दिवस काँग्रेसचे बुडायचे । पायलटवाचून उडायचे ॥धृ॥
गांधीत गुंतून राहणे । सत्तेची स्वप्ने पाहणे
विरोधात मन ही रमवायचे ॥१॥
मोजावी आमदारांची डोकी । द्यावी नोटांची खोकी।
जेमतेम शंभर भरायचे ॥२॥
थरारे रिंगटोन ने हॉल । उचलेना नेत्यांचा कॉल
बंडाने जखमी करायचे ॥३॥
सोनियांच्या १० जनपथ पाशी । जाऊन भेटा जराशी
ऐकून दुर्लक्ष करायचे॥४॥
- हर्षद मोहन चाफळकर,
पुणे
१५०७२०२०
No comments:
Post a Comment