समूहाचे प्रशासक प्रसाद कुलकर्णी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मी हा प्रयत्न करत आहे!!!
ममता बॅनर्जी
5 जानेवारी 1955
सकाळी 7 वाजता
कोलकाता, प.बंगाल!!!
इंटरनेट वर ममता दिदींची मेष लग्न वृषभ राशीची कुंडली देखील आहे
मी मात्र मकर लग्नाची कुंडली घेतली आहे त्याला कारण खालील प्रमाणे:
१. लग्नेश शनी दशमात उचीचा राजयोग कारक होतोय, मेष लग्नात तो दशमेश होऊन सप्तमात येईल..
२. सप्तमात हर्षल आणि उचीचा वक्री गुरू वैवाहिक सौख्य नाही सप्तमेश चंद्र पंचमात उचीचा असून देखील वैवाहिक जीवनाबद्दल सार्वजनिक जीवनात कोणतीही माहिती उपलब्ध नाही दशमात ल्या शनीची सप्तमावर दृष्टी आणि स्वतः उचीचा गुरू विवाह न होण्यास पुरेसे आहेत!!!
ममता बॅनर्जी साधारण काँग्रेस च्या माध्यमातून 1970 पासून राजकारणात सक्रिय आहेत..
सुरुवातीचा काही काळ सोडून दिला तर राहू दशा, गुरू ची दशा आणि चालू असलेली शनी ची दशा सलग 3,6, किंवा 10 वे स्थान ऑपरेट करत आहेत. जे राजकरणला पूरक आहे
राहू गुरूच्या राशीत (3,12 )केतूच्या नक्षत्रात केतू षष्ठात (6)
गुरू तृतीयेश,व्ययेश सप्तमात (3, 7, 12) गुरू गुरूंच्याच नक्षत्रात (3, 7, 12)
राजयोगकारक शनी दशमात (10/1,2) गुरू च्या नक्षत्रात (7/3,12)
गुरूच्या दशेत त्या केंद्रात मंत्री राहिल्या जशी शनी ची महादशा 2009 साली सुरू झाली तश्या त्या डाव्याची सत्ता उलथवून बंगाल च्या मुख्यमंत्री झाल्या!!!
आता मुख्य प्रश्न ममता बॅनर्जी पुन्हा सत्तेत येतील का ? किती जगा मिळतील??
सध्या दशास्वामी शनी हा दशमात आहे..
अंतर्दशा चंद्राची चालू आहे चंद्र हा सप्तमेश (प्रतिस्पर्धी ) होऊन पंचमात(प्रतिस्पर्धी चे लाभ) आहे!!!
लग्न कुंडलीत चंद्र शनी षडअष्टकात आहेत!!!
चंद्र चंद्राच्यात नक्षत्रात असल्या कारणाने विरोधकांना अधिक पोषक ठरत आहे!!!
#गोचर:
निवडणूकीत कालावधीत 29 मार्च ते 30 एप्रिल 2021 या कालावधीत शनी लग्नी दशमावर दृष्टी
मंगळ पंचमातून षष्ठात जाईल!!
राहू पंचमात आहे!!
गुरू द्वितीयात जाईल
रवी गोचर शनी च्या दृष्टीतून सुटून चतुर्थात निकाल लागताना असेल!!!
निवडणुकीचे काही टप्पे कालसर्प योगात(7 फेब्रुवारी2021 ते 14 एप्रिल 2021) होणार असून काही टप्पे कालसर्प नंतर असतील !!
एकूण ममता बॅनर्जी याना सुरू असलेल्या दशा (विशेषतः अंतर्दशा खडतर असली ) आणि गोचर याचा विचार करता ममता बॅनर्जी काठावर येऊन निवडणूक गमावू शकतात कदाचित सत्तेतून पायउतार व्हावे लागेल मात्र एक भक्कम विरोधी पक्ष म्हणून ममता बॅनर्जी बंगाल मध्ये राहू शकतील!!!
#अंदाज: निसटता पराभव!!!
No comments:
Post a Comment