टी20 साठी वर्ल्ड कप चा बळी???
पुढच्या वर्षी ऑक्टोबर - नोव्हेंबर 2023 मध्ये भारतात वन डे वर्ल्ड कप होतोय..
त्यात पात्र होण्यासाठी आयसीसी ने वन डे सुपर लीग तयार केली ज्यात तेरा नियमित वन डे खेळणारे देश आहेत...
त्यातील पहिले 9 संघ आणि भारत यजमान म्हणून पात्र होणार तो वर्ल्ड कप 10 देशांचा होणार जसा 2019 ला झाला होता...
आता हे पोस्टायच कारण काय तर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलिया विरुद्ध च्या आपल्या तीन वन डे ची मालिका जी जानेवारी 2023 मध्ये होणार होती ती रद्द केली त्या मालिकेचे पोंइंट्स ऑस्ट्रेलिया असे खिरापत म्हणून देऊन टाकले कारण काय तर दक्षिण आफ्रिका स्वतःची T20 लीग सुरू करू इच्छिते त्या मालिके आड ही आंतरराष्ट्रीय मालिका येत असल्याने आंतरराष्ट्रीय मालिका रद्द करून आयपीएल सारखी देशांतर्गत साखळी सुरू करायची आहे..
एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे याआधी मांझी सुपर लीग आणि ग्लोबल टी 20 अश्या दोन प्रयत्न दक्षिण आफ्रिकेचे फसले आहेत... मांझी सुपर लीग तर त्यांना टीव्ही वर फुकट दाखवावी लागली.. त्याच वेळी आयपीएल साठी बीसीसीआय ने पैशाचा पाऊस पाडला... पण यावेळी दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाच्या पाठीशी #सुपरस्पोर्ट ही आफ्रिकेतील सगळ्यात मोठी टीव्ही ब्रॉडकास्टर आहे....बघूया काय होतंय ते....
गेली जवळजवळ दशक भर दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड भिकेला लागलंय... 2023 मध्ये नियमाने त्यांच्याकडे वर्ल्ड कप व्हायला पाहीजे होता, पण त्यांनी हात वर केल्यावर भारताने विडा उचलला....
तर याचा परिणाम असा की, दक्षिण आफ्रिका 2023 च्या वर्ल्ड कप ला थेट पात्र होणार नाही त्यांनी झिम्बाब्वे मध्ये जाऊन वर्ल्ड कप पात्रता फेरी खेळायचं ठरवलंय...
पण जर डाव उलटला (शक्यता कमी किंबहुना नाहीच) तर 1992 नंतर पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिकेशिवाय होईल....
यातून अजून एक गोष्ट अधोरेखित झाली... क्रिकेट मंडळ आता टी20 कडे सोन्याचं अंड नव्हे तर सोन्याचं घबाड देणारे साधन म्हणून पाहू लागलंय... पण या सगळ्यात विकेट पडणार ती वन डे क्रिकेटची.....
- हर्षद मोहन चाफळकर ( Harshad Chaphalkar )
No comments:
Post a Comment