Monday, February 10, 2020

मोलकरीण

झर झर पावले टाकत ती आमच्या घरी येते...
फार शिकलेली नाही ती...
पण कसं काय कोणास ठाऊक सकाळी 9 वाजून 40 मिनिटं 00 सेकंद होतात आणि तिची चप्पल दाराच्या एका कोपऱ्यात विसावते..
झटपट भिजवलेले कपडे घेते घसारा मारते....
काम उरकण्याची घाई इतकी की दोन माणसांचे कपडे 10व्या मिनिटाला घासून धुवून ही भांडी घासायला घ्यायला मोकळी..
भांडी कितीही असो दहाव्या  मिनिटाला तिची भांडी ही घासून होतात.🤔🤔🤔..

काम करते की पाट्या टाकते काही कळत नाही...


कपडे घासताना ती तिच्या टाचा सुद्धा घासते🤦‍♂🤦‍♂🤦‍♂
परिणाम असा की कपडे भले नीट स्वच्छ न निघो पण तिचं तिच्या टाचांकडे विशेष लक्ष असतं...

कधी कपडे नीट स्वच्छ न निघाल्याचे दाखवून दिल्यास ती वर सांगते *अहो घासले कीssssअजून किती घासू? माझ्या हातात जोर नाही बगा.. लैच वाटत असल तर तुमीच घासा कपडे...* नाईलाजास्तव आपणच आपले कपडे पुन्हा एकदा घासायचे...
सगळं सहन करून हिला पगार 1/2तारखेलाच पाहिजे..(कुठल्या खाजगी नोकरीत मिळतात?) दर वर्षी पगार वाढवून पाहिजे... दिवाळी पाहिजे.. बक्षीस पाहिजे...

कधी तिला लवकरच जायचं असतं... कधी तिच्या लांबच्या नातेवाईकात लग्न असत...
 कधी तिला तिचे सण असतात....
कधी आजारी असते.. कंबरच दुखते... डोकच दुखत....

कधी काहीच कारण नसतं पण हक्काची सुट्टी असल्यासारखी रजा हवी असते....
कारण विचारलं तर *काय सुट्ट्या घेऊ नये का माणसाने???* उलटा प्रतिप्रश्न असतो.. 

रजा सुट्टी घ्यायची तिची पद्धत पण युनिक आहे सगळं काम करत असताना ती एका शब्दाने ही सांगणार नाही निघताना पायात पायताण चढवलं की दारातूनच हळूच आवाजात सांगणार बॉम्ब टाकणार "मी उद्या येणार नाही बरं का"😢😢😢

त्या क्षणापासून दुसऱ्या दिवसाची धुणं भांडी कशी करायची ? या विचारानेच आमची झोप उडते...😢😢

कधी तरी न परस्पर दांडी मारण्याची किमया ती तिच्या इतर मैत्रिणींसारखी करतेच...

विचारलं तर परत म्हणायचं फोन केला होता पण लागला नाही... बॅलन्स संपला....

अशी एक ना अनेक कारणं...

एवढं सगळं असूनही ही मोलकरीण आमच्याकडे गेली 20 वर्ष काम करते त्याअर्थी काही गुण ही असलेच पाहिजेत...
सगळ्यात महत्त्वाचं पडेल ते काम करते...
इतर मोलकरणींसारखे आज कपडे जास्त आहेत ब्वा....
दोन माणसांची एवढी भांडी??? असे प्रश्न तिने आजवर केल्याचे आठवत नाही....

एकूण काय तर मोलकरीण आमच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाली आहे...

- हर्षद चाफळकर, 
पुणे

🙏धन्यवाद🙏

No comments:

Post a Comment

espncricinfo प्रश्न

मी विचारलेला प्रश्न espncricinfo वर प्रकाशित झाला