Tuesday, February 11, 2020

दर्शन कुलदेवतेचे

*धन्य जाहलो*

मी पेशाने शिक्षक आहे. त्यामुळे वीकेंड शिवाय मला दिवाळी, नाताळ आणि उन्हाळा अश्या सुट्ट्या ही भरपूर मिळतात...
 एकूण 365 पैकी 215 दिवस शालेय कामकाजाचे दिवस भारतात म्हणजे पहा आम्ही किती सुखी प्राणी आहोत ते...

 मग अश्याच सुट्ट्या पर्यटन, देवदर्शन करून  सत्कारणी लावण्याचा माझा प्रयत्न असतो अशीच एक संधी मी 2015 च्या दिवाळीच्या सुटीत साधली. म्हटलं माझ्या कळत्या वयात काही कुलदैवताचे दर्शन झाले नव्हते आणि मनस्वी इच्छा झाली होती.
 मग कार्यक्रम आखला... पहिल्यांदा श्री क्षेत्र गुड्डापूर येथे कुलदेवता दानम्मा देवी, मग येडूर(कर्नाटक) येथील श्री वीरभद्र, शेवटी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील मनोहर पादुकांचे दर्शन घेऊन रिटर्न पुणे असा चार दिवसाचा प्लॅन आखला...
 तारखा अजून लक्षात आहेत..
14 नोव्हेंबर 2015 ला सकाळी 6 वाजता जत ची गाडी पकडली ती साधारण दुपारी 1 च्या आसपास पोहोचली असेल जत स्थानकावरून गुड्डापूर ला एसटी असते अशी माहिती होती.. साधारण संध्याकाळच्या वेळी गुडडापूर गाठले संध्याकाळी देवी ची आरती घेतली, रात्रीचा मुक्काम तिथल्याच भक्तनिवसात केला...
 दुसऱ्या दिवशी 15 नोव्हेंबर 2015 ला सकाळी पुन्हा देवीचे दर्शन दुपारी नैवेद्य दाखवून प्रसाद घेऊन येडूरच्या दिशेने प्रवास सुरु केला. गुडडापूर ते सांगली ते कोल्हापूर ते येडूर ला जाण्यासाठी मांजरी फाटा लागतो तिथे उतरलो आणि संध्याकाळी साधारण सात साडेसात च्या सुमारास येडूर च्या भक्त निवासात मुक्काम केला... दुसऱ्या दिवशी 16 नोव्हेंबर 2015 ला ओल्या अंगाने वीरभद्राचा रुद्राभिषेक करून सकाळी 8 च्या आत येडूर चा मुक्काम झाला होता. तिथेच राहावे तर दिवस वाया गेला असता.. आणि नृसिंहवाडी ला जावे तर दुपारीच पोहोचलो असतो पुढचा कार्यक्रम विसकटला असता... 
म्हणतात ना बोलावणे आले की कुठल्याही गोष्टींचा अडथळा येत नाही आणि गोष्टी सहजसाध्य होतात....
टीव्हीवर शरद उपाध्येंकडून *श्रीमहालक्ष्मी अष्टक* चा महिमा ऐकला होता आणि 2012 पासून मी स्वतः आणि माझे वडील दोघेही अनुभव प्रचिती घेत होतो. येडूर मधून मुक्काम हलवताना वडलांच्या मनात का कुणास ठाऊक पण इच्छा झाली... इतक्या जवळ आलोय तर श्री महालक्ष्मींचं दर्शन झालं तर बरं होईल. थोडं झटपट आवरलं तर कदाचित दुपारची आरती पण मिळेल...
सकाळी रुद्राभिषेकाच्या निमित्ताने अंघोळ लवकर झाली होती. कुठे तरी रस्त्यात पटकन दोन घास नाष्टा करावा आणि कोल्हापूर गाठावं असं ठरलं. 
महालक्ष्मीने बोलावल म्हटल्यावर झटपट एसटी मिळाल्या आणि 11.15 ला कोल्हापूर एसटी आगारात गाडी घुसली... पटकन रिक्षा मिळाली...

कोल्हापूरचे रिक्षावाले मुखदर्शनावरचेच गिऱ्हाईक शोधत असतात बहुतेक खरं का हो @⁨Yuva Vijayraj Potdar⁩ ???
आम्हाला असाच एक रिक्षावाला भेटला.. सायेब लै लाईन हाय बगा... संध्याकाळ हुईल नंबर यायला माझं ऐका मुखदर्शन घ्या मी तुम्हाला वाडीला मुक्कमाला पोहोचतो(रिक्षावाला??? 😆😆😆)
दर्शन रांग खरंच बाहेरच्या दारावर अली होती आणि क्षणभरासाठी त्याचे शब्द(संध्याकाळ हुईल) खरेच वाटले... पण म्हटलं ना महालक्ष्मीने बोलावणे धाडलं होतं. शेवटी ठरवलं कितीही उशीर झाला संध्याकाळच काय रात्र झाली तरी पूर्ण दर्शन घेऊनच पुढचा प्रवास करायचा... आणि काय आश्चर्य अगदी बरोबर दुपारच्या आरतीच्या काही क्षण आधी श्रीमहालक्ष्मी ची *मूळ मूर्ती* चे दर्शन झाले आणि मी धन्य झालो चा शब्दशः अनुभव घेतला

कदाचित त्यादिवशी मला चंद्र 9 वा असावा बहुतेक,, नाही का  @⁨Sachchidanand Washimbekar⁩ गुरुवर्य ???
 त्या दर्शनाने नवीन ऊर्जा, नवी स्फूर्ती घेऊन संध्याकाळी नृसिंहवाडी येथे पोहोचलो तिथे संध्याकाळची पालखी, 17 नोव्हेंबर2015 ला  पहाटे *मनोहर पादुकांचे* दर्शन, श्रीगुरुचरित्राचे पठण, प्रदक्षिणा आणि दुपारी पुण्याला परतीचा प्रवास सुरु करायच्या आधी प्रसाद घेतला आणि समाधानाने धन्यतेने पुण्याचा परतीचा प्रवास सुरु केला. संपूर्ण प्रवासात कुठेही मनस्ताप नाही... उलट प्रत्येक टप्प्यावर नवीन ऊर्जाच मिळत गेली.... 

इतक्या सुंदर प्रवास आणि देवदर्शनाने *खरंच,खरंच धन्य जाहलो*
- हर्षद मोहन चाफळकर,
पुणे
🙏 *धन्यवाद*🙏

No comments:

Post a Comment

espncricinfo प्रश्न

मी विचारलेला प्रश्न espncricinfo वर प्रकाशित झाला