Sunday, June 1, 2025

बारावी नंतर काय?

बारावी नंतर काय?
Placement Cell: काय रे काय शिकलास?

Me: सर बारावी पास झालो.

 PC: सॉफ्ट स्किल्स काय येतात?

Me: सर दहावी नंतर आई ने मला स्मार्ट फोन घेऊन दिला मी त्यात व्हाट्सअप्प इंस्टॉल केलंय आणि आहे न सर मला मेसेज फॉरवर्ड करता येतो....न वाचता मला मेसेज आला की दुसऱ्या सेकंदाला मेसेज देशभर जातो....

PC: शिव्या देता येतात? 

Me: हो सर व्हेज (जस की बावळट, मूर्ख,वेडा)की नॉन व्हेज(^&*%)?

PC:बस बस कळलं, मीम करता येतात का?

Me: हो सर म्हणजे पिक्चर मधल्या सिन कापून तयार करण्यापासून मोदी आणि राहुल च्या भाषणच्या क्लिप हव्या तश्या एडिट करू शकतो सर....

PC: स्लोगन करता येतात का? 

ME: हो सर म्हणजे आता EXAMPLE बघा 

 "जिंकता येईना अन म्हणे मशीन बिघडले" 

किंवा

 "अव्वाज कोणाचा? मांजरीचा"

PC: FANTASTIC, टॅग LINE करता येते

ME: हो सर FOR EXAMPLE 
अबकी बार #खिचडी सरकार

PC: अरे वा!!!! त अरे तू कसला #बेरोजगार हे तर तुझंच #सरकार, 
ए अरे याला BJP च्या IT CELL मध्ये घ्या रे.....

© Harshad Mohan Chaphalkar

No comments:

Post a Comment

espncricinfo प्रश्न

मी विचारलेला प्रश्न espncricinfo वर प्रकाशित झाला