जन्मवेळ शोधणे एकाची नाही, दोघांची...🤔🤔
माझ्या परिचयातील एका व्यक्तीने माझ्याशी संपर्क साधला...
"आम्हा पती-पत्नीची जन्मतारीख आणि जन्मठिकाण माहीत आहे मात्र वेळ नक्की माहीत नाही त्यामुळे बाकी कोणतीच गोष्ट बघता येत नाही. दोघांचीही वेळ शोधता येईल का?"
मला एकाची वेळ शोधण्याचा अनुभव होता मात्र दोघांचीही काढायची म्हटल्यावर मला थोडा घाम फुटला म्हटलं वेळ लागेल, दैवी इच्छा असेल तर नक्की शनिवार(11जानेवारी2020 पर्यंत) कळविन म्हणून सोडून दिले. पण मला काही केल्या शनिवार पर्यंत वेळ मिळाला नाही शाळेच्या परीक्षा, दहावी प्रिलीम सगळं सूरु असताना हा विषय मागे ठेवला.
सांगितलेल्या वेळेत मला काम न करता आल्याचं बोचत होतं... काल संध्याकाळी शाळेने अचानक मकर संक्रांतीची सुट्टी जाहीर केली. मला थोडा मोकळा वेळ मिळाला होता.
मिळालेली माहिती अशी
पुरुष
9 मार्च 1977(बुधवार)
सकाळी???(रवि RP त आहे😇)
अमरावती
स्त्री
5 डिसेंम्बर 1979(बुधवार, बुध RP त आहे😇)
पहाटे 5 च्या आसपास(बरं वाटलं, किमान एक तरी कुंडली नीट सुटेल)
नागपूर
मी RP घेतले ती वेळ
15 जानेवारी 2020
10.00.21
पुणे
आलेले RP
#L: कुंभ(शनी) लग्नात शुक्र
#LS: शततारका(राहू) राहुवर शनी,गुरू, मंगळ ची दृष्टी
#S: उत्तरा फाल्गुनी(रवि)
#R: सिंह(रवि)
#D: बुध
म्हटलं ज्याची अंदाजे वेळ माहिती आहे त्याला मार्गी लावू.
स्त्रीने दिलेली सकाळी 5 ची नागपूर स्थित कुंडली मांडली. तूळ लग्न सुरू होतं RP त शुक्र लग्नी आहे...👍👍👍
मग तूळ लग्नच निश्चित केले त्यात मंगळ, राहू, गुरू ची नक्षत्रे येतात मंगळाचे नक्षत्र घेतले तर सांगितलेल्या 5 वाजता पेक्षा फार लांब होते. राहूचे पण नक्षत्र फार मागे जाईल म्हणून गुरू चे नक्षत्र, शनी सब आणि बुध सब सब सेट केला
In short
तूळ/ विशाखा/ शनी/बुध
ती वेळ आली सकाळी 04वाजून 40मिनिटे 21सेकंद
आता चंद्र सब थिअरी
लग्नाचा सब शनी त्याची चंद्रावर 10वी दृष्टी आहे.✅
स्त्रीच्या कुंडलीत सप्तमाचा सब शनीच आहे त्या शनी ची पतीच्या कुंडलीत पतीच्या चंद्राचा राशीस्वामी(तूळ) शुक्रावर दहावी दृष्टी आहे.✅
आता अवघड प्रकरण सोडवू या
पतीची वेळ फक्त सकाळी एवढीच माहिती आहे.
9 मार्च 1977 चा अमरावती चा सूर्योदय सकाळी 6.33 चा होता त्यामुळे सकाळी 6.33 ते दुपारी 12 पर्यंत विचार करणे भाग होते
दुसरा टप्पा त्यादिवशी ची लग्ने तपासली
ती खलील प्रमाणे
कुंभ 05.16 am -6.56 am(शनी)
मीन 6.56am - 8.24 am(गुरू)
मेष 8.24am - 10.06am(मंगळ)
वृषभ 10.06am - 12.05 pm(शुक्र)
RP त चारही ग्रह आहेत आता काय करायचं?
सोपं केलं बलवान शनी चे कुंभ च लग्न घेतलं
त्यात मंगल,राहू,गुरू ची नक्षत्र
राहू LS होऊन आलाय त्यामुळे त्याचेच नक्षत्र घेतले गुरू सब आणि रवी सब सब
आलेला SEQUENCE असा
"कुंभ/शततारका/गुरू/रवि"
वेळ आली सकाळी 05 वाजून 49 मिनिटे 43 सेकंद
आता चंद्र सब थिअरी ने तपासू
लग्नाचा सब गुरू वृषभेत आहे, शुक्र चंद्राचा राशीस्वामी आहे.✅
पुरुषाचा सप्तमाचा सब शनी आहे जो पत्नी च्या कुंडलीत कन्या राशीत आहे. बुध पत्नीचा राशीस्वामी आहे✅
अश्या रीतीने जन्मवेळ सिद्ध करण्याचा प्रयत्न केला...🙏🙏
No comments:
Post a Comment