मित्रा फ्लॅट विकला जाईल का रे???
माझा एक जवळचा मित्र आहे त्याने वरील प्रश्न केला होता...
प्रश्न पहिला ती वेळ
25 जानेवारी 2020
21.05.03
पुणे
#L: सिंह- रवी
#LS: पूर्वा फाल्गुनी- शुक्र
#S: श्रवण - चंद्र
#R: मकर-शनी
#D: शनी
#नियम: प्रतिस्पर्ध्याशी सौदा 7 आणि त्याची 4,11,12 म्हणजे लग्न कुंडलीतील 10,5,6 ही स्थाने.
दशमाचा सब जर 10,5,6 पैकी एकाचा कार्येश असेल तर घर विकले जाईल.
सुरुवातीला चंद्राची साक्ष घेऊ
चंद्र RP त आहे
चंद्र 6/12
नक्षत्रस्वामी चंद्र 6/12
उपनक्षत्र स्वामी बुध 2,6,11
प्रत्येक टप्प्यावर चंद्र 6 दाखवतोय म्हणजे जातकाची प्रतिस्पर्ध्याला घर विकण्याची मानसिकता अधोरेखित झाली.
आता नियम तपासूयात
१. दशमाचा सब बुध आहे.
बुध 6/2,11
न.स्वामी: चंद्र 6/12
उपनक्षत्र स्वामी शुक्र 7/3,10
बुध स्वतः आणि नक्षत्र पातळीला 6 चा कार्येश आणि उपनक्षत्र पातळीला 10 चा कार्येश आहे. ✅
२. सप्तमाचा सब चंद्र आहे व तो 6/12 आणि उपनक्षत्र पातळीला 6/2,11 चा कार्येश आहे. म्हणजे व्यवहार होण्यासारखी परिस्थिती वाटली.✅
३. त्याचा पुढचा प्रश्न होता की खरेदीदार कुठून येईल?
केवळ RP चा विचार केला तर रवी सरकारी अधिकारी दाखवते.
शनी दोनदा आलाय म्हणजे कदाचित वयस्कर सेवानिवृत्त व्यक्ती असू शकते असा मी आपला खडा टाकला. तेवढ्यात त्याने मला अशी एक व्यक्ती उत्सुक असून फ्लॅट बघून गेल्याचे सांगितले.
शेवटी RP त पुन्हा डोकावले शुक्र दिसत होता. त्यावरून त्याला सांगितलं की त्याच्या पत्नीच्या ओळखीतून व्यवहार शक्य आहे.
४. व्यवहार फायदेशीर होईल का रे? आणखी एक प्रश्न
सप्तमाचा सब चंद्र आहे. आणि तो उपनक्षत्र पातळीवर 6/2,11 चा कार्येश होतो म्हणजे कदाचित त्याला व्यवहारतून फायदा संभवतो.✅
५. कधी पर्यंत विकला जाईल? प्रश्न सुरू च होते...
RP त शनी दोनदा आहे पण त्यापेक्षा बलवान अनुक्रमे रवी, शूक्र आणि चंद्र आहेत म्हणजे थोडा विलंब होऊ शकतो पण अगदीच होणारच नाही अशी परिस्थिती नव्हती.
RP प्रमाणे
रवी- सिंह
शुक्र- वृषभ/तूळ
चंद्र- कर्क
शनी- मकर/कुंभ
अश्या राशीतील रवी भ्रमणा चा विचार केला...
रवि च्या राशीत शुक्राचे नक्षत्र आहे पण तो कालावधी फार लांब आहे. शेवटी सगळा विचार करून
शुक्राच्या वृषभ राशीत रवीचे नक्षत्र आणि चंद्राचे नक्षत्र यातून जेव्हा रवीचे भ्रमण होईल तेव्हा फ्लॅट विकला जाऊ शकेल साधारण 15 मे ते 6 जून 2020 असा कालावधी सांगून टाकला.
प्रश्नकुंडली वरून दिलेल्या कालावधीत लग्न कुंडलीतील महादशा, अंतर्दशा, विदशा ही अनुकूल असल्यास घटना घडण्याची शक्यता वाढते.
दिलेल्या कालावधीत जातकाला
गुरू महादशा
गुरू 4/1,3,12
नस्वा: रवी 1/8
उपनक्षत्र स्वामी गुरू 4/1,3,12
शनी अंतर्दशा
शनी 12/2
नक्षत्रस्वामी शुक्र 1/5,10
उपनक्षत्रस्वामी रवी 1/8
शुक्र विदशा
शुक्र 1/5,10
नस्वा. 1/8
उपनक्षत्र स्वामी: शुक्र 1/5,10✅
म्हणजे फ्लॅट विकला जाईल अशी आशा करायला हरकत नाही.
-🖋️ Harshad Mohan Chaphalkar
ज्योतिष विशारद, पुणे
📲9765417361
🙏।। #श्रीदत्तात्रयर्पणमस्तू।।🙏
No comments:
Post a Comment