Tuesday, June 3, 2025

पृथ्वी वरील सर्वात दूरच्या जागा

पृथ्वीवरील दोन अति दूरच्या जागा

पृथ्वी गोल आहे आणि त्यावर सुमारे 71% भाग हा समुद्राने आणि 29% भाग हा जमीनने व्यापला आहे. 

अर्थात समुद्राच्या खाली सुद्धा जमीन आहेच ज्याला आपण समुद्रतळ म्हणतो. 

समुद्राच्या वरचा भूभाग म्हणजे विविध खंड, उपखंड यांच्या सुद्धा अनेक उंच, सखल प्रमाणामुळे मैदाने, पर्वत, डोंगर, दऱ्या बनले. 
समुद्राच्या तळाशी सुद्धा असेच मैदाने, डोंगर, दऱ्या, पर्वत क्षेत्र आहेत.

समुद्रमार्ग आणि जमिनीवरील मार्ग वेगवेगळे असल्याने दोन्हीकडे वेगळ्या प्रकारे वाहतूक होते.

ह्या वाहतुकीच्या मार्गाचे नकाशे बनवताना आणि मोजणी करताना असे काही बिंदू मिळाले जे भौगोलिक दृष्टीने महत्वाचे मानले जातात. 

1] पॉईंट निमो - Point Nemo

पॅसिफिक महासागरात अशी जागा आहे जिथे कोणतेही बेट अस्तित्वात नाही केवळ पाणीच आहे परंतु त्या जागे वर जहाज असल्यास पाण्यामधील सर्वात दूरची जागा असे त्याला मानले जाते. 

याचे कारण तिथून सर्वात जवळचे बेट (जमीन) ही सुमारे 2700 किमी दूर आहे. 

पॉईंट निमो हे समुद्रातील स्थान असे आहे ज्या ठिकाणी जहाज आले तर त्याच्या व्यतिरिक्त दुसरे जवळचे मानव हे केवळ अवकाशातून 400 किमी उंची वरून जाणाऱ्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वरील लोक हेच असतील, बाकी सर्व मानवी वसाहती किमान 2700 किमी दूर असतील असा याचा अर्थ आहे. 

निमो हे नाव Jules Verne's Twenty Thousand Leagues Under the Sea या विज्ञानकथा लेखाच्या पुस्तकातील एका काल्पनिक खलाशाचे नाव आहे. 

2] उरुमकी, चीन - Urumqi, china

जसे पॉईंट निमो म्हणजे समुद्रातील सर्वात दूरची जागा मानली जाते जिथून जमीन सर्वात दूर आहे त्याच्या विरुद्ध म्हणजे जिथून समुद्र सर्वात दूर आहे अशी जागा म्हणजे उत्तर पश्चिम चीन मधील एक शहर उरुमकी. 

उयघूर प्रांत मानला जाणाऱ्या चीनच्या या शहरापासून सर्वात जवळ चा समुद्र किनारा सुमारे 2500 किमी दूर आहे. 

त्यामुळे हा भाग जमिनीचा असा मध्य बिंदू आहे ज्याच्या आजूबाजूला पृथ्वीवरील सर्वात मोठी जमीन व्यापलेली आहे. 

चित्रात दोन्ही बिंदू वेगवेगळे दाखवले आहेत, बघा. 

-------------
@followers माहिती आवडल्यास शेअर बटणाचा वापर करून तुमच्या मित्र परिवाराला पाठवा आणि त्यांना सुद्धा या पेजला लाईक फॉलो करण्यास सांगा.

गुरुचरित्र अध्याय १८वा


काढोनि वेलशाखेसी । टाकीता झाला गंगेत ॥६०॥

तया वेलाचें मूळ थोरी । जे कां होतें आपुले द्वारी । काढूं म्हणुनि द्विजवरी । खणिता झाला तया वेळीं ॥६१॥

काढितां वेलमूळासी । लाधला कुंभे निधानेसी । आनंद जाहला बहुवसी । घेऊनि गेला घरांत ॥६२॥

म्हणती नवल काय वर्तले । यतीश्वर आम्हां प्रसन्न्न झाले । म्हणोनि ह्या वेला छेदिलें । निधान लाधलें आम्हांसी ॥६३॥

नर नव्हे तो योगीश्वर होईल ईश्वरीअवतार । आम्हां भेटला दैन्यहर । म्हणती चला दर्शनासी ॥६४॥
जाऊनि संगमा श्रीगुरुसी । पूजा करिती बहुवसी । वृत्तांत सांगती तयासी । तये वेळी परियेसा ॥६५॥

श्रीगुरु म्हणती तयासी । तुम्ही न सांगणें कवणासी । प्रकट करितां आम्हांसी । नसेल लक्ष्मी तुमचे घरी ॥६६॥

ऐसेपरी तया द्विजासी । सांगे श्रीगुरु परियेसी । अखंड लक्ष्मी तुमचे वंशी । पुत्रपौत्री नांदाल ॥६७॥

ऐसा वर लधोन । गेली वनिता तो ब्राह्मण । श्रीगुरुकृपा ऐसी जाण । दर्शनमात्रे दैन्य हरे ॥६८॥

ज्यासी होय श्रीगुरुकृपा । त्यासी कैचें दैन्य पाप । कल्पवृक्ष-आश्रय करितां बापा । दैन्य कैंचे तया घरी ॥६९॥

दैव उणा असेल जो नरु । त्याणें आश्रयावा श्रीगुरु । तोचि उतरेल पैलपारु । पूज्य होय सकळिकांई ॥७०॥

जो कोण भजेल श्रीगुरु । त्यासी लाधेल इह-परु । अखंड लक्ष्मी त्याचे घरी । अष्टैश्वर्ये नांदती ॥७१॥

सिध्द म्हणे नामधारकासी । श्रीगुरुमहिमा असे ऐसी । भजावे तुम्हीं मनोमानसीं । कामधेनु तुझ्या घरीं ॥७२॥

गंगाधराचा कुमर । सांगे श्रीगुरुचरित्रविस्तार । पुढील कथामृतसार । ऐका श्रोते एकचित्तें ॥७३॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिध्द-नामधारकसंवादे अमरापुरमहिमानं-द्विजदैन्यहरणं नाम अष्टादशोऽध्याय: ॥ १८ ॥

श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

गुरुचरित्र अध्याय 14वा

॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नमः ॥ श्री गुरुभ्यो नमः ॥ नामधारक शिष्य देखा । विनवी सिद्धासी कवतुका । प्रश्न करी अतिविशेखा । एकचित्ते परियेसा ॥१॥ 
जय जयाजी योगीश्वरा । सिद्धमूर्ति ज्ञानसागरा । पुढील चरित्र विस्तारा । ज्ञान होय आम्हांसी ॥२॥ 
उदरव्यथेच्या ब्राह्मणासी । प्रसन्न जाहले कृपेसी । पुढे कथा वर्तली कैसी । विस्तारावे आम्हांप्रति ॥३॥ 
ऐकोनि शिष्याचे वचन । संतोष करी सिद्ध आपण । श्रीगुरुचरित्र कामधेनु जाण । सांगता जाहला विस्तारे ॥४॥
 ऐक शिष्या शिखामणि । भिक्षा केली ज्याचे भुवनी । तयावरी संतोषोनि । प्रसन्न जाहले परियेसा ॥५॥
 गुरुभक्तीचा प्रकारु । पूर्ण जाणे तो द्विजवरू । पूजा केली विचित्रु । म्हणोनि आनंद परियेसा ॥६॥ 
तया सायंदेव द्विजासी । श्रीगुरू बोलती संतोषी । भक्त होय रे वंशोवंशी । माझी प्रीति तुजवरी ॥७॥ 
ऐकोनि श्रीगुरुंचे वचन । सायंदेव विप्र करी नमन । माथा ठेवूनि चरणी । न्यासिता झाला पुनःपुन्हा ॥८॥ 
जय जया जगद्‌गुरु । त्रयमूर्तींचा अवतारू । अविद्यामाया दिससी नरु । वेदां अगोचर तुझी महिमा ॥९॥ 
विश्वव्यापक तूंचि होसी । ब्रह्मा-विष्णु-व्योमकेशी । धरिला वेष तूं मानुषी । भक्तजन तारावया ॥१०॥
 तुझी महिमा वर्णावयासी । शक्ति कैंची आम्हांसी । मागेन एक आता तुम्हांसी । तें कृपा करणे गुरुमूर्ति ॥११॥ 
माझे वंशपारंपरी । भक्ति द्यावी निर्धारी । इह सौख्य पुत्रपौत्री । उपरी द्यावी सद्‌गती ॥१२॥ 
ऐसी विनंति करुनी । पुनरपि विनवी करुणावचनी । सेवा करितो द्वारयवनी । महाशूरक्रुर असे ॥१३॥ 
प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी । घात करितो जीवेसी । याचि कारणे आम्हांसी । बोलावीतसे मज आजि ॥१४॥
 जातां तया जवळी आपण । निश्चये घेईल माझा प्राण । भेटी जाहली तुमचे चरण । मरण कैचे आपणासी ॥१५॥ 
संतोषोनि श्रीगुरूमूर्ति । अभयंकर आपुले हाती । विप्रमस्तकी ठेविती । चिंता न करी म्हणोनिया ॥१६॥ 
भय सांडूनि तुवां जावे । क्रुर यवना भेटावे । संतोषोनि प्रियभावे । पुनरपि पाठवील आम्हांपाशी ॥१७॥ 
जंववरी तू परतोनि येसी । असो आम्ही भरंवसी । तुवां आलिया संतोषी । जाऊ आम्हीं येथोनि ॥१८॥
 निजभक्त आमुचा तू होसी । पारंपर-वंशोवंशी । अखिलाभीष्ट तू पावसी । वाढेल संतति तुझी बहुत ॥१९॥
 तुझे वंशपारंपरी । सुखे नांदती पुत्रपौत्री । अखंड लक्ष्मी तयां घरी । निरोगी होती शतायुषी ॥२०॥
 ऐसा वर लाधोन । निघे सायंदेव ब्राह्मण । जेथे होता तो यवन । गेला त्वरित तयाजवळी ॥२१॥ 
कालांतक यम जैसा । यवन दुष्ट परियेसा । ब्राह्मणाते पाहतां कैसा । ज्वालारूप होता जाहला ॥२२॥ 
विमुख होऊनि गृहांत । गेला यवन कोपत । विप्र जाहला भयचकित । मनीं श्रीगुरूसी ध्यातसे ॥२३॥ 
कोप आलिया ओळंबयासी । केवी स्पर्शे अग्नीसी । श्रीगुरूकृपा होय ज्यासी । काय करील क्रुर दुष्ट ॥२४॥
 गरुडाचिया पिलीयांसी । सर्प तो कवणेपरी ग्रासी । तैसे तया ब्राह्मणासी । असे कृपा श्रीगुरुची ॥२५॥ 
कां एखादे सिंहासी । ऐरावत केवीं ग्रासी । श्रीगुरुकृपा होय ज्यासी । कलिकाळाचे भय नाही ॥२६॥
 ज्याचे हृदयीं श्रीगुरुस्मरण । त्यासी कैंचे भय दारुण । काळमृत्यु न बाधे जाण । अपमृत्यु काय करी ॥२७॥ 
ज्यासि नांही मृत्यूचे भय । त्यासी यवन असे तो काय । श्रीगुरुकृपा ज्यासी होय । यमाचे मुख्य भय नाही ॥२८॥
 ऐसेपरी तो यवन । अन्तःपुरांत जाऊन । सुषुप्ति केली भ्रमित होऊन । शरीरस्मरण त्यासी नाही ॥२९॥
 हृदयज्वाळा होय त्यासी । जागृत होवोनि परियेसी । प्राणांतक व्यथेसी । कष्टतसे तये वेळी ॥३०॥ 
स्मरण असे नसे कांही । म्हणे शस्त्रे मारितो घाई । छेदन करितो अवेव पाही । विप्र एक आपणासी ॥३१॥
स्मरण जाहले तये वेळी । धांवत गेला ब्राह्मणाजवळी । लोळतसे चरणकमळी । म्हणे स्वामी तूंचि माझा ॥३२॥
 येथे पाचारिले कवणी । जावे त्वरित परतोनि । वस्त्रे भूषणे देवोनि । निरोप दे तो तये वेळी ॥३३॥ 
संतोषोनि द्विजवर । आला ग्रामा वेगवक्त्र । गंगातीरी असे वासर । श्रीगुरुंचे चरणदर्शना ॥३४॥ 
देखोनिया श्रीगुरूसी । नमन करी तो भावेसी । स्तोत्र करी बहुवसी । सांगे वृत्तांत आद्यंत ॥३५॥
 संतोषोनि श्रीगुरूमूर्ति । तया द्विजा आश्वासिती । दक्षिण देशा जाऊ म्हणती । स्थान-स्थान तीर्थयात्रे ॥३६॥
 ऐकोनि श्रीगुरुंचे वचन । विनवीतसे कर जोडून । न विसंबे आतां तुमचे चरण । आपण येईन समागमे ॥३७॥ 
तुमचे चरणाविणे देखा । राहो न शके क्षण एका । संसारसागर तारका । तूंचि देखा कृपासिंधु ॥३८॥ 
उद्धरावया सगरांसी । गंगा आणिली भूमीसी । तैसे स्वामी आम्हासी । दर्शन दिधले आपुले ॥३९॥ 
भक्तवत्सल तुझी ख्याति । आम्हा सोडणे काय नीति । सवे येऊ निश्चिती । म्हणोनि चरणी लागला ॥४०॥ 
येणेपरी श्रीगुरूसी । विनवी विप्र भावेसी । संतोषोनि विनयेसी । श्रीगुरू म्हणती तये वेळी ॥४१॥ 
कारण असे आम्हा जाणे । तीर्थे असती दक्षिणे । पुनरपि तुम्हां दर्शन देणे । संवत्सरी पंचदशी ॥४२॥ 
आम्ही तुमचे गांवासमीपत । वास करू हे निश्चित । कलत्र पुत्र इष्ट भ्रात । मिळोनी भेटा तुम्ही आम्हां ॥४३॥ 
न करा चिंता असाल सुखे । सकळ अरिष्टे गेली दुःखे । म्हणोनि हस्त ठेविती मस्तके । भाक देती तये वेळी ॥४४॥ ऐसेपरी संतोषोनि । श्रीगुरू निघाले तेथोनि । जेथे असे आरोग्यभवानी । वैजनाथ महाक्षेत्र ॥४५॥ 
समस्त शिष्यांसमवेत । श्रीगुरू आले तीर्थे पहात । प्रख्यात असे वैजनाथ । तेथे राहिले गुप्तरूपे ॥४६॥
 नामधारक विनवी सिद्धासी । काय कारण गुप्त व्हावयासी । होते शिष्य बहुवसी । त्यांसी कोठे ठेविले ॥४७॥ 
गंगाधराचा नंदनु । सांगे गुरुचरित्र कामधेनु । सिद्धमुनि विस्तारून । सांगे नामकरणीस ॥४८॥ 
पुढील कथेचा विस्तारू । सांगता विचित्र अपारु । मन करूनि एकाग्रु । ऐका श्रोते सकळिक हो ॥४९॥

॥ इति श्रीगुरूचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे क्रुरयवनशासनं-सायंदेववरप्रदानं नाम चतुर्दशोSध्यायः ॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥


नित्य पाठाच्या ४२ ओव्या

॥ ॐ नमोजी शिवा अपरिमिता ॥ आदि अनादि मायातीता ॥ पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता ॥ हेरंबताता जगद्गुरु ॥६१॥
ज्योतिर्मयस्वरूपा पुराणपुरुषा ॥ अनादिसिद्धा आनंदवनविलासा ॥ मायाचक्रचाळका अविनाशा ॥ अनंतवेषा जगत्पते ॥६२॥
जयजय विरूपाक्षा पंचवदना ॥ कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या ॥ मनोजदमना मनमोहना ॥ कर्ममोचका विश्वंभरा ॥६३॥
जेथे सर्वदा शिवस्मरण ॥ तेथे भुक्ति मुक्ति आनंद कल्याण ॥ नाना संकटे विघ्ने दारुण ॥ न बाधिती कालत्रयी ॥६४॥
संकेते अथवा हास्येकरून ॥ भलत्या मिषे घडो शिवस्मरण ॥ न कळता परिस लोहालागुन ॥ झगडता सुवर्ण करीतसे ॥६५॥
न कळत प्राशिता अमृत ॥ अमर काया होय यथार्थ ॥ औषध नेणता भक्षिता ॥ परी रोग हरे तत्काळ ॥६६॥
जय जय मंगलधामा ॥ निजजनतारक आत्मारामा ॥ चराचरफलांकित कल्पद्रुमा ॥ नामा अनामा अतीता ॥६७॥
हिमाचलसुतामनरंजना ॥ स्कंदजनका शफरीध्वजादहना ॥ ब्रह्मानंदा भाललोचना ॥ भवभंजना महेश्वरा ॥६८॥
हे शिवा वामदेवा अघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा ॥ अर्धनारीनटेश्वरा ॥ गिरुजारंगा गिरीशा ॥६९॥
धराधरेंद्रमानससरोवरी ॥ तू शुद्ध मराळ क्रीडसी निर्धारी ॥ तव अपार गुणासी परोपरी ॥ सर्वदा वर्णिती आम्नाय ॥२७०॥
नकळे तुझे आदिमध्यावसान ॥ आपणचि सर्व कर्ता कारण ॥ कोठे प्रगटशी याचे अनुमान ॥ ठायी न पडे ब्रह्मादिका ॥७१॥
जाणोनि भक्तांचे मानस ॥ तेथेंचि प्रगटशी जगन्निवास ॥ सर्वकाळ भक्तकार्यास स्वांगे उडी घालिसी ॥७२॥
सदाशिव ही अक्षरे चारी ॥ सदा उच्चारी ज्याची वैखरी ॥ तो परमपावन संसारी ॥ होऊनि तारी इतरांते ॥७३॥
बहुत शास्त्रवक्ते नर ॥ प्रायश्चित्तांचे करिता विचार ॥ परी शिवनाम एक पवित्र ॥ सर्व प्रायश्चिता आगळे ॥७४॥
नामाचा महिमा अद्भुत ॥ त्यावरी प्रदोषव्रत आचरत ॥ त्यांसी सर्व सिद्धि प्राप्त होत ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥७५॥
जयजयाजी पंचवदना ॥ महा पापद्रुमनिकृंतना ॥ मदमत्सरकाननदहना ॥ निरंजना भवहारका ॥७६॥
हिमाद्रिजामाता गंगाधरा ॥ सुहास्यवदना कर्पूरगौरा ॥ पद्मनाभमनरंजना त्रिनेत्रा ॥ त्रिदोषशमना त्रिभुवनेशा ॥७७॥
नीलग्रीवा अहिभूषणा ॥ नंदिवाहना अंधकमर्दना ॥ दक्षप्रजापति मखभंजना ॥ दानवदमना दयानिधे ॥७८॥
जय जय किशोर चंद्रशेखरा ॥ उर्वीधरेंद्रनंदिनीवरा ॥ त्रिपुरमर्दना कैलासविहारा ॥ तुझ्या लीला विचित्र ॥७९॥
कोटि भानुतेजा अपरिमिता ॥ विश्वव्यापका विश्वनाथा ॥ समाधिप्रिया भुतादिनाथा ॥ मूर्तामूर्ता त्रयीमूर्तै ॥२८०॥
परमानंदा परमपवित्रा ॥ परात्परा पंचदशनेत्रा ॥ पशुपते पयःफेनगात्रा ॥ परममंगला परब्रह्मा ॥८१॥
जय जय श्रीब्रह्मानंदमूर्ती ॥ तू वेदवंद्य भोळा चक्रवर्ती ॥ शिवयोगीरूपे भद्रायूप्रती ॥ अगाध नीती कथिलीस ॥८२॥
जय जय भस्मोध्दूलितांगा ॥ योगिध्येया भक्तभवभंगा ॥ सकळजनरआराध्यलिंगा ॥ नेई वेगी तुजपाशी ॥८३॥
जेथे नाही शिवाचे नाम ॥ तो धिक् ग्राम धिक् आश्रम ॥ धिक् ग्रहपुर उत्तम ॥ आणि दानधर्मा धिक्कार ॥८४॥
जेथे शिवनामाचा उच्चार ॥ तेथे कैचा जन्ममृत्युसंसार ॥ ज्यांसी शिव शिव छंद निरंतर ॥ त्यांही जिंकिले कळिकाळा ॥५॥
जयाची शिवनामी भक्ती ॥ तयाची सर्व पापे जळती ॥ आणि चुके पुनरावृत्ती ॥ तो केवळ शिवरूप ॥८६॥
जैसे प्राणियांचे चित्त ॥ विषयी गुंते अहोरात ॥ तैसे शिवनामी जरी लागत ॥ तरी मग बंधन कैचे ॥८७॥
कामगजविदारकपंचानना ॥ क्रोधजलदविध्वंसप्रभंजना ॥ लोभांधकार चंडकिरणा ॥ धर्मवर्धना दशभुजा ॥८८॥
मत्सरविपिनकृशाना ॥ दंभनगभंदका सहस्त्रनयना ॥ लोभमहासागरशोषणा ॥ अगस्त्य महामुनिवर्या ॥८९॥
आनंदकैलासविहारा ॥ निगमागमवंद्या दीनोद्धारा ॥ रुंडमालांकितशरीरा ॥ ब्रह्मानंदा दयानिधे ॥२९०॥
धन्य धन्य तेचि जन ॥ जे शिवभजनी परायण ॥ सदा शिवलीलामृत पठण ॥ किंवा श्रवण करिती पै ॥९१॥
सूत सांगे शौनकांप्रति ॥ जे भस्म रुद्राक्ष धारण करिती ॥ त्यांच्या पुण्यासी नाही गणती ॥ त्रिजगती धन्य ते ॥९२॥
जे करिती रुद्राक्ष धारण ॥ त्यांसी वंदिती शक्रद्रुहिण ॥ केवळ तयांचे घेता दर्शन ॥ तरती जन तत्काळ ॥९३॥
ब्राह्मणादि चार वर्ण ॥ ब्रह्मचर्यादि आश्रमी संपूर्ण ॥ स्त्री बाल वृद्ध आणि तरुण ॥ याही शिवकीर्तन करावे ॥९४॥
शिवकीर्तन नावडे अणुमात्र ॥ तो अंत्यजाहूनि अपवित्र ॥ लेइले नाना वस्त्रालंकार ॥ तरी ते केवळ प्रेतचि ॥९५॥
जरी भक्षिती मिष्टान्न ॥ तरी ते केवळ पशूसमान ॥ मयूरांगीचे व्यर्थ नयन ॥ तैसे नेत्र तयांचे ॥९६॥
शिव शिव म्हणता वाचे ॥ मूळ न राहे पापाचे ॥ ऐसे माहात्म्य शंकराचे ॥ निगमागम वर्णिती ॥९७॥
जो जगदात्मा सदाशिव ॥ ज्यासि वंदिती कमलोद्भव ॥ गजास्य इंद्र माधव ॥ आणि नारदादि योगींद्र ॥९८॥
जो जगद्गुरु ब्रह्मानंद ॥ अपर्णाह्रदयाब्जमिलिंद ॥ शुद्ध चैतन्य जगदादिकंद ॥ विश्वंभर दयाब्धी ॥९९॥
जो पंचमुख दशनयन ॥ भार्गववरद भक्तजीवन ॥ अघोर भस्मासुरमर्दन ॥ भेदातीत भूतपती ॥३००॥
तो तू स्वजनभद्रकारक ॥ संकटी रक्षिसी भोळ्या भाविका ॥ ऐसी कीर्ति अलोलिका ॥ गाजतसे ब्रह्मांडी ॥१॥
म्हणोनि भावे तुजलागून ॥ शरण रिघालो असे मी दीन ॥ तरी या संकटातून ॥ काढूनि पूर्ण संरक्षी ॥२॥

Sunday, June 1, 2025

बारावी नंतर काय?

बारावी नंतर काय?
Placement Cell: काय रे काय शिकलास?

Me: सर बारावी पास झालो.

 PC: सॉफ्ट स्किल्स काय येतात?

Me: सर दहावी नंतर आई ने मला स्मार्ट फोन घेऊन दिला मी त्यात व्हाट्सअप्प इंस्टॉल केलंय आणि आहे न सर मला मेसेज फॉरवर्ड करता येतो....न वाचता मला मेसेज आला की दुसऱ्या सेकंदाला मेसेज देशभर जातो....

PC: शिव्या देता येतात? 

Me: हो सर व्हेज (जस की बावळट, मूर्ख,वेडा)की नॉन व्हेज(^&*%)?

PC:बस बस कळलं, मीम करता येतात का?

Me: हो सर म्हणजे पिक्चर मधल्या सिन कापून तयार करण्यापासून मोदी आणि राहुल च्या भाषणच्या क्लिप हव्या तश्या एडिट करू शकतो सर....

PC: स्लोगन करता येतात का? 

ME: हो सर म्हणजे आता EXAMPLE बघा 

 "जिंकता येईना अन म्हणे मशीन बिघडले" 

किंवा

 "अव्वाज कोणाचा? मांजरीचा"

PC: FANTASTIC, टॅग LINE करता येते

ME: हो सर FOR EXAMPLE 
अबकी बार #खिचडी सरकार

PC: अरे वा!!!! त अरे तू कसला #बेरोजगार हे तर तुझंच #सरकार, 
ए अरे याला BJP च्या IT CELL मध्ये घ्या रे.....

© Harshad Mohan Chaphalkar

espncricinfo प्रश्न

मी विचारलेला प्रश्न espncricinfo वर प्रकाशित झाला