सोनिया गांधींचं स्वगत...
(कुसुमाग्रजांची माफी मागून)
कुणी, घर देता का रे? घर?
माझ्या प्रियांकाला कुणी घर देता का?
माझी प्रियांका आमदारकी वाचून,
खासदारकी वाचून,
घटनात्मक पदा वाचून,
दिल्लीच्या सत्तेभोवती भटकत आहे.
जिथुन कुणी काढणार नाही,
अशी जागा शोधत आहे,
कुणी, घर देता का रे? घर?
अरे राहुल बाळा, रणदीप बाळा खरच सांगते बाबांनो
मी आता थकून गेलेय,
दिल्लीच्या वर्तुळात, सत्तेच्या मोहात,
अर्ध-अधिक बुडून गेलेय,
मी खरंच आता थकलेय.
खर सांगते बाबांनो,
गांधींना गांधीपणच नडतय रे,
अरे SSS.. कुणी घर देता का रे SSSS? घर?
- हर्षद मोहन चाफळकर, पुणे
१६०७२०२०
No comments:
Post a Comment