#मूळकवी: वा. रा. कांत
#मूळकविता: बगळ्यांची माळ फुले....
सत्तेची आस फुले अजुनि अंतर्मनात
शपथ आपुली स्मरशी काय तू मनात ?
धाडिति पाने पाठिंब्याची बिन सह्यांचे ,
ओल्या पावसात भिजे काका बारामतीचे,
मनकवडा घन घुमतो दूर साताऱ्यात.
त्या रात्री, त्या गोष्टी, राजभवनाच्या खाली,
पौर्णिमाच तव नयनी भर पहाटे झाली !
अजुनी स्मरते अघटित ते विकल अंतरात ?
105 सह सत्तेची माळ गुंफताना,
आमदारांचे शुभ्र झब्बे मिळुनि मोजताना,
कमलापरि मिटति ते स्वप्न 80 तासात.
तू गेलास सोडुनि ती माळ, सर्व मागे,
फडफडणे नानांचे 105 उरे मागे,
सलते ती तडफड का कधि तुझ्या उरात ?
- ✍️ हर्षद मोहन चाफळकर , पुणे
२८०३२०२१०००२
No comments:
Post a Comment