Sunday, September 5, 2021

जन्मवेळ शोधणे... BTR

जन्मवेळ शोधणे... (BTR)

ही केस तशी आठवडाभर पेंडिंग होती आज मुहूर्त लागला...

प्रश्नवेळ: 1/9/2021
17.46.06
पुणे
================
मिळालेली माहिती
जातक 
1/2 जानेवारी 1950 (वृषभ रास)
वेळ 1 जानेवारी किंवा 2 ची मध्यरात्र!!
अकोले(विदर्भ)
विवाह: 30/11/1976
पहिला मुलगा : 28/7/1978 (मेष, भरणी)
दुसरा मुलगा: 04/01/1980 (कर्क/पुष्य)
मोठी बहीण: 11/8/1948 (तुळ/स्वाती)

L: शनी(व)❌
LS: मंगळ(केतू)
S: राहू (शुक्र)
R: बुध
D: बुध

दिलेल्या वेळेत येणारी लग्ने 
कन्या: 23.11 (1 जानेवारी) ते 01.20 am (2 जानेवारी)
तुळ : 01.20 am ते 03.32 am
वृश्चिक: 03.32 am ते 05.48 am

आलेल्या RP पैकी शनी वक्री आहे तो उपयोगात आणता येणार नाही त्याचे लग्न ही दिलेल्या कालावधीत येत नाही 
मोठा प्रश्न सुटला...
आता राहिलेल्या RP पैकी  दिलेल्या कालावधीत 

कन्या, तुळ, वृश्चिक लग्न येतात..
पैकी मंगळ बलवान आहे म्हणून त्याच्या लग्नाचा विचार प्राधान्याने केला..
राहिलेल्या RP पैकी बुध नक्षत्रस्वामी (ज्येष्ठा) म्हणून घेता येईल..
शुक्र सबलॉर्ड घेऊ..
बुध RP मध्ये दोनदा आल्याने दोनदा उपयोगात आणता येईल..
सब सब बुध घेऊ

तयार झालेली मालिका अशी 

"वृश्चिक/ ज्येष्ठा/शुक्र/बुध"

ही मालिका 2/1/1950 च्या  पहाटे 05.05.30 यावेळी उदित होते म्हणून हीच जन्मवेळ म्हणूया...

आता, टॅली...

१. लग्नाचा सब शुक्र चंद्राचा राशीस्वामी आहे..
२. लाभाचा सब शनी आहे तो जातकाच्या पत्रिकेत सिंह राशीत शुक्राच्या नक्षत्रात आहे.. शुक्र मोठ्या बहिणीचा राशीस्वामी

३. विवाह वेळी दशा राहू/मंगळ
राहू: 2,4,8,11
मंगळ: 1,6,10, मंगळ सबलॉर्ड पातळीवर शुक्रच्या उपनक्षत्रात कारणाने 2,7,12चा कार्येश

४. पहिले आपत्य वेळी..
दशा: गुरू/गुरू
गुरू: 2,5 (5 चा एकमेव कार्येश)
गुरू: 2,5 (5 चा एमकेव कार्येश)
5 चा सब्लॉर्ड शनी (शुक्राचा नक्षत्रात, शुक्र मुलाचा नक्षत्रस्वामी)

५. दुसरे अपत्य वेळी 
दशा: गुरू/शनी
गुरू 2,5
शनी: 2,3,4,7,9,12 (2,7 पूरक)
7 चा सबलोर्ड शुक्र (मकर राशीत, शनी दुसऱ्या मुलाचा नक्षत्रस्वामी)

🙏  _*।।श्रीदत्तात्रयर्पणमस्तू।।*_🙏

Monday, August 9, 2021

ऑलिम्पिक च्या निमित्ताने

हे आपले या वर्षीचे पदकविजेते आहेत...
नीरज चोप्रा (24 वर्ष)
मीराबाई चानू (27 वर्ष)
पी व्ही सिंधु (26 वर्ष)
लवलीना बोर्गोहेन (23 वर्ष)
बजरंग पुनिया (23 वर्ष)
रवी कुमार दहिया (24 वर्ष)
भारतीय हॉकी संघ (सरासरी वय 26 वर्ष)
आकडे बऱ्याचदा बोलतात अस मी मानतो 100% वास्तव भले सांगणार नाहीत पण आकडे एक व्यापक चित्र नक्की उभं करतात..
मी सुरवातीलाच पदकविजेत्यांची वय का लिहिली माहितीये?? मी एक संबंध जोडण्याचा प्रयत्न करतोय कदाचित तो चुकीचा असेल पण बघा विचार करून...
सहस्त्राकाचं पहिलं ऑलिम्पिक सिडनी 2000 त्यावेळी यांची वये काय असतील?? मलेश्वरी ब्रॉंझ जिंकत असताना मीराबाई चानू आणि सिंधू सोडली तर बाकीचे सगळे अजून शाळेची पायरी पण चढले नव्हते...
अथेन्स 2004 ला राज्यवर्धन राठोड डबल ट्रॅप मध्ये सिल्वर मिळवत होते तेव्हा सिंधू तिच्या 9व्या वर्षात होती चानू 11 वर्षांची होती... बाकीचे अजूनही 8 च्या आतच!!!
2008 च्या बीजिंग ऑलिम्पिक मध्ये हे पदकविजेते त्यांच्या शालेय जीवनाच्या उत्तरार्धात असतात.. आणि टीव्हीवर अभिनव बिंद्रा गळ्यात सुवर्णपदक घालून राष्ट्रगीताला मानवंदना देत असतो.. आणि दरम्यान या प्रत्येक टप्प्यानिशी भारतातील क्रीडा विषयीची पायभूत सुविधा उत्तरोत्तर वाढत जाते...
 माझ्या मते ते अभिनव बिंद्रा चं सुवर्णपदक.. या लोकांना  किती प्रेरणा देऊन गेलं असेल... क्रिकेटेतर खेळ ही भारतात खेळले जातात.. त्या सगळ्या खेळाचं सर्वोच स्थान कुठलं तर ऑलिम्पिक... If Bindra can why can't we?? अश्या देशाच्या क्रीडा इतिहासातील माईलस्टोन घटनेतून आजचा चोप्रा, बोर्गोहेन किंवा सिंधू, पुनिया, दहीया तयार होत असतात..
आणखी या बिंद्राच्या सुवर्णक्षणात भर कशाची पडली माहितीये??
साल 2008 चे पुण्यात इथे बालेवाडी ला झालेले युवा राष्ट्रकुल स्पर्धा लगेच दोन वर्षात 2010 चे राष्ट्रकुल स्पर्धा (ब्रिटिश राजवटीच्या देशांच्या स्पर्धा, यात आजचे ऑलिम्पिक चे टेबल टॉपर नसतात...) त्याच वर्षी म्हणजे 2010 चा हॉकी वर्ल्ड कप.. म्हणजे अचानक देशात एक क्रीडा स्पर्धांच वातावरण तयार झालं होतं.... 
मग असे स्पर्धा भरवून आपल्याला काय मिळत?? या प्रश्नाचं उत्तर मिळायला 10 वर्ष जावी लागतात....
भारतासारख्या 130-135 कोटींच्या खंडप्राय देशात किमान 50 ओलिम्पिक पदक मिळवणारे का तयार होऊ नयेत?? असे प्रश्न काही लोकांना पडतात...
त्याचं उत्तर आज जे नीरज चोप्रा च्या बाबतीत झालं त्यावरूनच कळतं... चोप्रा ने सुवर्णपदक मिळवल्यावर त्याला सरकारी नोकरी मिळाली.. हरयाणा सरकार ने जमीन बक्षीस दिली म्हणे.. मोठ्या आर्थिक बक्षिसांची घोषणा झाली असंही कळलं..
हे सगळं नंतर झालं.. दोन-तीन दिवसांपूर्वी नीरज चोप्रा मला पण माहीत नव्हता.. (खरं सांगतो..) त्याच्या युरोपियन प्रशिक्षकाने पदक जिंकल्यावर व्यवस्थेवर ओढलेले ताशेरे वाचा मग आपल्याला समजेल की खेळाडू घडवताना मेहनत घ्यायची असते.. आर्थिक पाठबळाची तेव्हा खरी गरज असते.. मानसिक आधार प्रोत्साहन लागतं... ते नेमकं तेव्हाच मिळत नाही.. आणि मग अदिती अशोक चं पदक हुकलं, महिला हॉकी संघाचं ब्रॉंझ शेवटच्या काही क्षणात गेलं म्हणून हळहळ व्यक्त करत 4 वर्ष घालवायची... रिओ 2016 मध्ये अभिनव बिंद्राचं ब्रॉंझ काही शतांश गुणांनी गेलं.. दीपा कर्माकर रिओ मध्येच 4थ्या स्थानावर राहिली... तशीच आज अदिती अशोकचा  शेवटच्या शॉट चुकला आणि आधी सिल्व्हर जवळपास निश्चित मानलं जात असताना.. ब्रॉंझ ही हाती लागलं नाही... इथं आपले खेळाडू मोक्याच्या क्षणी धीर सोडतात..
2008 मध्ये विजेंदर सिंग ने बॉक्सिंग मध्ये आणि सुशील कुमार ने कुस्तीत पदक मिळवलं होतं... तेव्हा पासून शूटिंग शिवाय बॉक्सिंग, कुस्ती आपल्याला सलग पदक मिळवून देत आहेत... अजून तिरंदाजीचा दुष्काळ संपलेला नाही..
आज अदिती अशोक चौथ्या स्थानी राहू दे पण  पॅरिस (2024)  लॉस एंजेलीस (2028) आणि ब्रिस्बेन (2032) मध्ये गोल्फ मधून ही पदक मिळत राहीली पाहिजे.. 
-✒️ हर्षद मोहन चाफळकर , पुणे
०८०८२०२१२३५८

Friday, May 7, 2021

दिवस असे की...

#मूळकवी: संदीप खरे

दिवस असे की काँग्रेस माझी नाही
अन्‌ मी काँग्रेसचा  नाही

केरळच्या बॅक वॉटर मध्ये भिजतो
पराभवावर हसणे थुंकून देतो
या पराभवाचे कारण उमगत नाही,
हे हसणे थांबत नाही

पत्रांचे हे एकसंधसे "23" तुकडे
त्यावर नाचे हायकमांडचे घोडे,
हा  घोडा उत्तर शोधत आहे
परि मजला गवसत नाही

मी जनेऊधारी की मी दत्तात्रय गोत्री
घांदी वा मी इटलीवाला गांधी,
अस्तित्वाला हजार नावे देता
परि गाव आठवत नाही

'मम्मी' म्हणताना आता हसतो थोडे
मिटून घेतो वस्तुस्थितीचे डोळे,
या जगण्याला स्वप्‍नांचाही आता
मेघ पालवत नाही....

- ✍️ हर्षद मोहन चाफळकर , पुणे
०४०५२०२११९४६

Saturday, April 17, 2021

शेन वॉर्न एखादाच


माझी एक खंत आहे...

भारतात शेन वॉर्न च्या जातकुळीतला फिरकी गोलंदाज झाला नाही आणि येत्या काही दशकात होताना पण दिसत नाही...

माझा मुख्य रोख मनगटी फिरकी गोलंदाज (मराठीत त्याला wrist spinner अस म्हणतात)असा आहे...
शेन वॉर्न ने 1993 साली भारताविरुद्ध सिडनीत पदार्पण केलं तेव्हा पासून त्याच आणि भारताचं अनोखं नातं जुळलं भारतीयांनीच त्याला लीलया खेळून त्याची पिसे काढली.. तेंडुलकर ने रातोरात त्याचा निद्रानाश केला सुरुवातीच्या काळात शास्त्री, कांबळी या मुंबईच्या खेळाडूंनी त्याला स्थिरावण्यास वाव दिला नाही पुढे येऊन भिरकावून लावला... नंतर द्रविड, लक्ष्मण हे त्याचे हाडवैरी झाले....
तरीही तो 708 कसोटी बळी घेऊन सर्वाधिक बळी मिळवण्याच्या यादीत मुरलीधरन च्या नंतर दुसरा आहे...
वॉर्न च्याच कारकिर्दीत ऑस्ट्रेलिया कडून स्टुअर्ट मॅकगील कायम वॉर्न च्या सावलीत राहिला वॉर्न च्या अनुपस्थितीत मुख्यत्वे खेळला पण त्याने सुद्धा संधी मिळताच लेग स्टंप वर मारा करत ऑफ स्टंप कडे हातभार वळणारा आक्रमक गोलंदाजी केली... क्लासिकल लेग स्पिनरच दोघे!!!
या दोघांच्या समकालीन भारताकडे कुंबळे, पाकिस्तानकडून दानिश कनेरिया एवढेच लेग स्पिनर होते इतर देशात लेग स्पिनर मला आठवत नाही!!!!

मुळात क्लासिकल लेग स्पिन (wrist spin) ही अवघड कला आहे... इतर ऑफ स्पिनर  (finger spinner) च्या तुलनेत wrist spinner चा चेंडूवरील नियंत्रण किंचीत कमी असते... फ्लाईट, जास्त स्पीड कमी..
 पडला तर फुल लेंग्थ, नाहीतर हाफ ट्रॅकर अशी अवस्था असते...म्हणून शक्यतो कोणी wrist spin च्या भानगडीत पडत नाही आणि आता T20 च्या झटपट जमान्यात कोणाला एवढा वेळ आहे फ्लाईट देऊन बॅट्समन ला हवेत चकवून सिक्स मारण्याचे अमिश दाखवून बाऊंडरी वर झेलबाद करायचं किंवा मागे विकेटकीपर कडून दांडी उडवायची???

आता T20 च्या जमान्यात सगळे स्पिनर शक्यतो विकेट टू विकेट मारा करतात त्याला बचावात्मक गोलंदाजी म्हणतात.. फार फार तर काय हाताच्या मागच्या बाजूने बॉल रिलीज करून गुगली टाकायची...
आयपीएल आता सुरू झाली आहे.. आठही संघातले लेग स्पिनर शोधा आणि लक्ष ठेवा त्यांच्याकडे 24 बॉल पैकी निम्मे बॉल गुगली टाकणार विकेट टू विकेट मारा करणार..
एखादा अमित मिश्रा ऑफ स्टंप वर बॉल टाकून फ्लाईट देण्याचं धैर्य दाखवेल बाकी बहुतेक लोकं गुगली नाहीतर विकेट वर बॉल...
पाकिस्तान चा यासीर शहा स्पिन करतो पण तो तितकासा फ्लाईट देताना मी बघितला नाही!!!

लेग स्पिनर हा जुगारी असतो... आपल्याकडे असणाऱ्या फ्लाईट, स्पिन आणि जास्तीत जास्त काळ बॉल हवेत ठेऊन समोरच्याला मूर्खात काढण्याची  कला... (मराठीत त्याला foxing म्हणतात) तो क्रिकेट च्या मैदानावर उधळतो...
वॉर्न चे बहुतांश बळी आहे असेच बॅट्समन ला मूर्ख बनवून मिळवलेले आहेत ... बॅट्समन ला माहीत असतं बॉल ऑफ स्टंप वर आहे...
बॅकफूटवर खेळून कट करता येईल पण हवेत तरंगणारा बॉल चा मोह सुटता सूटत नाही आणि तो पुढे येऊन भिरकवण्याचा प्रयत्न करतो बॉल मारण्यात यशस्वी झाला तर सिक्स ची शाश्वती नव्हती चुकून ताकद कमी पडून बॉल फक्त उंच गेला तर??? झेलबाद होऊ.. यातून सही सलामत सुटले ते फक्त भारतीय फलंदाज...

एक दुसरा प्रकार आहे माईक गॅटिंग आणि अँड्र्यू स्ट्राऊस वाला... 
लेग स्टंप(किंवा डावखुऱ्या बॅट्समन च्या ऑफ स्टंप) बाहेर पाचव्या सहाव्या स्टंप वर बॉलिंग करायची बॅट्समन ला अस वाटू द्यायचं की वळून वळून किती वळेल बॉल आपण सहज पॅडिंग करून ब्लॉक करू, असा आत्मविश्वास निर्माण होईल इतका बॉल बाहेर टाकायच ... आणि एकदा का बॉल जमिनीवर पडला की फिरकी घेत दांडी उडल्यावर बॅट्समन चा आपण मूर्ख ठरलो अश्या अविर्भावत ला चेहरा जगाला दाखवायचा....
आठवा गॅटिंग चा चेहरा... स्ट्राऊस चा दोनदा बकरा केला वॉर्न ने एकदा इंग्लंड मध्ये एकदा ऑस्ट्रेलियात!!!

ऑस्ट्रेलिया च्या मातीतच अडम झाम्पा ती चुणूक दाखवतो पण त्यालाही अजून संघात आपली जागा स्थिर करता आलेली नाही!!!😢😢😢

हे या काळात कोणी करताना दिसत नाही सगळयांना मेंडीस, सुनील नारायण, सॅम्युअल बद्री यांची भुरळ पडते... क्लासिकल लेग स्पिन दिसणं दुर्मिळ झालंय...😢😢😢

- हर्षद मोहन चाफळकर , पुणे
११०४२०२११३५०

सुटलेल्या पोटाची कहाणी

#मूळकवी: संदीप खरे

सुटलेल्या पोटाची कहाणी

बुडवून भरलेली एक पुरी पाणी,

भरलेले तोंड, डोळ्यातून येणारे पाणी (२)

रोजचेच आहे सारे काही आज नाही

खाली कसा वाकू मित्रा मला तोल नाही

झोपतच राहतो रोज मी  उशीत

निजतंच तरी पण खातो मी खुशीत

सांगायाची आहे माझ्या मित्रा तुला

सूटलेल्या पोटाची हि कहाणी तुला

खा खा खा खा खाऽऽऽऽऽऽऽऽ खा खा खा खा खाऽऽऽऽ (२)

आट-पाट नगरात पहाटे गर्दी होती भारी

घामाघूम राजा करी जिमची वारी (२)

रोज सकाळीस राजा निघताना बोले

डायट करायचे काल राहुनिया गेले

जमलेच नाही काल टाळणे मला जरी

आज परी खाणार मी वेळेतच घरी

स्वप्नातल्या ट्रॅक वरती मारू मग फेरी

खऱ्याखुऱ्या ट्रॅकपरी ट्रेडमिल च बरी

हलविन मी वाढलेल्या पोटाचा झोला

सूटलेल्या पोटाची हि कहाणी तुला

खा खा खा खा खाऽऽऽऽऽऽऽऽ खा खा खा खा खाऽऽऽऽ (२)

ऑफिसात कामे करतो मी बसून 

लंच ब्रेक मध्ये डबा जातो फस्त होऊन

मित्राच्या आग्रहाखातर घेतो चहाही पिऊन

बघता बघता काटा सरके नव्वदीकडे ऐंशीकडून

जरा तरी काळजी वाटू दे माझी रे तुला

सुटलेल्या पोटाची ही कहाणी तुला....

 दमल्या पायाने जेव्हा येईन मी घरी (२)

घराचा चहा होतो बरोबर टोस्ट आणि खारी(२)

गप्पा गोष्टी करायला अंगी त्राण नाही (२)

झोपेची पेंग येते पुन्हा डोळ्यावर,

आडवा होतो संध्याकाळी मी बेडवर

उठून रात्री जेवायला बसतो थेट डायनिंग टेबलवरी

काय सांगू मित्रा माझ्या वजनाची व्यथा मी तुला

सुटलेल्या पोटाची ही कहाणी तुला!!

खा खा खा खा ssss खा खा खा खा ssss

- हर्षद मोहन चाफळकर, पुणे
१६०४२०२१०९१०

Wednesday, March 31, 2021

कोणीतरी अशी पटापट गंमत आम्हा सांगेल काय?

आघाडीतल्या नेत्यांची भरली होती सभा,
काका होते सभापती मधोमध उभा.

काका म्हणाले, काका म्हणाले
मित्रानो, जनतेची लूट जनतेची लूट
तुम्हा आम्हा सर्वाना शंभर शंभर कोट
या शंभर कोटींच कराल काय?

ताई म्हणाली, ताई म्हणाली
अशा अशा कोटीने मी पिकविन वांगी

दादा म्हणाला
धरण भरीन, धरण भरीन मीही माझ्या कोटींचे
असेच करीन तसेच करीन...

संपादक म्हणाले
काकांकडे येईन तेव्हा शेपूट हलवीत राहीन

पेंग्विन म्हणालं
नाही रे बाबा, संपादकांसारखे माझे मुळ्ळीच नाही..
नाईट लाईफ मध्ये कोटीच उडवीन

माकड म्हणाले
कधी दिल्ली कधी मुंबई, कोटीवर मी मारेन उडी

नाना म्हणाले
कोटी म्हणजे दोन हात, दोन हात
हात धुवून घेईन प्रवाहात

आर्मस्ट्राँग म्हणाले, माझे काय?
कोटी म्हणजे मला पचलंच नाय....

वाघ म्हणाला 
कोटी कोटी मी साठवून ठेवीन साठवून ठेवीन
महापालिका निवडणुकीत वाटून टाकीन.....

- ✍️ हर्षद मोहन चाफळकर , पुणे
२७०३२०२१२१०२

सत्तेची आस फुले अजुनी ...


#मूळकवी: वा. रा. कांत

#मूळकविता: बगळ्यांची माळ फुले....

सत्तेची आस फुले अजुनि अंतर्मनात
शपथ आपुली स्मरशी काय तू मनात ?

धाडिति पाने पाठिंब्याची बिन सह्यांचे ,
ओल्या पावसात भिजे काका बारामतीचे,
मनकवडा घन घुमतो दूर साताऱ्यात.

त्या रात्री, त्या गोष्टी, राजभवनाच्या खाली,
पौर्णिमाच तव नयनी भर पहाटे झाली !
अजुनी स्मरते अघटित ते विकल अंतरात ?

105 सह सत्तेची माळ गुंफताना,
आमदारांचे शुभ्र झब्बे मिळुनि मोजताना,
कमलापरि मिटति ते स्वप्न 80 तासात.

तू गेलास सोडुनि ती माळ, सर्व मागे,
फडफडणे नानांचे 105 उरे मागे,
सलते ती तडफड का कधि तुझ्या उरात ?

- ✍️ हर्षद मोहन चाफळकर , पुणे
२८०३२०२१०००२

आघाडीतल्या नेत्यांची भरली होती सभा

आघाडीतल्या नेत्यांची भरली होती सभा,
काका होते सभापती मधोमध उभा.

काका म्हणाले, काका म्हणाले
मित्रानो, जनतेची लूट जनतेची लूट
तुम्हा आम्हा सर्वाना शंभर शंभर कोट
या शंभर कोटींच कराल काय?

ताई म्हणाली, ताई म्हणाली
अशा अशा कोटीने मी पिकविन वांगी

दादा म्हणाला
धरण भरीन, धरण भरीन मीही माझ्या कोटींचे
असेच करीन तसेच करीन...

संपादक म्हणाले
काकांकडे येईन तेव्हा शेपूट हलवीत राहीन

पेंग्विन म्हणालं
नाही रे बाबा, संपादकांसारखे माझे मुळ्ळीच नाही..
नाईट लाईफ मध्ये कोटीच उडवीन

माकड म्हणाले
कधी दिल्ली कधी मुंबई, कोटीवर मी मारेन उडी

नाना म्हणाले
कोटी म्हणजे दोन हात, दोन हात
हात धुवून घेईन प्रवाहात

आर्मस्ट्राँग म्हणाले, माझे काय?
कोटी म्हणजे मला पचलंच नाय....

वाघ म्हणाला 
कोटी कोटी मी साठवून ठेवीन साठवून ठेवीन
महापालिका निवडणुकीत वाटून टाकीन.....

- ✍️ हर्षद मोहन चाफळकर , पुणे
२७०३२०२१२१०२

Wednesday, March 10, 2021

बंगाल निवडणूक 2021

समूहाचे प्रशासक प्रसाद कुलकर्णी  यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मी हा प्रयत्न करत आहे!!!

ममता बॅनर्जी
5 जानेवारी 1955
सकाळी 7 वाजता
कोलकाता, प.बंगाल!!!

इंटरनेट वर ममता दिदींची मेष लग्न वृषभ राशीची कुंडली देखील आहे 

मी मात्र मकर लग्नाची कुंडली घेतली आहे त्याला कारण खालील प्रमाणे:

१. लग्नेश शनी दशमात उचीचा राजयोग कारक होतोय, मेष लग्नात तो दशमेश होऊन  सप्तमात येईल.. 

२. सप्तमात हर्षल आणि उचीचा वक्री गुरू वैवाहिक सौख्य नाही सप्तमेश चंद्र पंचमात उचीचा असून देखील वैवाहिक जीवनाबद्दल सार्वजनिक जीवनात कोणतीही माहिती उपलब्ध नाही दशमात ल्या शनीची सप्तमावर दृष्टी आणि स्वतः उचीचा गुरू विवाह न होण्यास पुरेसे आहेत!!!

ममता बॅनर्जी साधारण  काँग्रेस च्या माध्यमातून  1970 पासून राजकारणात सक्रिय आहेत..
सुरुवातीचा काही काळ सोडून दिला तर राहू दशा, गुरू ची दशा आणि चालू असलेली शनी ची दशा सलग 3,6, किंवा 10 वे स्थान ऑपरेट करत आहेत. जे राजकरणला पूरक आहे

राहू गुरूच्या राशीत (3,12 )केतूच्या नक्षत्रात केतू षष्ठात (6)

गुरू तृतीयेश,व्ययेश सप्तमात (3, 7, 12) गुरू गुरूंच्याच नक्षत्रात (3, 7, 12) 

राजयोगकारक शनी  दशमात  (10/1,2) गुरू च्या नक्षत्रात (7/3,12)

गुरूच्या दशेत त्या केंद्रात मंत्री राहिल्या जशी शनी ची महादशा 2009 साली सुरू झाली तश्या त्या डाव्याची सत्ता उलथवून बंगाल च्या मुख्यमंत्री झाल्या!!!

आता मुख्य प्रश्न ममता बॅनर्जी पुन्हा सत्तेत येतील का ? किती जगा मिळतील??

सध्या दशास्वामी शनी हा दशमात आहे..
अंतर्दशा चंद्राची चालू आहे चंद्र हा सप्तमेश (प्रतिस्पर्धी ) होऊन पंचमात(प्रतिस्पर्धी चे लाभ) आहे!!!

लग्न कुंडलीत चंद्र शनी षडअष्टकात आहेत!!!

चंद्र चंद्राच्यात नक्षत्रात असल्या कारणाने विरोधकांना अधिक पोषक ठरत आहे!!!

#गोचर:

निवडणूकीत कालावधीत 29 मार्च ते 30 एप्रिल 2021 या कालावधीत शनी लग्नी दशमावर दृष्टी
मंगळ पंचमातून षष्ठात जाईल!!
राहू पंचमात आहे!!
गुरू द्वितीयात जाईल
रवी गोचर शनी च्या दृष्टीतून सुटून चतुर्थात निकाल लागताना असेल!!!

निवडणुकीचे काही टप्पे कालसर्प योगात(7 फेब्रुवारी2021 ते 14 एप्रिल 2021) होणार असून काही टप्पे कालसर्प नंतर असतील !!

एकूण ममता बॅनर्जी याना सुरू असलेल्या दशा (विशेषतः अंतर्दशा खडतर असली ) आणि गोचर याचा विचार करता ममता बॅनर्जी काठावर येऊन  निवडणूक गमावू शकतात कदाचित सत्तेतून पायउतार व्हावे लागेल मात्र एक भक्कम विरोधी पक्ष म्हणून ममता बॅनर्जी बंगाल मध्ये राहू शकतील!!!

#अंदाज: निसटता पराभव!!!

Wednesday, January 20, 2021

सिडनी ते ब्रिस्बेन एक वर्तुळ


#कोलकाता2001 घडत असताना माझ्याकडे केबल टीव्ही नव्हता!! त्यामुळे त्याकाळात दूरदर्शन वर सकाळचा 1 तास आणि संध्याकाळी शेवटच्या सत्रातला एक तास असे दोनच तास कसोटी क्रिकेट बघायला मिळायचं!!! त्यामुळे कसोटी क्रिकेट म्हणजे नेमकं काय हे कळायचं नाही..
माझा कसोटी क्रिकेट खऱ्या अर्थाने बघण्याचा आणि त्याचा आनंद लुटण्याचा प्रसंग आला तो 2003 / 04 साली सौरव गांगुली चा भारतीय संघ बोर्डर गावसकर करंडक मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात गेला होता. ब्रिस्बेन ची पहिली कसोटी पावसात वाहून गेली त्यातही गांगुली ने शतक ठोकले पुढची अडिलेडची कसोटी ऑस्ट्रेलियाच्या लक्ष्मण - द्रविड जोडीने अगदी कोलकाता2001 ची कॉपी असल्यासारखी जिंकून दिली!!! त्या क्षणापासून मी कसोटी क्रिकेटच्या प्रेमात पडलो.... 
पुढची मेलबर्न ची बॉक्सिंग डे कसोटी सेहवाग ने 195 रन करून अगदी जिंकण्याच्या जवळ आणली होती फक्त, एक सत्र आपण खराब खेळलो आणि हाता तोंडाशी आलेला संस्मरणीय मालिका विजय जो लांबला त्यात कित्येकांची कारकीर्द संपली पण ऑस्ट्रेलिया काही हाती लागलं नाही!!!😢😢😢

त्या बोर्डर गावसकर 2003/04 नंतर लगेच काही महिन्यात आपण पाकिस्तानात 15 वर्षांनी कसोटी मालिका खेळण्यासाठी गेलो होतो ती मी प्रत्येक चेंडू टीव्ही वर लाईव्ह पाहिलेली पहिली कसोटी मालिका #मुलतान2004 मध्ये सेहवाग चं त्रिशतक, सचिन चे 196*, आणि चौथ्या दिवशी शेवटच्या बॉल वर तेंडुलकर ने मोईन खान चा दोन पायाच्या मधून उडवलेला त्रिफळा सगळं फ्रेम टू फ्रेम डोळयांसमोर उभं राहतंय!!!!

भारताने भारतात कसोटी मालिका जिंकणे मोठी गोष्ट नाही... पण जेव्हा बाहेर जाऊन एखादी कसोटी जिंकली तरी आनंद गगनात मावत नाही कारण 1932 पासून गेल्या जवळपास नव्वद वर्षात गेली दोन दशके सोडली तर आपण परदेशात फारसे जिंकलेलो नाही. आज सौरव गांगुली bcci चा अध्यक्ष असताना त्याने विजेत्या संघाला 5 कोटींचा बोनस जाहीर केलाय कारण या संघाने त्याचं अपूर्ण स्वप्न पूर्ण केलंय!!

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान अश्या त्या काळात ल्या हाय प्रोफाइल मालिका टीव्ही वर लाईव्ह पाहून कसोटी क्रिकेट च जे गारुड मनावर झालं ते आजतागायत उतरलेलं नाही उतरणार नाही...

या प्रवासात अतिशय वेगळी ठरली ती #Ashes2005 इंग्लंड मधील क्रिकेट टीव्हीवर बघण्याचा आनंद खूप वेगळा आहे क्षणात बदलणार हवामान हवेत स्विंग होणार चेंडू खेळपट्टीवर बारीक कापलेलं हिरवं गवत बॅट आणि बॉल मधला खरी कसोटी!!! जर तुम्ही क्रिकेटप्रेमी असाल आणि जर तुम्ही #एजबस्टन2005 बघितली नसेल तर मग तुम्हावर कसोटी क्रिकेट ची झिंग चढणार नाही. अजून सुद्धा युट्युब ला edgbaston 2005 शोधा सापडेल मी ती लाईव्ह टीव्हीवर बघितली 5 दिवस रक्ताचं पाणी करून दोन संघ लढतात आणि दोन्ही संघातील  अंतर राहत फक्त 2 धावा!!!! पाच दिवस खेळून जिंकणं हरणं जर दोन धावात ठरत असेल तर किती थ्रिल आहे यात याचा विचार करा!!!!

गेल्या दोन दशकात भारतीय संघ बाहेर जाऊन जिंकायला लागलाय सुरुवात सौरव गांगुली ने केली त्याला निर्णायक कळस कदाचित कोहली चढवेल!!!

मधल्या काळात अनेक संस्मरणीय विजय मिळवले #जमेका2006, #जोहान्सबर्ग2006, #नोटिंगम2007, #पर्थ2008, #नेपियर2009 #डरबन2010, #लॉर्ड्स2014 #ट्रेंटब्रिज2018 #अडिलेड2018 #मेलबर्न2018 #जोहान्सबर्ग2018 अजून खूप आहेत एवढे प्रकर्षाने लक्षात राहिले!!!
ऑस्ट्रेलिया सलग दोनदा काबीज केलं बोर्डर गावसकर ऑस्ट्रेलियात जाऊन दोनदा जिंकली धन्य झालो. पण क्षुधा शांती होईल ते क्रिकेटप्रेमी कसले???

या वर्षात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप ची फायनल लॉर्ड्स वर आपणच खेळणार हे आजच्या विजयाने जवळपास निश्चित झालंय... फक्त समोर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड की न्यूझीलंड एवढंच ठरवायचंय

याशिवाय......

🏆इथे भारतात इंग्लंड विरुद्ध चार कसोटींची अँथनी डिमेलो ट्रॉफी
🏆मग इंग्लंड मध्ये इंग्लंड विरुद्ध पतौडी ट्रॉफी
🏆 टी20 विश्वचषक भारतात आपल्याच मैदानात
🏆वर्षा अखेरीला दक्षिण आफ्रिकेत गांधी - मंडेला ट्रॉफी

सगळे कठीण पेपर एकाच वर्षात आहेत... आणि तुम्ही करू शकता म्हणून अपेक्षा पण तुमच्याकडूनच आहेत!!!!

शुभेच्छा!!!!💐💐💐💐

-✍️ हर्षद मोहन चाफळकर, पुणे

Thursday, January 7, 2021

ग्रामपंचायत विडंबन

#ग्रामपंचायत२०२१विशेष

#मूळकवी: अजय-अतुल

गावात होतेय चुळबुळ… ग्रामपंचायत लागली
आन अंगात भरलंय वारं… ही खुर्चीची बाधा झाली

आता अधीर झालोया… बघा बधिर झालोया
आन बिनविरोधसाठी ठोकून शड्डू…नेत्यांच्या मागं फिरायलुया
उडतोय बुंगाट, पळतोय चिंगाट… रंगात आलोया

झालं झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाट
झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाट

आता उतावीळ झालो… बघा मी लेटरहेड छापीलं
माझ्याच नावाचं मी इनिशल पाटीवर कोरलं
हात दाखवून आलोया… लई सावरून आलोया
आन करून दाढी… भारी कपडा घालून फिरतोया
आवो समद्या गावात… म्या लई जोशात रंगात आलोया

झालं झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाट
झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाट

समद्या गावाला झालिया… माझ्या सरपंचपदाची घाई
कधी व्हनार तू रानी… गावाची पाटलीन बाई
आता सनाट फिरतोया… तुमच्या दारात आलुया
लई फिरून बुलेटवरून… चक्कर मारून आलोया
आहो ढिंच्याक जोरात… टेक्नो वरात गावात आलोया

झालं झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाट
झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाट

- ✍️ हर्षद मोहन चाफळकर , पुणे
०७०१२०२१०८११

espncricinfo प्रश्न

मी विचारलेला प्रश्न espncricinfo वर प्रकाशित झाला