💠 म्हणजे विवाह कसा होईल याचे पुरावे दिसण्यापेक्षा विवाह का होणार नाही याची अनेक कारणे या पत्रिकेत दिसतील.
💠मुळात मुलाच्या पत्रिकेत शुक्र पहावा लागतो तो वृषभ या स्वराशीत जरी असला तरी कृतिका या क्रूर अति उष्ण नक्षत्रात आहे जो वैवाहिक सुखाला पूरक नाही.
💠दुसरा ग्रह मुलाच्या पत्रिकेत म्हणजे मंगळ तो शनी, केतू, बुध अश्या नपूंसक ग्रहांच्या युतीत आहे
💠 पत्रिकेत सप्तमात धनू राशीचा गुरु आहे तो ही विवाहला पूरक नाही.
💠 शनीची तिसरी दृष्टी शुक्रावर पडते अश्या स्थितीत मुलगा जास्तीत जास्त काळ virgin राहतो/ राहण्याकडे कल असतो. म्हणजे जर तुम्ही त्याच्या मागे लागला नाहीत तर तो आयुष्यभर ही virgin राहू शकेल. या गोष्टीला गुरुवरची शनीची दृष्टी पूरक आहे.
💠 त्या गुरुवर शनी ची दहावी दृष्टी पडते. ती देखील विवाहला किंवा मुलाला लग्न करायच नाही असा कल दाखवते. म्हणजे in general मुला ला लग्न करण्यात आणि लग्नातून पुढे ज्या गोष्टी होणे अपेक्षित आहे त्यात रस नाही असे दिसते.
💠चतुर्थात राहू आणि चतुर्थेश बुध केतू शनी च्या युतीत असल्याने कुठल्याही घर, प्रॉपर्टी, बंगला, गाडी एकट्या मुलाच्या च्या नावावर करू नये नुकसान संभवते. त्याला कायम secondary ठेवावे अथवा आधी गाडी घर खरेदी करताना तुमच्या नावावर करावे आणि मग काही वर्षांनी त्याच्या नावावर करावे. कुठलीही नवी कोरी गोष्ट मुलाच्या च्या नावावर करू नये.
💠 अष्टमतले हर्षल नेपच्यून आणि त्यांची चंद्रावर सातवी दृष्टी शरीर सुखाबद्दल च्या आवाजवी कल्पना दाखवतो. (मला इतकंच स्पष्ट लिहिता येत, म्हणजे काय हे समजण्यास आपण सुज्ञ आहात.)
💠 त्याचं कृतिकेच्या शुक्रावर प्लुटो ची दृष्टी आहे ती देखील वैवाहिक सुखाला पूरक नाही....
💠 इतके अडथळे असूनही पुढच्या दोन वर्षात त्याचे लग्न होईल असं वाटतं. मे 2025 ते जुन 2026 गोचर गुरुची सप्तमावर दृष्टी आहे. आणि जून 2026 ते जुलै 2027 गुरु कर्केत जातो तेव्हा उत्तम गुरुबळ आहे त्या वर्षात शक्यता आहे. विवाह टिकण्याची शाश्वती मी देत नाही.
💠 माझा पालकांना एकच सल्ला राहील जी मुलगी मुला कडे बघून होकार देईल तिला तुम्ही कोणतेही आढे वेढे न घेता होकार द्या. आणि जर मुलीकडचे पत्रिका बघणार नसतील तर तुम्ही पण बघू नका .
🙏करता करविता गुरुदेव दत्त🙏
No comments:
Post a Comment