Tuesday, April 29, 2025

अंदाजे जन्मतारीख व वेळेवरून जन्मवेळ निश्चिती - शिवराम काजरेकर

अंदाजे जन्म दिनांक व वेळेवरून जन्मवेळ निश्चिती
*
जातकाला जन्मतारीख अंदाजे माहिती होती वेळेचा पत्ता नाही. फक्त जन्म ठिकाण माहिती होते. यावरून त्याची जन्मतारीख व वेळ निश्चित करून कुंडली तयार करता येईल का असा जातकाने प्रश्न विचारला होता. यासाठी मी कोणकोणत्या प्रकारे विचार केला ते पुढील प्रमाणे-
*
 जन्मतारीख- दोन जून 1966 (अंदाजे)
 वेळ- माहित नाही 
 जन्मस्थळ- कुडाळ 
*
 प्रश्न पाहिला दिनांक- 19 एप्रिल 2025 
 प्रश्न वेळ- 09:45:37 
 प्रश्न स्थळ- जांभवडे, कुडाळ 
*
 प्रश्न वेळेचे RP (रुलिंग प्लॅनेटस्)
 शुक्र*मंगळ, केतू, गुरु, शनि 
 शनि राहू युती 
*
1966 हे जन्म वर्ष बरोबर आहे की नाही हे ठरविण्यासाठी शनि चा विचार करायचा आहे. शनि जन्मवेळी(1966 साली) मीन राशीत आहे आणि आज गुरू आरपी आहे. म्हणजे जन्म वर्ष बरोबर असण्याची शक्यता आहे.
*
 जून महिना बरोबर आहे की नाही हे तपासण्यासाठी रवि बघावा लागेल. जन्मपत्रिकेत रवि वृषभ राशीमध्ये आहे. साधारणपणे 14 मे ते 14 जून या कालखंडात रवि वृषभ राशीत असतो. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आज सर्वात महत्त्वाचा रुलिंग प्लॅनेट आहे. म्हणजे जून महिना सुद्धा बरोबर असण्याची शक्यता आहे.
*
दोन जून ही जातकाने सांगितलेली तारीख आहे. त्यादिवशी चंद्र वृश्चिक राशीत आहे. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आज रुलिंग प्लॅनेट आहे त्यामुळे दोन जून ही तारीख ही बरोबर मानता येईल.
*
वृश्चिक राशी मध्ये विशाखा अनुराधा आणि ज्येष्ठा ही तीन नक्षत्रे आहेत. पैकी दोन जून या दिवशी विशाखा नक्षत्र नऊ वाजून नऊ  मिनिटापर्यंत आहे. आणि त्यानंतर अनुराधा नक्षत्र पूर्ण दिवस आहे. आता विशाखा या नक्षत्राचा स्वामी गुरु आणि अनुराधा नक्षत्राचा स्वामी शनि हे दोन्ही ग्रह रुलिंग प्लॅनेट्स मध्ये आहेत पण शनि हा वाराचा स्वामी म्हणून आलेला आहे आणि गुरु हा राशी स्वामी म्हणून आलेला आहे. त्यामुळे विशाखा नक्षत्र निश्चित करावे लागेल. याचा अर्थ या जातकाचा जन्म सकाळी 09:09 पूर्वी झालेला असायला हवा.
*
सूर्योदयापासून 09:09 पर्यंत वृषभ, मिथुन आणि कर्क ही तीन लग्न आहेत. जातकाचे याच्यापैकीच एक लग्न असायला हवे. आता यापैकी वृषभेचा स्वामी शुक्र, मिथुनेचा बुध आणि कर्केचा चंद्र यांच्यापैकी बुध आणि चंद्र हे दोघेही आज आरपी नाहीत. म्हणून शुक्र आज आर पी असल्यामुळे वृषभ लग्नच निश्चित करावे लागेल.
*
यातही वार गुरुवारच धरावा लागेल. सूर्योदयापूर्वी बुधवार होईल आणि बुध आज रुलिंग मध्ये नाही. म्हणून गुरुवारच्या सूर्योदयापासून म्हणजे सहा वाजून एक मिनिटानंतर आणि वृषभ लग्न संपेपर्यंत या जातकाचा जन्म झालेला असायला पाहिजे.
त्यादिवशी पहाटे  04:56 पासून वृषभ लग्न सुरू झालेले आहे.06:56 पर्यंत वृषभ लग्न आहे.
*
आता या वृषभ लग्नामध्ये कृत्तिका रोहिणी आणि मृग ही तीन नक्षत्रे येतात सहा वाजून एक मिनिटानंतर म्हणजेच सूर्योदयानंतर आणि सहा वाजून 28 मिनिटे पर्यंत चंद्राचे नक्षत्र आहे त्यानंतर सहा वाजून 56 मिनिटापर्यंत मंगळाचे नक्षत्र आहे. पण चंद्र हा आज रुलिंग प्लॅनेट नाही. त्यामुळे मंगळाचेच नक्षत्र आपल्याला स्वीकारावे लागेल. म्हणजे या जातकाचा जन्म सकाळी सहा वाजून 28 मिनिटे ते सहा वाजून 56 मिनिटापर्यंतच झाला आहे.
*
आता आपले लग्न निश्चित झाले, लग्नाचा नक्षत्र स्वामी नक्की झाला. आता उपनक्षत्र स्वामी निश्चित करू. या 28 मिनिटांच्या दरम्यान मंगळ, राहू, गुरु आणि शनि हे चारच उपनक्षत्र स्वामी आहेत. राहू हा शनिच्या युतीत असल्यामुळे शनिपेक्षा त्यालाच अधिक महत्त्व द्यायला हवे. राहू हा उपनक्षत्र स्वामी म्हणून स्वीकारला तर जातकाची जन्मवेळ सहा वाजून 32 मिनिटे अशी येईल.
पण त्यामुळे सप्तमाचा उपनक्षत्र स्वामी पण राहूच येईल आणि पत्नीचे जन्म नक्षत्र धनिष्ठा  आहे. म्हणून या जातकाच्या लग्नाचा उपनक्षत्र स्वामी मंगळ करून घेतला तर सप्तमाचा उपनक्षत्र स्वामीही मंगळ येतो.
आता जातकाच्या कुंडलीच्या लग्नाचा उपनक्षत्र स्वामी हा जातकाच्या चंद्राच्या समसप्तक योगात आहे. हे एक आणि जातकाच्या सप्तमाचा उपनक्षत्र स्वामी  मंगळ हा जातकाच्या पत्नीच्या नक्षत्राशी जुळतो म्हणून जन्मवेळ सहा वाजून 31 मिनिटे अशी करावी लागेल. 
*
आता त्यांच्या मुलांची माहिती घेऊन त्यानुसार याचे लाभस्थान  तपासावे लागेल.
*
प्रथम अपत्य-जन्मतारीख 14 जानेवारी 1991 
मूळ नक्षत्र आणि धनु राशी आहे.
*
द्वितीय अपत्य- जन्मदिनांक 01ऑगस्ट 1996 
शततारका नक्षत्र आणि कुंभ राशी आहे.
*
पहिला मुलगा त्याचे नक्षत्र मूळ आणि धनु राशी आहे. पहिल्या मुलाचा विचार पुरुष जातकाच्या कुंडलीत लाभस्थानावरून करतात.
लाभस्थानाचा उपनक्षत्र स्वामी बुध आहे. पहिल्या अपत्याचा राशी स्वामी गुरु जातकाच्या कुंडलीत मिथुन राशीत आहे त्यामुळे हा संबंध व्यवस्थित जुळतो
*
मुलीचे शततारका नक्षत्र आणि कुंभ राशी आहे. पुरुष जातकाच्या पत्रिकेत दुसऱ्या अपत्याचा विचार लग्न स्थानावरून करतात. जातकाच्या कुंडलीच्या लग्नाचा उपनक्षत्र स्वामी मंगळ आहे. जातकाच्या कुंडलीत अपत्याचा चंद्रराशी स्वामी शनि आणि मंगळ यांच्यामध्ये त्रिरेकादश योग आहे.
*
जातकाचा विवाह 18 फेब्रुवारी 1990 रोजी झाला. या दिवशी जातकाला बुधाची महादशा केतूची अंतर्दशा आणि राहूची विदशा होती. हे तीनही ग्रह दोन, सात आणि 11 या भावांशी संबंधित आहेत. त्यामुळे ही जन्मवेळ  बरोबर आहे असे मानता येईल.
*
या कुंडली वरून जातकाच्या व्यवसायाचा विचार करू. या कुंडलीत दशम भावाचा उपनक्षत्र स्वामी बुध आहे. हा बुध मंगळाच्या नक्षत्रात असून सप्तमाचा बलवान कार्येश आहे. त्यामुळे हा जातक नोकरी करणारच नाही. फक्त व्यवसाय करील आणि करतो. हा मंगळ अग्नितत्वाचा असल्यामुळे अग्नीशी संबंधित व्यवसाय ही गोष्ट व्यवस्थित जुळते. त्याच बरोबर मंगळ भूमिपुत्र आहे. त्यामुळे जमिनीचा खरेदी विक्रय किंवा जमिनीतील उत्पादने विकणे, शेती इत्यादी जातकाचा व्यवसाय होईल आणि आहे.
दशम भावाचा उपनक्षत्र स्वामी बुध असल्यामुळे जातक एकापेक्षा जास्त व्यवसाय किंवा धंदे करील करतो.
दशम भावाचा उपनक्षत्र स्वामी बुध हा शुक्राशी संबंधित असल्यामुळे खानपान सेवा किंवा हॉटेल अशा प्रकारचे व्यवसाय करावेत आणि करतो. 
*
लग्नाचा उपनक्षत्र स्वामी मंगळ असल्यामुळे शस्त्र प्रेमही आहे.
*
या सर्व गोष्टी विचारात घेता आपण वर जातकाची ठरवलेली जन्मवेळ 06:31 ही अचूक आहे असे म्हणता येईल.
*

संकलन : हर्षद चाफळकर 

Tuesday, April 22, 2025

नोकरीं की व्यवसाय आणि शनी राहु युती चे परिणाम


💠तुमची पत्रिका ही स्थिर लग्नाची असल्याने आणि दशमेश शनी सुद्धा स्थिर राशीत असल्याने कितीही त्रास झाला नको वाटलं तरी तुम्हाला नोकरीच करावी लागेल असं दिसतय.
💠 पत्रिकेत शनी सिंह या अग्नी राशीत असल्याने तुम्ही चांगल्या उच्चा पदावर अधिकारी असण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात आवड असणे. समाजात वावर आणि सन्मान सिंहेत ला शनी देतो.

💠चतुर्थात राहू असल्याकारणाने गाडी, फॉर व्हीलर जर आपल्या नावावर असेल किंवा एखादी जमीन फ्लॅट आपल्या एकट्याचा नावावर असल्यास नुकसान झालं असण्याची शक्यता आहे 
💠 शनी राहू युती ही देखील अशुभ युती मानली जाते त्याचे परिणाम तुमच्या राहत्या घरात मानसिक शांतता नसणे कायम खर्च निघणे अश्यात होतं असावी 
💠 सध्या अजून वर्षभर गुरु ची दशा सुरु आहे. गुरु बुधाच्या नक्षत्रात असल्याने कायम नोकरीत बदल झाला असावा. एखादी नोकरीं चार - पाच वर्षांनी बदलली असेल किंवा बदलण्याची इच्छा झाली असावी. ती शनी राहू युती खऱ्या अर्थाने तुम्हाला त्रासदायक ठरताना दिसत आहे. 
💠 पुढच्या वर्षी एप्रिल मध्येच तुमची दशा बदलत आहे तेव्हा तुम्ही बऱ्यापैकी नोकरीत स्थिर व्हाल नोकरीत मन रमेल.

व्यवसाय करायचाच असल्यास हळू हळू progression घ्या लाभातून शनी चे गोचर लवकर लाभ देणार नाही एकदम व्यवसायात उडी मारली तर frustration देईल. तेव्हा जपून व्यावसायिक पावले उचलावीत अन्यथा नोकरीं उत्तम. 👌

💠 षष्ठ स्थानातला हर्षल undiagnosed आजार दाखवतो. म्हणजे ज्याचे निदान डॉक्टरांना करता येत नाही असे काही आजार विकार. तसे काही असल्यास कळवावे.

पण ओव्हरऑल पुढच्या वर्षी पासून नोकरी व्यवसायात मन लागेल.


 शनी राहू युतीवर दर शनिवारी शनी महाराजांचे दर्शन तेल अर्पण हनुमान दर्शन करता येईल

शुभेच्छा!!!

Sunday, April 13, 2025

विवाह न होण्याचे एकाच पत्रिकेत अनेक कारणे


💠मी जितक्या वेळा ही पत्रिका बघतोय मला विवाह संबंधी अडचणी जास्त दिसतात.
💠 म्हणजे विवाह कसा होईल याचे पुरावे दिसण्यापेक्षा विवाह का होणार नाही याची अनेक कारणे या पत्रिकेत दिसतील.
💠मुळात मुलाच्या पत्रिकेत शुक्र पहावा लागतो तो वृषभ या स्वराशीत जरी असला तरी कृतिका या क्रूर अति उष्ण नक्षत्रात आहे जो वैवाहिक सुखाला पूरक नाही.
💠दुसरा ग्रह मुलाच्या पत्रिकेत म्हणजे मंगळ तो शनी, केतू, बुध अश्या नपूंसक ग्रहांच्या युतीत आहे 
💠 पत्रिकेत सप्तमात धनू राशीचा गुरु आहे तो ही विवाहला पूरक नाही.
💠 शनीची तिसरी दृष्टी शुक्रावर पडते अश्या स्थितीत मुलगा जास्तीत जास्त काळ virgin राहतो/ राहण्याकडे कल असतो. म्हणजे जर तुम्ही त्याच्या मागे लागला नाहीत तर तो आयुष्यभर ही virgin राहू शकेल. या गोष्टीला गुरुवरची शनीची दृष्टी पूरक आहे.
💠 त्या गुरुवर शनी ची दहावी दृष्टी पडते. ती देखील विवाहला किंवा  मुलाला लग्न करायच नाही असा कल दाखवते. म्हणजे in general मुला ला लग्न करण्यात आणि लग्नातून पुढे ज्या गोष्टी होणे अपेक्षित आहे त्यात रस नाही असे दिसते.
💠चतुर्थात राहू आणि चतुर्थेश बुध केतू शनी च्या युतीत असल्याने कुठल्याही घर, प्रॉपर्टी, बंगला, गाडी एकट्या मुलाच्या च्या नावावर करू नये नुकसान संभवते. त्याला कायम secondary ठेवावे अथवा आधी गाडी घर खरेदी करताना तुमच्या नावावर करावे आणि मग काही वर्षांनी त्याच्या नावावर करावे. कुठलीही नवी कोरी गोष्ट मुलाच्या च्या नावावर करू नये.
💠 अष्टमतले हर्षल नेपच्यून आणि त्यांची चंद्रावर सातवी दृष्टी शरीर सुखाबद्दल च्या आवाजवी कल्पना दाखवतो. (मला इतकंच स्पष्ट लिहिता येत, म्हणजे काय हे समजण्यास आपण सुज्ञ आहात.)
💠 त्याचं कृतिकेच्या शुक्रावर प्लुटो ची दृष्टी आहे ती देखील वैवाहिक सुखाला पूरक नाही....
💠 इतके अडथळे असूनही पुढच्या दोन वर्षात त्याचे लग्न होईल असं वाटतं. मे 2025 ते जुन 2026 गोचर गुरुची सप्तमावर दृष्टी आहे. आणि जून 2026 ते जुलै 2027 गुरु कर्केत जातो तेव्हा उत्तम गुरुबळ आहे त्या वर्षात शक्यता आहे. विवाह टिकण्याची शाश्वती मी देत नाही

💠 माझा पालकांना एकच सल्ला राहील जी मुलगी मुला कडे बघून होकार देईल तिला तुम्ही कोणतेही आढे वेढे न घेता होकार द्या. आणि जर मुलीकडचे पत्रिका बघणार नसतील तर तुम्ही पण बघू नका .

 🙏करता करविता गुरुदेव दत्त🙏

espncricinfo प्रश्न

मी विचारलेला प्रश्न espncricinfo वर प्रकाशित झाला