथ !!
सांग सांग भोलानाथ । निवडून येईन काय ॥२॥

भोलानाथ ! उद्या आहे परिषदेचा पेपर
कोटा माझा पूर्ण करून जिंकेन ना मी प्रॉपर??
भोलानाथ ! भोलानाथ !!
सांग सांग भोलानाथ । निवडून येईन काय ॥३॥
पंजावरती मते पडून  विजय मिळेल काय ॥धृ॥
सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय ?

- हर्षद मोहन चाफळकर , पुणे
१९०६२०२२२१५१

Wednesday, May 25, 2022

जे का गंजले भंगले..

#विडंबन #विभंग

मूळ रचना: संत तुकाराम

जे का गंजले भंगले ।
त्यासि म्हणे जो आपुलें ॥१॥

तो चि "नवाब" ओळखावा ।
"मलिक" तेथें चि जाणावा ॥२॥

जैसे दैनंदिन खवळीत।
तैसे "संजयाचे" पित्त ॥३॥

जोही घोटाळे काढी ।
त्यासि "किरीट" म्हणा हृदयी ॥४॥

दया करणें जें "परबासी" ।
ते चि "मातोश्री" चे दासी ॥५॥

हर्षा म्हणे सांगू किती ।
यांच्या घोटाळ्याच्या कीर्ति ॥६॥

#NawabMalik #KiritSomaiya #SanjayRaut #AnilParab

- हर्षद मोहन चाफळकर , पुणे
२६०२२०२२००५३

Saturday, May 14, 2022

मतदार

जवाहर राठोड यांच्या #पाथरवट या कवितेच्या प्रेरणेतून...

#मतदार..

आम्ही मतदार..
नेमाने करतोय मतदान..
ज्या मताने तुम्हाला दिलेत सत्ता आणि अधिकार..
आम्ही मात्र रोजगारासाठी, सुसह्य आयुष्यासाठी,
रोजच नुसती धावपळ करतो..
दुसर काय? दुर्दैव आमचं...

आम्हीच निवडून दिलेल्या सरकार 
कडून आम्हीच पिसले जातोय..
आमच्या मंत्र्याने तर एकदा कमालच केली..
जिथे तिथे भ्रष्टाचार करून स्वप्न आमची चोरली गेली..
उद्ध्वस्त झालेल्या आमच्या आयुष्याच्या आरश्यातून
मतपेट्यांच गणित तुम्ही पाहता अन् म्हणता,
ताई! माई!!  अक्का!!!

तुमच्या पंजा, घड्याळ, कमळाला
बाणाला, इंजिनाला..
आम्हीच मत दिलीत..
आता तुम्हीच खर सांगा..
तुम्ही आमचे नेता की
आम्हीच तुमचे पिता??

अरे ! आमच्या मतासाठी नट, नट्या, खेळाडू 
आमच्या दारात उमेदवाराचे सोंग घेवून आले...
त्यांना आम्ही निराश केलं नाही...
उदार कर्णासारखे विश्वास आणि मते 
त्यांच्याही झोळीत आम्हीच टाकलीत...
त्याच जोरावर आज भत्ते आणि पेन्शन ओरबाडतायत..

मतदारांनो सावध व्हा!!!
आता यांना प्रश्न विचारावे लागतील...
जेव्हा वापरू आपल्या हाती असलेला NOTA
तेव्हा हेच नेते पाहतील केविल वाण्या नजरेने
यांच्यातील भ्रष्टाचारी भस्मासुराचा शेवट झालेला...

- हर्षद मोहन चाफळकर , पुणे
१४०५२०२२१००६

आरंभी धरीन अयोध्येच्या वाटा

#TempleRun #AyodhyaVisit #RamJanmabhoomi 

#विभंग (अभंगाचे विडंबन)

मूळ अभंग: समर्थ रामदास...

आरंभी धरीन अयोध्येच्या वाटा ।
सध्याचिया काळा गरज असे ।।१।।

पावेल का राम? "राज"संकट काळी।
रामनाम "राजा" उच्चरित ।।२।।

उच्चारितां राम होय साफ भूत (काळ) ।
"राजा"चा निश्चय रामभूमी ।।३।।

रामभूमी "राज"कारण्यासी आठवे ।
"राज"धर्म नाठवें काही केल्या ।।४।।

काही केल्या मनसे मत का मिळेना?।
हर्षा म्हणे मतदार व्हा चाणाक्ष ।।५।।

- हर्षद मोहन चाफळकर ,
१००५२०२२२३४२

Sunday, April 17, 2022

रम्य त्या मातोश्री च्या दंतकथा

#मूळ_रचना: रम्य ही स्वर्गाहून लंका
#कवी: गदिमा..

रम्य त्या मातोश्री च्या दंतकथा
हिच्या कीर्तीचा वार्तालहरी चालविती वाहिन्या..

सुवर्णघटिका ⏱️घरी ही डीलिव्हरी
घटिकेची नोंद होई निळ्या डायरी
मातोश्रीवरी यशवंत अर्पण करे, कोटी अभिषेका...

मातोश्री - आई दोघी भिन्न जरी
रहस्य उमगले त्या डायरीतुनी
या डायरीचे स्वामित्व तरी यशवंत घेईल का ?

- ✒️ हर्षद मोहन चाफळकर , पुणे
३००३२०२२०५०

Wednesday, March 23, 2022

ED ही जुलमी गडे...

मूळ रचना: भा रा तांबे..

ED ही जुलमि गडे
धाडूनि मज छळू नका !
छापेमारी त्यांत पुरी
घरात बसुनी पाहू नका.

लपवू कशी प्रॉपर्टी मी?
होती चुका सांगुं नका !
टोचे ती प्रश्नावली..
वेळ सख्या, आली आता...

खळबळ किति होय मनीं !
फसतिल मम बंधुजन;
घेतिल त्यास संधि बघुनि
हुरहूर मनी लागली आता !!!!

✒️ हर्षद मोहन चाफळकर 
२३०३२०२२२३३०

Saturday, February 5, 2022

ओळखल का सर मला


"ओलखलत का साहेब मला?" दारात आला छभू
मफलर होती अवळलेली डोळ्यामधे पाणी

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून 
ED पाहुणी आली होती गेली महाराष्ट्र सदनात राहून

दरोडेखोरांसारखे चार भिंतीत भटकले
मोकळ्या हाती जातील कसे?समीरला अटक झाली

नेल्या फायली कॅश नेली होते नव्हते नेले
प्रसाद म्हणून newspaper ची रद्दी तेवढी ठेवली

कार्यकर्त्यांना घेऊन संगे साहेब आता लढतो आहे
समता परिषद बांधतो आहे तळागाळात पोहोचतो आहे

खिश्याकड़े हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत साहेब जरा चौकश्यांचा ससेमिरा थांबवा

फुटला माझा घोटाळा तरी फुटल नाही घड्याळ
खांद्यावरती हात टाकून "पाठित खंजीर खुपसु नका"
#राजकीय_विडंबन

Friday, February 4, 2022

आणि बदली झाली...


आणि बदली झाली.....

एका तद्दन प्रॅक्टिकल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तीला ज्योतिष विषयाचा अनुभव देण्याचा योग मला नुकताच आला...

परिचयातील व्यक्तीने बदली संबंधी प्रश्न विचारला होता...

एका ओळखीतल्या व्यक्तीची सरकारी खात्यात बदली ड्यू आहे, पण काही ना काही अडचणी येतायत तुम्ही तुमचं स्किल वापरून मला या प्रश्नाचे उत्तर द्या...

प्रश्न: इच्छित ठिकाणी बदली कधी होईल???

13/ 12/2021
सकाळी 07.10
पुणे..

आरपी खालील प्रमाणे...

L: मंगळ (1/5,12  नस्वा. शनी 2/2,3) केतू (12/1,5,9)
LS: शनी (2/2,3  नस्वा चंद्र 4)
S: बुध (1/8,10 नस्वा. केतू 12/1,5,9 )
R: गुरू (3/2,4 नस्वा. मंगळ 1/5,12)
D: चंद्र (4 नस्वा. बुध 1/8,10)

दशमचा सबलोर्ड बुध आहे आणि तो rp त आहे म्हणजे कामात नक्की to be or not be अशी परिस्थिती आहे...

तो बुध 1,8,10
1,5,9,12
1,5,12 

नोकरीतील बदली साठी 3,5,8, 9,12 या स्थानाचा विचार होतो...

इथे दशामाचा सबलॉर्ड  आवश्यक सर्व स्थानांचा याचा कार्येश असल्याने बदली नक्की होणार...
फक्त ती मनात असलेल्या ठिकाणी होईल असं वाटत नाही..

मनाविरुद्ध बदली होईल आता आहेत त्यापेक्षा लांब जाण्याचा योग दिसतो..

नोकरी च्या ठिकाणी यांच्या हाताखाली जे कामे करतात त्यांच्या कडून चमत्कारिक वागणूक मिळत असावी...

आर्थिक देवाण घेवाण करण्याच्या भानगडीत पडू नये...

शुभेच्छा!!!

एवढा मेसेज टाईप करुन सोडून दिला...

कधी होईल हा प्रश्न अनुत्तरीत च राहिला...

आरपी तील ग्रहांचे कार्येशत्व पाहिले...

प्रश्न वेळी रवी वृश्चिक राशीत होता...
प्रश्न लग्न स्थिर असल्याने लगेच काय काम होत नसत.. परत हे तर  सरकारी काम.. म्हणून रविचे वृश्चिक भ्रमण सोडून दिले...
RP त गुरू आहे आणि त्यातील केतू हा मंगळाच्या मार्गाने RP त आलाय.. मग डिसेंबर च्या उत्तरार्धातील तारीख निश्चित करायची का हा प्रश्न होता कारण त्यावेळी रवी मूळ नक्षत्रात असेल जो कार्येश भावाच्या ग्रहांच्या मालिकेतून जाईल..

पण परत एकदा मी द्विस्वभवी बुध आणि स्थिर लग्न यांच्या वर भरोसा ठेवून थोडी लांबची तारीख दिली...

लगेच पुढचं RP शनी होता त्याच्या मालिकेतील चंद्र मंगळ हे RP त आहेत...
शनी आणि मंगळ हे आवश्यक भावाचे कार्येश ही आहेत... 

मग सांगून टाकल बदली नक्की होईल पण मकर संक्रातीच्या नंतर म्हणजे जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धात होईल 

प्रत्यक्ष बदली चे कागदोपत्री आदेश बरोबर मकर संक्रातीच्या मुहूर्ताला म्हणजे 14 जानेवारी 2022 ला निघाले...
त्याचा फीडबॅक पण आला...
 पण, वरती म्हटलं तस हे सरकारी काम होत... इतक्या सहजासहजी होईल का?? 
दोन दिवसांनी पुन्हा मेसेज की अहो गुरुजी आदेश निघाले पण, सध्याचे कार्यालय कार्यमुक्त करत नाही... 

मी म्हटल, रुको जरा सब्र करो...

अखेर सध्याच्या कार्यालयाने 2 फेब्रुवारी 2022 रोजी कार्य मुक्ती चा अहवाल दिला....
आणि काल 3 फेब्रुवारी 2022 रोजी नव्या कार्यालयात रुजू झाल्या....
रवी RP तील शनी च्या राशीत चंद्राच्या नक्षत्रात...

करता करविता गुरुदेव दत्त...

- हर्षद मोहन चाफळकर ( Harshad Chaphalkar )

Wednesday, February 2, 2022

शनी चे गोचर भ्रमण आणि मी


काही लिहायच्या आधी मी स्पष्ट करू इच्छितो की माझी साडेसाती संपलेली नाही अजून शेवटचे गोचर भ्रमण सुरू आहे...

साडेसाती म्हटलं की बऱ्याच नव्हे तर जवळ जवळ सर्वांनाच भीती वाटते. साडेसाती सुरू झाली आता काय होईल? खूप त्रास होईल का? मरणयातना असा ही काही जणांचा समज होतो. अगदी नको नको झाल्यासारखे जीव होतात लोकांचे...

2 नोव्हेंबर 2014 ला शनी महाराजांनी वृश्चिकेत प्रवेश केला त्या दिवसापासून माझी साडेसाती सुरू झाली खरेतर ही आयुष्यातील दुसरी साडेसाती मात्र त्यावेळी वय कळतं नव्हतं आणि त्यामुळे तो अनुभव गाठीशी नव्हता खऱ्या अर्थाने हाच पहिला अनुभव.....

ज्यादिवशी साडेसाती सुरू झाली त्यावेळी मला रवी महादशा(2,9,10,11)
शनी अंतर्दशा(2,3,4,7,12)
मंगळ प्रत्यंतर दशा(1,2,6,11)
अशी दशा होती म्हणजे खरतर काळजी करण्यासारखे काहीच नव्हतं कारण प्रत्यंतर दशा 2,10,11 सारखे अर्थार्जनाच्या दृष्टीने शुभ स्थाने ऍक्टिव्ह होती...
पुढे बुधाची अंतर्दशा(8,10,11) अशी अंतर्दशा होती आणि रवी प्रत्यंतर(2,9,10,11) दशेत मी घराजवळच्याच शाळेत 15 जून 2015 ला सहायक शिक्षक म्हणून रुजू झालो.

Sequence लक्षात घ्या...
महादशा आणि प्रत्यंतर दशा 2,9,11 अशी संयुक्त अक्टीव्ह करत असताना नवम भाव शिक्षणशी संबंधित क्षेत्रात कार्यरत झालो दशमात स्थिर राशी मला आजवर त्याच ठिकाणी स्थिर ठेवत आहे...
आतापर्यंत मला साडेसाती ची काहीच विशेष गोष्ट जाणवत नव्हती...

उलटपक्षी मी मार्च 2016 मध्ये दहावी साठी ssc बोर्डच्या परीक्षेसाठी परीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली..... 


नोकरी सुरू होतीच शिवाय माझी ज्योतिष विषयात आवड निर्माण झाली... टीव्हीवरच्या कार्यक्रम बघून प्राथमिक तयारी झालेला मी.. मला फॉर्मल शिक्षण घ्यावेसे वाटलं 
परत sequence तोच
रवी/केतु/केतु 
इथे 9 , 8 अशी स्थाने ऍक्टिव्ह होती जी ज्योतिष सारख्या गुढशास्त्राच्या अभ्यासासाठी पूरक आहेत...

सगळं उत्तम सुरू होतं अगदी मे 2017 मध्ये रवी महादशा संपेपर्यंत... चंद्राची महादशा(2,9) मे 2017 मध्ये सुरू झाली. लक्षात घ्या 9वे स्थान परत धर्म त्रिकोणाचे स्थान आहे... काही गोष्टी वेळेत झाल्यास त्याचा आनंद असतो..

दरम्यान 26 जानेवारी 2017 रोजी शनी महाराज प्रत्यक्ष राशीतच आले... साडेसातीचा एक चांगला अनुभव मी ऐकून होतो की साडेसातीत जुन्या रखडलेल्या गोष्टी मार्गी लागतात.. त्याचा मात्र अनुभव घेतला...

चंद्र महादशा(2,9)
चंद्र अंतर्दशा(2,9)
आणि मंगल प्रत्यंतर दशा(1,2,6,9,11) लक्षात घ्या महादशा, अंतर्दशा, आणि मुख्य प्रत्यंतर दशेत 1,9 ही धर्म त्रिकोणाची स्थाने आणि जोडीला 11 हे इच्छापूर्तीचे स्थान ऍक्टिव्ह झालं तेव्हा वयाच्या 28 व्या वर्षी 30 मे 2017 ला माझी मुंज झाली... इथे महादशा, अंतर्दशा, प्रत्यंतर दशा तिन्ही स्तरावर योग्य ती स्थाने ऍक्टिव्ह व्हायला हवीत हे अधोरेखित झाले...

मी अजूनही साडेसाती चा वाईट असा अनुभव घेतला नव्हता... 

महादशा 2 ची आहे 2 मारक स्थान आहे जोडीला 9 स्थान स्थिर लग्नाला बाधक आहे... म्हणून 
चंद्र महादशा(2,9)
चंद्र अंतर्दशा(2,9)
गुरू प्रत्यंतर दशा(2,3,5,8)
शनी सूक्ष्म दशा(2,3,4,7,12) च्या चार दिवसांच्या काळात फक्त हॉस्पिटल चा पाहुणचार घेतला... इथे सुद्धा sequence महत्त्वाचा आहे.
दरम्यानच्या काळात करियर स्थिर झालं होतं . 2 स्थान ऍक्टिव्ह असल्याने उत्पन्न ही सुरू होतं.....आहे...
पुढे मंगळ अंतर्दशेत (1,2,6,9,11) याकाळात ही अर्थार्जन सुरूच राहील increament चांगलं झालं...
राहुची अंतर्दशा(1,3,6,11) सुरू झाली 2 ने साथ सोडली आणि annual increament ला पहिला खो लागला...😢😢
अजून राहू अंतर्दशा सुरूच आहे... पुढे गुरू, शनी, बुध, केतु, शुक्र रवी प्रत्येक जण 2 स्थान ऍक्टिव्ह ठेवतोय तो नोकरी टिकविण्यास आणि अर्थार्जन सुरू ठेवण्यास पूरक आहे...

बाकी single ला 2 चा आधार😂😂😂

एकूण पाहता गेल्या पाच वर्षातील शनी भ्रमणात 2,6,10,11 या स्थानांनी मला आधार दिला ते पुढेही देत राहणार आहे...

फक्त ते चार दिवसांचा हॉस्पिटल चा पाहुणचार सोडल्यास बाकी ok...

मूळ कुंडलीतील शनिवर गुरुची पूर्ण दृष्टी मनाला दिलासा देते😇😇😇

सारांश एकच: जर दशा अनुकूल असतील आणि विशेषतः 8,12 ऍक्टिव्ह होत नसतील तर शांत पणे साडेसाती चा आनंद घ्या. तो आपल्या चित्त मन शुद्धीचा काळ आहे🙏🙏

Wednesday, January 19, 2022

राहुल शरद द्रविड...


भारतीय उपखंडातला विश्वचषक नुकताच संपला होता. १९९६च्या जून च्या महिन्यात भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड च्या दौऱ्यावर गेला होता. त्या दौऱ्यावर तीन नवख्या चेहऱ्यांनी कर्णधार अझरुद्दीन च्या नेतृत्वाखाली पदार्पण केलं. वेंकटेश प्रसाद, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड...

लॉर्ड्स च्या कसोटीत गांगुली आणि द्रविड दोघांनाही संधी मिळाली. गांगुलीने शतक ठोकून कसोटी कारकिर्दीला धडाक्यात सुरुवात केली. आणि वर्तमानपत्रांची जागा व्यापली. त्याच डावात द्रविड नेही 95 धावा केल्या होत्या. मात्र त्या गांगुलीच्या शतकापुढे काहीश्या झाकोळल्या गेल्या. त्या पदर्पणापासून जो त्याचा मागे प्रसिद्धी पासून लांब राहण्याचा शाप मिळाला तो कारकीर्द संपेपर्यंत तसाच राहिला.

तंत्रशुद्ध फलंदाजी, संघभावनेतून आलेली त्यागाची वृत्ती आणि आपल्या मर्यादांची पूर्ण जाणीव ठेऊन यशाची एक एक वीट रचत घडवलेली उत्तुंग कारकीर्द...
१९९६ साली पदार्पण करताना भारतीय संघात बरेच स्ट्रोक मेकर अजून खेळत होते त्या संघात सचिनचा मास्टरक्लास, सिद्धू ची बेफिकीर आणि गोलंदाजांवर तुटून पडणारी शैली, अझरची मनगटी नजाकत आणि जडेजा चा फिनिशिंग टच असं असताना संघात जागा मिळवणं आणि तिथं आपली स्वतःची अशी ओळख निर्माण करणं हे महाकठीण काम होतं. पण म्हणतात ना एकाचं नुकसान दुसऱ्याचा लाभ... सिद्धू ला त्याचा स्वभावाप्रमाणे अचानक झटका आल्या सारखा अर्धवट दौरा सोडून घरी परतण्याची दुर्बुद्धी का सुचावी आणि त्यातूनच गांगुली आणि द्रविड ला संधी मिळावी आणि त्यांनी त्याच सोनं करावं सगळं एखाद्या स्क्रिप्ट सारखं वाटतं.

त्या लोर्ड्स वर एक "ऑनर्स बोर्ड" आहे. तिथं खेळलेल्या कसोटीत डावात पाच बळी मिळवणारे आणि शतक ठोकणारे यांची नावे त्या बोर्डावर लिहितात. पदर्पणात ती संधी गांगुलीने साधली. मात्र त्याच्याबरोबरच कारकीर्द सुरू करणाऱ्या द्रविड च्या कारकिर्दीत तो क्षण १५ वर्षांनी २०११साली आला. 

राहुल द्रविड ने संघासाठी हरतऱ्हेचा त्याग केला २००० साली गांगुलीच्या नेतृत्वाखाली मॅच फिक्सिंग नंतर जो संघ उभा राहिला त्यात द्रविड चा त्याग महत्त्वपूर्ण ठरला. एकदिवसीय संघात ७ फलंदाज ४ गोलंदाज घेऊन खेळण्याची गांगुलीची रणनीती केवळ आणि केवळ द्रविड मुळे शक्य झाली कारण तो त्याच्या इच्छेविरुद्ध केवळ संघाची गरज म्हणून फलंदाज यष्टीरक्षक म्हणून खेळण्यास तयार झाला.

२००१-२००८ या काळात भारतीय क्रिकेटच्या बॅटिंग ऑर्डर मध्ये फॅब फाईव्ह चा बोलबाला होता त्यात सेहवाग ची आक्रमकता, सचिनचा मास्टरक्लास, गांगुलीची ऑफ साईडची हुकूमत, लक्ष्मणची मनगटी फटाक्यांचे सौन्दर्य आणि या सगळ्यांना एक भक्कम आधार देणारी भिंत म्हणजे राहूल द्रविड.

द्रविडने कसोटी क्रिकेटच्या चाहत्यांना डोळ्यांचे पारणे फेडणारा खेळ केला १९९९ ची डुनेडीन कसोटी पासून २००१ ची कोलकाता,२००२ चे जॉर्जटाऊन,हेडिंगले, नॉटिंगम, ओव्हल २००३ चे अडलेड, २००४ चे रावळपिंडी, या त्याच्या प्राईम मधल्या खेळी डोळ्यासमोर अजूनही तरळतात.

आपल्या खेळाशी कायम एकनिष्ठ राहिला, दुसऱ्या कोणाचाही स्वतःवर कधीही द्रविड ने प्रभाव पडू दिला नाही. त्याच्या अवतीभवती एका पेक्षा एक स्ट्रोकमेकर असताना हा मात्र संयम, चिकाटी आणि दृढ निश्चयाचा मूर्तिमंत प्रतीक ठरला. कधीही गोलंदाजाच्या आमिषाला बळी न पडता त्याला जेरीस आणून खराब चेंडू वर हल्ला करण्याची त्याची शैली ही भारतीय क्रिकेटची ओळख बनली. संघ अडचणीत असताना नांगर टाकणारा द्रविडच...

२००४ साली सुरू झालेल्या आयसीसी पुरस्कारांमध्ये पहिली सर गारफील्ड सोबर्स वर्षातील सर्वोत्तम खेळाडूची ट्रॉफी द्रविडलाच मिळाली.. त्याच्या नेतृत्वात इंग्लंड आणि वेस्ट इंडिज मध्ये भारतीय संघाने मालिका विजय साजरा केला. पण म्हणतात ना हर किसीको मुक्कमल जहाँ नहीं मिलता द्रविडचं तसंच झालं कारकिर्दीत ३ विश्वचषक खेळला एकदा फायनलला ही पोहोचला मात्र ते विश्वचषकाच कोंदण काही त्याला खेळाडू म्हणून लाभलं नाही ते पूर्ण झालं ते २०१८ साली प्रशिक्षक 
म्हणून...

वयाचा ४८ व्या वर्षात पदार्पण करताना त्याच्याबद्दल लिहावं तेवढं कमीच आहे.

असो पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच त्याचे शिष्य अंडर १९ च्या विश्वचषकात आपले विजेतेपद राखण्याचा प्रयत्न करतील त्याच्यासाठी ही शुभेच्छा!!!💐💐💐
-🖋️ Harshad Mohan Chaphalkar

विकून टाक बँका आता ....

#मूळकवी: जगदीश खेबुडकर
#मूळकविता: उघड दार देवा आता....

बँकेची तिजोरी, जनतेचाच पैसा
विकून टाक बँक आता, विकून टाक बँका

बसते एसी केबिन मधुनी, जात मॅनेजरची
मनी कर्मचाऱ्यांच्या का रे भिति खासगीकरणाची
माजलेल्या कर्मचाऱ्यांनी संप का करावा??

उजेडात होते काऊंटिंग, अंधारात अकौंटिंग
ज्याचे त्याचे Money आहे कष्टाचेच माप
कर्जबुडव्यांनाच कैसे मिळे कर्जाचा मेवा

व्याजदर जणू भिंतीवरचा दाखवे स्वप्नं बिलोरी
आपुलाच क्रेडीट स्कोर होतो, आपुलाच वैरी
दरमहा ईएमआयचा तोल कसा सावरावा....

- हर्षद मोहन चाफळकर 
०५०४२०२१०३२९

Sunday, January 16, 2022

कायंदे पाटील BTR

🌼 *।।श्रीगुरुदेवदत्त।।* 🌼
💠जन्मवेळ: ०१.२४.०० यावेळी लग्नाचा सब्लॉर्ड शुक्र आहे तो चंद्रा बरोबर एकच राशीत असल्याने वेळ बरोबर आहे असे म्हणण्यास हरकत नसावी...

💠29 व्या वर्षी पीएचडी: त्यावेळी चंद्राची महादशा आणि मंगळ अंतर्दशा... चंद्र हा फोर स्टेप मध्ये 5(यश) 8 (संशोधन) 10 (कीर्ती) चा कार्येश आहे त्याकरणाने यश... मंगळ हा 3 (पराक्रम), चा बलवान कार्येश असल्याने सगळे अडथळे पार करून आपली पीएचडी पूर्ण झाली... 
💠1988 मध्ये आईचे निधन: त्यावेळी रवी ची महादशा गुरू अंतर्दशा: रवी हा 3,12 चा कार्येश कारणाने त्याकाळात मातृ वियोग शिवाय चंद्र शनी चया पूर्ण दृष्टीत कारणाने तसेही मातृ सौख्य कमीच म्हणूनच मावशी मदतीला आली...

💠 विवाह डिसेंबर 1991: त्यावेळी रवी दशा शुक्र अंतरदशा रवी 2,7,11 चा कार्येश.. शुक्र 2,5,7 चा कार्येश... शिवाय गुरूही सिंह राशीत पूर्ण गुरुबळअसताना विवाह...
💠 चैतन्य: मे 1993: त्यावेळी चंद्र दशा चंद्र 2,5,11 चा कार्येश कारणाने प्रथम संतती.. मंगळ अंतर्दशा: मंगळ सुद्धा 5 च कार्येश संतती झाली...
💠गौरव: एप्रिल 1995: त्यावेळी चंद्र दशा गुरू अंतर्दशा चंद्र पुन्हा 2,5,11 चा कार्येश.. गुरू 2, चा कार्येश...
💠1999/2000: ग्रंथ प्रकाशन: त्यावेळी चंद्र दशा शुक्र अंतर्दशा: चंद्र 3 (लेखन, प्रकाशन) चा बलवान कार्येश.. शुक्र देखील 3 चा बलवान कार्येश....

💠Moral आणि ethics: सिंह/मघा इतकंस पुरे आहे.. एवढ्यावरच लोकांना माणूस तडजोड करणार नाही हे नक्की समजते...
💠2006: मोठ्या हुद्द्यावर काम: मंगळ दशा बुध/केतू अंतर्दशा बुध 3 आणि केतू 6 चा कार्येश... 3(पराक्रम) 6 (निवडणुकीत विजय..) पूरक आहे..

💠2009: पुन्हा नेमणूक: राहु के पी कुंडलीत लाभ स्थानात... कारणाने राजकारणाचा का राहु त्याच्याच दशा/अंतरदशेत बिनविरोध निवडून दिले..
💠 1997: जमीन खरेदी: त्यावेळी चंद्र दशा.. शनी अंतर्दशा.. चंद्र : 4 चा कार्येश... शनी सुद्धा 4 चा कार्येश.... झाली जमीन खरेदी...

💠 भावांशी वाद: यासाठी 3 आणि 11 चे सबलोर्ड बघू...
3 चा सबलॉर्ड: शनी (अष्टम स्थानात अष्टम स्थान हे वारसा हककाचे स्थान तिथेच हा शनी जाऊन बसलाय.. वाद तर होणारच...)

11 चा सब हा 11 सोडून बाकी सगळ्या विरोधी भावांचा कार्येश आहे म्हणजे तुमची भावंडं मोठी असो वा लहान त्यांची तुमचे पट ने नाही...

आता अपयशाची कारणे बघू...

सगळ्यात महत्त्वाचं कारण.. चंद्र शनीच्या सरळ दृष्टीत *विष योगात* विष योगाची माणसं कर्ण सारखी असतात.. सगळ असते त्यांच्याकडे पण महत्त्वाच्या क्षणी ते डावे ठरतात...

तोच शनी दशम स्थानावर दृष्टी ठेवून आहे कारणाने सत्ता पदाला पोहोचू देत नाही.. 


असा एवढा सगळा खटाटोप असतो सर वेळ शोधण्याची म्हणजे... वेळ लावल्याबद्दल क्षमस्व!!!!
💠
करता करविता गुरूदेव दत्त
🙏 _*श्रीदत्तात्रयर्पणमस्तू*_ 🙏

espncricinfo प्रश्न

मी विचारलेला प्रश्न espncricinfo वर प्रकाशित झाला