Thursday, January 16, 2020

जन्मवेळ नक्की कोणती?- ज्योतिष विशारद हर्षद मोहन चाफळकर

जन्मवेळ नक्की कोणती???

माझ्या जन्मवेळ शुद्धीकरणाची फेसबुक पोस्ट पाहून एका महिलेने माझ्याशी संपर्क साधला .
जन्मतारीख, जन्मठिकाण नक्की माहीत आहे मात्र जन्मवेळ रात्री 1 ची की रात्री 2.30 हा गोंधळ आहे तर तुम्ही ती वेळ शोधून द्याल का?

मी म्हटलं प्रयत्न करतो.
मिळालेली माहिती अशी

स्त्री
19/9/1955
जन्मवेळ रात्री 1 ते 2.30 च्या दरम्यान 
अमरावती
इतर माहिती अशी 
👉लग्न 30 मे 1974 ला 
👉 पती(वृश्चिक/ अनुराधा)
👉प्रथम संतती 30 जानेवारी 1977
👉दुसरी संतती5 मार्च 1982
मला वेळ शोधण्यासाठी स्कोप फक्त दीड तासाचा होता. दीड तासातली नक्की वेळ कोणती?

RP घेतली ती वेळ

16/1/2020
18.51.18
पुणे

L कर्क-चंद्र
LS- शनी
S- हस्त-चंद्र
R- कन्या -बुध
D- गुरू

RP त गुरू आला मनाला जरा धीर आला की ये काम हो सकता है.

जरा प्राथमिक तयारी म्हणून मी वार तपासला तो इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे सोमवार होता आणि घेतलेल्या RP मध्ये चंद्र आहे. म्हणजे वार बरोबर आहे आपोआप तारीख ही बरोबर आहे.

आता दुसऱ्या टप्प्यावर दिलेल्या मर्यादांवर कोणती लग्ने आहेत ती बघितली

रात्री 1 वाजताचे लग्न - मिथुन/पुनर्वसू/शनी/शनी असे होते
आणि 
रात्री 2.30 वाजताचे लग्न- कर्क/पुष्य/चंद्र/बुध असे होते


आता अली का पंचाईत?

RP मधले सगळे ग्रह दोन्ही लग्नाच्या कॉम्बिनेशन मध्ये होते.
आता काय करायचं?

तीन पर्याय होते
कर्क/आश्लेषा/शनी/गुरू (रात्री 03वाजून50मिनिटे) दिलेल्या वेळेच्या मर्यादेपेक्षा खूप लांब होती म्हणून ❌
किंवा
कर्क/पुष्य/बुध/गुरु(रात्री 2 वाजून 7 मिनिटे 30 सेकंद) ही वेळ दिलेल्या मर्यादेत होती पण माझे मन शनी ला नक्षत्रस्वामी म्हणून न बसवता त्याला उपनक्षत्रस्वामी ठिकाणी बसव असे सांगू लागले. अखेर मी कर्क लग्नाचा पर्याय सोडून दिला आणि पुन्हा मिथुन लग्नावर आलो

आता मी बसवलेलं कॉम्बिनेशन असे
मिथुन/पूनर्वसू/शनी/चंद्र
ही वेळ आली रात्री 1 वाजून 4 मिनिटे 55 सेकंद

आता चंद्र सब थिअरी वापरू
1.लग्नाचा सब शनी तूळेत चंद्रबरोबर आहे✅
2. सप्तमाचा सब शनी पतीच्या चंद्राचा नक्षत्रस्वामी आहे✅
3. लग्न झाले त्यावेळी 
राहू महादशा(5,8,9)
चंद्र अंतर्दशा(3,5,12)
केतु प्रत्यंतर दशा(5,8,9) 5वे, 8वे स्थान विवाहाला पूरक आहे.✅
4. पहिली संतती झाली तेव्हा 
गुरू महादशा (2/7,10)
गुरु अंतर्दशा (2/7,10)
शुक्र प्रत्यंतर दशा(3,5,12)
2,5 ही स्थाने संततीस पूरक आहेत.✅
5. दुसऱ्या संतती वेळी 
गुरू महादशा(2/7,10)
बुध अंतर्दशा(5/8,9)
गुरू प्रत्यंतर दशा(2/7,10)
2,7 ही स्थाने दुसऱ्या संततीस पूरक आहेत.✅

अश्या रीतीने  जन्मवेळ कोणती हे शोधता आले.
✒ हर्षद मोहन चाफळकर
ज्योतिष विशारद, पुणे

No comments:

Post a Comment

espncricinfo प्रश्न

मी विचारलेला प्रश्न espncricinfo वर प्रकाशित झाला