Sunday, July 19, 2020

अनलॉक होता होता

गझलकार सुरेश भटांची माफी मागून

अनलॉक होता होता, लॉक डाऊन झाले
अरे पुन्हा घरी बसण्याची  वेळ आली...

आम्हा चार तासांची जी मुभा  ही मिळाली
जे घ्यायचे होते ते लायनीतच मिळाले
कसा देह वाहतो ही सामानाची झोळी...

तिजोर्‍यात खडखडाट अन बंद उद्योग सारे
आम्हावरी रडण्याचे हे क्षण का रे आले?
आम्ही ती जनता ज्यांना, रेशनिंग  ना वाली...

उभा देश झाला आता एक बंदीशाला
जिथे स्वप्नांचा इमला क्षणातच जळाला
कसे आम्ही दुर्दैवी अन अंबानी भाग्यशाली......

आठवतात अजुनि कालच्या मृतांचेच चेहरे
अजून रक्त मागत फिरती रक्त पेढ्या सारे
आसवेच दुखाची ही आम्हाला मिळाली...

- हर्षद मोहन चाफळकर, पुणे
१८०७२०२०

Saturday, July 18, 2020

कसं काय दादा बरं हाय का सांगा बरं हाय का

कसं काय दादा बरं हाय का?
अहो बरं हाय का ?
नाराज हाय ऐकलं,
ते खरं हाय का ?

अहो दादा तुम्ही,
ते नाही तुम्ही,
अहो कोल्हापूरवाले तुम्ही
न्हाय, न्हाय, न्हाय,
न्हाय, बारामतीवाले तुम्ही
सांगा काय ऐकलं
ते खरं हाय का ?

थंडीत म्हनं तुम्ही शपथेला गेला,
समर्थनाचा कागद इसरून आला
खरं काय हो दादा ?
इसरल्या पायी, गावलं काय न्हाई,
आज तरि मन तुमचं रमतय का ?

काल म्हनं तुम्ही पारनेरला गेला,
मित्राचे नगरसेवक हिरावून आला ..
आरंरं  तुमि केली खेळी, राजकारणापारी,
त्यांच्याकडे काय शिल्लक ठेवलंय का ?

काल म्हनं तुम्ही बारामतीला गेला,
मातोश्रीचाsss फोन बी झालाss
आगं बया बया
काय झालं पुढं, सांगा तरि थोडं,
लपवू  नका बघु, आता काय लपताय का ?

- ✒️हर्षद मोहन चाफळकर

सांग सांग उद्धवा सरकार तरेल काय?

सांग सांग उद्धवा,
सरकार तरेल काय?
सोनिया भोवती लोटांगण घालून,
खुर्ची टिकेल काय?

उद्धवा दुपारी काका भेटले काय?
वाटणी करून घेताना, 
खाटेचा आवाज झाला काय?
उद्धवा… उद्धवा…

 उद्धवा, उद्धवा.. 
खरं सांग एकदा
आठवडयातून काका 
भेटतात का रे तीनदा?
उद्धवा… उद्धवा…

सत्तेच्या गणिताचा असेल जेव्हा पेपर...
सरकार पडून सेनेवर फुटेल का रे खापर?
उद्धवा… उद्धवा…

✒️ हर्षद मोहन चाफळकर

सोनिया गांधी यांचे स्वगत

सोनिया गांधींचं स्वगत...
(कुसुमाग्रजांची माफी मागून)

कुणी, घर देता का रे? घर?
माझ्या प्रियांकाला कुणी घर देता का?

माझी प्रियांका आमदारकी वाचून,
खासदारकी वाचून,
घटनात्मक पदा वाचून,
दिल्लीच्या सत्तेभोवती भटकत आहे.
जिथुन कुणी काढणार नाही,
अशी जागा शोधत आहे,
कुणी, घर देता का रे? घर?

अरे   राहुल बाळा, रणदीप बाळा खरच सांगते बाबांनो
मी  आता थकून गेलेय,
दिल्लीच्या वर्तुळात, सत्तेच्या मोहात,
अर्ध-अधिक बुडून गेलेय,
मी खरंच आता थकलेय.

खर सांगते बाबांनो,
गांधींना  गांधीपणच नडतय रे,
अरे SSS.. कुणी घर देता का रे SSSS? घर?

- हर्षद मोहन चाफळकर, पुणे
   १६०७२०२०

दिवस काँग्रेस चे बुडायचे

दिवस काँग्रेसचे बुडायचे । पायलटवाचून उडायचे ॥धृ॥

गांधीत गुंतून राहणे । सत्तेची स्वप्ने पाहणे
विरोधात मन ही रमवायचे ॥१॥

मोजावी आमदारांची डोकी । द्यावी नोटांची खोकी।
जेमतेम शंभर भरायचे ॥२॥

थरारे रिंगटोन ने  हॉल । उचलेना नेत्यांचा कॉल
बंडाने जखमी करायचे ॥३॥

सोनियांच्या १० जनपथ पाशी । जाऊन भेटा जराशी
ऐकून दुर्लक्ष करायचे॥४॥

- हर्षद मोहन चाफळकर,
पुणे
१५०७२०२०

देवेंद्र फडणवीस यांचे स्वगत

देवेंद्र फडणविसांचे स्वगत...
- (कुसुमाग्रजांची माफी मागून)

धरावं की सोडावं ?
हा एकच सवाल आहे.
या सत्तेच्या फडावर 
बेभरवश्या बारामतीचा तुकडा होऊन 
जगावं बेशरम लाचार आनंदानं
की फेकून द्यावं हे सत्तेची लक्तरे
त्यात गुंडाळलेल्या स्वप्नांच्या यातनेसह
राष्ट्रपती राजवटीच्या अनिश्चित भविष्यामध्ये?
आणि करावा सर्वांचा शेवट 
एका प्रहाराने 
माझा, दादांचा  आणि उध्दवरावांचाही.

पावसातल्या सभेने
नियोजनाला असा डंख मारावा 
की नंतर येणाऱ्या निकालाला 
नसावा काहीच आधार!!!!
पण त्या निकालालाही पुन्हा 
स्वप्न पडू लागलं तर 
तर-तर 
इथचं मेख आहे.

नव्या आव्हानांचा अनिश्चित कारभारात
प्रवेश करण्याचा धीर होत नाही 
म्हणून आम्ही सहन करतो 
हे जुने जागेपण 
सहन करतो मित्राच्या धोक्याला निर्जीवपणाने
अभिमानावर होणारे अत्याचार 
अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्त्वाची विटंबना 
आणि अखेर मतपेटीचा कटोरा घेऊन 
उभे राहतो खालच्या मानेने 
आमच्याच मतदाराच्या दाराशी.

मतदारा , तू इतका कठोर का झालास?
एका बाजूला , आम्ही ज्यांना साथ दिली
ते आम्हाला विसरतात 
आणि दुसऱ्या बाजूला , 
ज्यानं आम्हाला सत्तेच्या जवळ नेलं
तो तूही आम्हाला विसरतोस,
मग विस्कटलेल्या पक्षांचे हे सरकार बघून 
हे मतदारा ,
आम्ही लोकांनी
कोण्याच्या पायावर डोकं आदळायच!
कोणाच्या - पायावर- कोणाच्या-

- हर्षद मोहन चाफळकर, पुणे
१६०७२०२०

Thursday, July 9, 2020

मुलीचं लग्न

काल संध्याकाळी एक पत्रिका आली होती...
मुलगी चांगली शिकली आहे, घरातले थोडं लग्नाचा विचार करतायत तर लग्न कधी होईल? हे पहायचं होतं.
प्रश्नकर्ता अगदी रोजच्या ओळखीतल्या होता..
त्यामुळे नाकारता आलं नाही.. 
मी म्हटलं "रात्री झोपायच्या आधी कळवतो!!"
मला एखादी नवी केस स्टडी मिळाली की मला ती सोडवल्याशिवाय शांतता मिळत नाही.. हे जे माझ्या रोजच्या संपर्कात आहेत त्यांच्या ते लक्षात येईल...

एक अर्धा तास थोडा विचार केला आणि जेवायच्या आधी उत्तर पाठवलं

मिळालेली महिती खालील प्रमाणे..

स्त्री
13/7/1996
सकाळी 8.55
दौंड, जि.पुणे

#प्रश्न: विवाह

#नियम: 7 चा उनक्षत्रस्वामी 2,5,7,11 या पैकी एकही भावाचा कार्येश असेल  तर  पत्रिका विवाहाला अनुकूल असते...

सदर कुंडलीत 
7चा उपनक्षत्रस्वामी: रवी

रवी स्वतः 11/1
नक्षत्रस्वामी: 5/5,8
उपनक्षत्रस्वामी: शुक्र 10/10,3

सप्तमाचा उनक्षत्रस्वामी त्याच्या उपनक्षत्रस्वामी पातळीवर वर विरोधी भाव लावतय.😢😢

अब क्या करे???

म्हटलं महादशा जर पूरक असतील तर 7च्या उपनक्षत्रस्वामी चा विचार बाजूला राहू शकतो.
चालू महादशा/ अंतर्दशा/ विदशा ने होकार दिला तर काम झालं...

प्रश्न वेळी जातकाला 
गुरू महादशा
शनी अंतर्दशा
शनी विदशा
सुरू होती...

गुरु: 5/5,8
नक्षत्रस्वामी: शुक्र 10/3,10
उपनक्षत्रस्वामी मंगळ: 10/4,9

आता अली का पंचाईत🤦‍♂️🤦‍♂️ महादशा स्वामी त्याच्या नक्षत्र आणि उपनक्षत्राने होकार देत नाही.😢😢

मला आता हळू हळू चिंता वाटायला लागली..

उत्तर काही सापडेना😢😢

शेवटी म्हटलं कोणी कितीही विरोध करू दे अंतर्दशा/ विदशा वर आपण विश्वास ठेवला पाहिजे..

अंतर्दशा/ विदशा शनीची

शनी स्वतः 8/6,7
नक्षत्रस्वामी:शनी 8/6,7
उनक्षत्रस्वामी: राहू 2/2,11(बुधाच्या राशीत)✅
शनीच्या दृष्टीत म्हणून 8/6,7✅
राहुचा नक्षत्रस्वामी शुक्र 10/3,10
आणि राहुचा उनक्षत्रस्वामी बुध 11/2,11✅

म्हणजे 7 च्या उनक्षत्रस्वामी ने विरोध केला
महादशा स्वामी ने विरोध केला
तरी अंतर्दशा/ विदशा पूरक आहे✅

शनी अंतर्दशा 11/7/2020 ते 24/1/2023
शनी विदशा: 11/7/2020 ते 5/12/2020

गोचर साठी सध्या महादशा व अंतर्दशा स्वामी दोन्ही वक्री आहेत. ते मार्गी होई पर्यंत काही होईल असं वाटत नाही

29 सप्टेंबर 2020 ला शनी मार्गी होईल...

7 चा कार्येश ग्रह: शनी(एकटाच)

11 चा कार्येश ग्रह : रवी, बुध, केतु

20 नोव्हेंबर 2020 ला महादशा स्वामी गुरू शनी राशीत रवीच्या उत्तराषाढा नक्षत्रात जाईल. शनी आधी पासूनच तिथंच आहे... तेव्हा घटना घडण्याची शक्यता आहे...

बघू या काय होतंय ते...

धन्यवाद!!!💐💐💐

✒️ हर्षद मोहन चाफळकर, पुणे-१४

espncricinfo प्रश्न

मी विचारलेला प्रश्न espncricinfo वर प्रकाशित झाला