पूर्वप्रसिद्धी: क्रिककथा २०२५ (संपादक: कौस्तुभ चाटे)
2009 साली एवरेस्ट बेस कॅम्प शेजारी गोराक शेप येथे एका चॅरिटी साठी सामना झाला होता. त्यात UK मधून साधारण 50 खेळाडू सहभागी झाले होते. यां सामन्यातून 250,000£ निधी गोळा झाला होता. आजतागायत तो सर्वोच्च उंचीवर (16945 फूट / 5165 मीटर) खेळला गेलेला क्रिकेट सामना म्हणून त्याची नोंद आहे.
२. क्रिकेट इतिहासातला सर्वात लांब षटकार हा 900 किमी लांब मारल्याची नोंद आहे.
त्याचं झालं असं की दक्षिण आफ्रिकेच्या जिमी सिनक्लेअर याने वॉन्डरर्स मैदानातून एक षटकार मारला तो मैदानाच्या बाहेर असलेल्या रेल्वे स्टेशन वर उभ्या असलेल्या एका ट्रेन मध्ये जाऊन पडला. ती ट्रेन वॉन्डरर्स च्या स्टेशन वरून सुटली ती 900 किमी लांब असलेल्या पोर्ट एलीझाबेथ स्टेशन ला थांबली. साहजिकच तो बॉल परत मिळवता आला नाही.
३. जगात असे दोन अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आहेत जिथे मैदानात मोठे वृक्ष आहेत.
दक्षिण आफ्रिकेतील सिटी ओव्हल, पीटर मारिट्झबर्ग आणि सेंट लॉरेन्स ग्राउंड, केंट इंग्लंड.
पीटर मारिट्झबर्ग येथे 2003 च्या विश्वचषकातील भारत वि नामिबिया सामना खेळवला गेला होता.
सेंट लॉरेन्स ग्राउंड, केंट, इंग्लंड च्या मैदानावर ऑस्ट्रेलिया वि बांगलादेश हा सामना 2005 साली झाला होता. आता हे मैदान मुख्यत्वे अंतरराष्ट्री महिला क्रिकेट सामन्यासाठी वापरले जाते.
४. 2006 साली भारतात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी मधील ब्रेबॉर्न स्टेडियम वर झालेल्या ऑस्ट्रेलिया वि वेस्ट इंडिज सामन्यात मुंबई चा रणजी खेळाडू विनायक सामंत वेस्ट इंडिज साठी क्षेत्ररक्षण करायला बदली खेळाडू म्हणून आला होता. त्याने काही षटके क्षेत्ररक्षण केले.
५. विराट कोहली हा एकमेव गोलंदाज आहे ज्याने टी 20 अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये एकही वैध बॉल न टाकता पहिली विकेट मिळवली आहे.
2011 साली इंग्लंड विरुद्ध खेळताना कोहली ने पहिलाच बॉल वाईड टाकला आणि त्यावर महेंद्रसिंग धोनी ने केव्हीन पीटरसन ला यष्टीचीत केले.
या विकेट नंतर कोहली चे गोलंदाजी पृथकरण होतं,
0.0 - 0 - 1 - 1
आहे की नाही कमाल !!!
६. 2003 चा क्रिकेट विश्वचषक लक्षात राहतो तो केनिया च्या आश्चर्यकारक सेमिफायनल प्रवेशामुळे.
त्या स्पर्धेत केनिया ने गटसखाळीत कॅनडा आणि बांगलादेश चा पराभव केला शिवाय त्यांनी मायभूमीत श्रीलंकेला ही धूळ चारली. न्युझिलंड ने सुरक्षेच्या कारणास्तव केनिया ला जाण्यास नकार दिला आणि तो सामना केनिया ला बहाल (forfeit) झाला. पुढे गंमत अशी झाली की जिंकलेल्या चार संघांपैकी श्रीलंका आणि न्युझिलंड सुपर सिक्स साठी पात्र झाले त्यामुळे प्रत्यक्ष सामना खेळायच्या आधीच केनिया कडे दोन विजयाचे 8 गुण होते त्यांनी सुपर सिक्स मध्ये झिम्बाबवे चा पराभव केला आणि विश्वचषकाच्या सेमी फायनल ला पोहोचणारा पहिला सहयोगी संघ ठरला.
७. एक चक्रवर्ती शूरवीर योद्धा आणि अवलिया शास्त्रज्ञ एकाच नावात असतील अशी कल्पना कधी केलीये का?
नाही ना... अहो पण असं नावं असलेला एक क्रिकेट खेळाडू कधी काळी विराट कोहली बरोबर एकच संघात होता.
मूळचा तामिळनाडू चा असलेला नेपोलीयन आईन्स्टाईन 2008 साली मलेशिया इथे झालेल्या अंडर 19 विश्व चषक स्पर्धेत भारतीय संघाचा सदस्य होता. आयपीएल मध्ये त्याला चेन्नई सुपर किंग्ज ने करारबद्ध केलं होतं.
८. षटकार मारा, देशाचे नागरिकत्व मिळवा..
ऐकून धक्का बसला ना?
पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये हे झालंय..
2007 च्या वन डे वर्ल्ड कप मध्ये हर्शल गिब्ज ने नेदरलँडस च्या डॅन वॅन बुंग ला एकाच षटकात सलग सहा षटकार मारले असं करणारा तो त्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला पहिला खेळाडू ठरला.
या पराक्रमाचे बक्षीस म्हणून सेंट किट्स अँड नेव्हीस चे तत्कालीन पंतप्रधान डेंझिल डग्लस यांनी गिब्ज ला मानद नागरिकत्व बहाल केले
No comments:
Post a Comment