Tuesday, June 3, 2025

पृथ्वी वरील सर्वात दूरच्या जागा

पृथ्वीवरील दोन अति दूरच्या जागा

पृथ्वी गोल आहे आणि त्यावर सुमारे 71% भाग हा समुद्राने आणि 29% भाग हा जमीनने व्यापला आहे. 

अर्थात समुद्राच्या खाली सुद्धा जमीन आहेच ज्याला आपण समुद्रतळ म्हणतो. 

समुद्राच्या वरचा भूभाग म्हणजे विविध खंड, उपखंड यांच्या सुद्धा अनेक उंच, सखल प्रमाणामुळे मैदाने, पर्वत, डोंगर, दऱ्या बनले. 
समुद्राच्या तळाशी सुद्धा असेच मैदाने, डोंगर, दऱ्या, पर्वत क्षेत्र आहेत.

समुद्रमार्ग आणि जमिनीवरील मार्ग वेगवेगळे असल्याने दोन्हीकडे वेगळ्या प्रकारे वाहतूक होते.

ह्या वाहतुकीच्या मार्गाचे नकाशे बनवताना आणि मोजणी करताना असे काही बिंदू मिळाले जे भौगोलिक दृष्टीने महत्वाचे मानले जातात. 

1] पॉईंट निमो - Point Nemo

पॅसिफिक महासागरात अशी जागा आहे जिथे कोणतेही बेट अस्तित्वात नाही केवळ पाणीच आहे परंतु त्या जागे वर जहाज असल्यास पाण्यामधील सर्वात दूरची जागा असे त्याला मानले जाते. 

याचे कारण तिथून सर्वात जवळचे बेट (जमीन) ही सुमारे 2700 किमी दूर आहे. 

पॉईंट निमो हे समुद्रातील स्थान असे आहे ज्या ठिकाणी जहाज आले तर त्याच्या व्यतिरिक्त दुसरे जवळचे मानव हे केवळ अवकाशातून 400 किमी उंची वरून जाणाऱ्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वरील लोक हेच असतील, बाकी सर्व मानवी वसाहती किमान 2700 किमी दूर असतील असा याचा अर्थ आहे. 

निमो हे नाव Jules Verne's Twenty Thousand Leagues Under the Sea या विज्ञानकथा लेखाच्या पुस्तकातील एका काल्पनिक खलाशाचे नाव आहे. 

2] उरुमकी, चीन - Urumqi, china

जसे पॉईंट निमो म्हणजे समुद्रातील सर्वात दूरची जागा मानली जाते जिथून जमीन सर्वात दूर आहे त्याच्या विरुद्ध म्हणजे जिथून समुद्र सर्वात दूर आहे अशी जागा म्हणजे उत्तर पश्चिम चीन मधील एक शहर उरुमकी. 

उयघूर प्रांत मानला जाणाऱ्या चीनच्या या शहरापासून सर्वात जवळ चा समुद्र किनारा सुमारे 2500 किमी दूर आहे. 

त्यामुळे हा भाग जमिनीचा असा मध्य बिंदू आहे ज्याच्या आजूबाजूला पृथ्वीवरील सर्वात मोठी जमीन व्यापलेली आहे. 

चित्रात दोन्ही बिंदू वेगवेगळे दाखवले आहेत, बघा. 

-------------
@followers माहिती आवडल्यास शेअर बटणाचा वापर करून तुमच्या मित्र परिवाराला पाठवा आणि त्यांना सुद्धा या पेजला लाईक फॉलो करण्यास सांगा.

No comments:

Post a Comment

espncricinfo प्रश्न

मी विचारलेला प्रश्न espncricinfo वर प्रकाशित झाला