सध्या भारताच्या लोकसंख्येत 1975 नंतर जन्मला आलेला मोठा वर्ग म्हणजे साधारण वय वर्ष 45 च्या आसपास बहुतांशी 1980 नंतरची आहेत!!!!
आम्ही 1990 चे दशक सुरू होतानाच जन्माला आलो! आता साधारण समाजकारण,राजकारण, राजकीय पक्ष याच भान कोणालाही किमान वयाच्या 12-13 व्या वर्षांपासून शाळेत नागरिकशास्त्र च्या माध्यमातून येते!!!
आता समजा 1975 साली जन्माला आलेली लोक त्यांच्या 12-13 व्या वर्षी काय बघत असावेत??? तर राजीव गांधींकडे राक्षसी बहुमताचं सरकार आहे त्यांनी नुकताच सर्वोच्च न्यायालयाने शहा बानो प्रकरणात दिलेला निकाल फिरवला आहे आणि याला एका समाजाचे तुष्टीकरण समजू नये यासाठी त्यांनी एकीकडे राम मंदिराचे दरवाजे उघडायची परवानगी दिली दुसरीकडे दूरदर्शन या तत्कालीन एकमेव वाहिनीवर रामायण महाभारत च्या मालिका सुरू करून सो कॉल्ड #सर्वधर्मसमभाव जपण्याचा प्रयत्न केला!!!
पुढच्या दोन एक वर्षात 1991 पर्यंत काय होतं तर राजीव गांधी गरज नसताना श्रीलंकेत शांतिदुत म्हणून भारतीय सैन्य पाठवतात आणि त्याची किंमत म्हणून ते आपला जीव गमावतात!!!
आता थोडं पुढं येऊ 1980 ते 1985 ची पिढी त्यांच्या 12-13व्या वर्षात काय बघते?? तर राजीव गांधी यांच्या हत्येनंतर पंतप्रधान पदाची #संगीतखुर्ची झालेली बघते चंद्रशेखर, व्ही पी सिंग, नरसिंह राव, देवेगौडा, इंदरकुमार गुजराल यांच्या मध्यात वाजपेयी 13 दिवसाचे पंतप्रधान होतात!!! राजीवोत्तर काळात मंडल आयोग, रामजन्मभूमी, बाबरी, आर्थिक उदारीकरण, हर्षद मेहता, इतका कॅनव्हास पुढे सरकतो!!!!
आता आमची पिढी 1990 ते 1995 या पिढीने त्यांच्या काळात पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा कोणाला पाहिलं असेल तर अटल बिहारी वाजपेयी!!! आणि नंतर च्या काळात डॉ. मनमोहन सिंग ..... खरंच सांगतो काँग्रेस ने या पिढीला(1990-95) राजीव गांधींची ओळख
"राजीव गांधी कॉम्प्युटर, मोबाईल लाए थे"😃😃 एवढीच ठेवली!!!!
आणि म्हणून आमच्या पिढीने काँग्रेस चा पंतप्रधान म्हणून ना नेहरूंना पाहिलं, ना इंदिरा गांधींना पाहिलं, ना राजीव गांधींना आम्हला काँग्रेस पंतप्रधान म्हणून प्रत्यक्ष पाहिलेले, अनुभवलेले फक्त आणि फक्त मनमोहन सिंग एवढेच माहीत आहेत!!!!
आता आर्थिक उदारीकरण करणारे अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग वेगळे आणि गांधी घराण्याचे बाहुले पंतप्रधान मनमोहन सिंग वेगळे दोघांना सरमिसळ करण्यात पॉईंट नाही!!!!
मनमोहन सिंग यांच्या काळात माहितीचा अधिकार कायदा, अमेरिकेशी अणुकरार, शिक्षणाचा अधिकार, अन्नसुरक्षा कायदा या काही ठळक चांगल्या गोष्टी झाल्या पण पहिल्या पेक्षा दुसऱ्या कार्यकाळात हतबल झालेले मनमोहन सिंग, दहशतवादी हल्ल्याला उत्तर न देणारे, नाकाखाली भ्रष्टाचार सुरू असताना दुर्लक्ष करणारे मनमोहनसिंग या पिढीने आणि येणाऱ्या पुढच्या सगळ्या पिढिने पाहिले आणि इथंच नवतरुणांमध्ये काँग्रेसची प्रतिमा खालावत गेली त्यावर कडी केली ती 2011 सालच्या लोकपाल आंदोलनाने आणि त्यात निर्माण झालेल्या जनक्षोभला तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजप ने योग्य संधी साधून काँग्रेस ला सत्तेतून खाली खेचले!!!
आता नव्या सहस्त्रकात सन 2000 साली जन्मलेली पिढी (कळणाऱ्या मराठीत millenials म्हणतात) ज्या पिढीने 2019 साली आपलं पहिलं मत फार मोठ्या प्रमाणावर दिलं ती पिढी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनाच पाहते!!! या पिढीला तुम्ही कितीही अक्षरशः कितीही नेहरू, इंदिरा, राजीव, यांचं तुणतुणे वाजवा काहीही फरक पडणार नाही!!!! आणि त्याचा सरळ सरळ परिणाम लोकसभा आणि विविध राज्यांच्या विधानसभांच्या निकालात स्पष्ट दिसतात!!!! गंमत म्हणजे जे काँग्रेस चे आमदार निवडून आल्यावर खुशाल राजीनामा देऊन भाजप च्या कमळावर निवडून येतात त्याअर्थी या पिढीला ऍलर्जी उमेदवाराची नाही तर काँग्रेस पक्षाची आहे हे वारंवार स्पष्ट होते!!!!!
तद्वत, मोदी आणि भाजप यांनी जो काँग्रेसमुक्त भारताचा नारा दिला आहे तो सहज शक्य आहे!!!! कारण काँग्रेस अजूनही नेहरू, इंदिरा, राजीव यांच्या पूर्वपुण्याईतून बाहेर पडायला तयार नाही!!!!
-✍️ हर्षद मोहन चाफळकर,
(भक्कम काँग्रेस चा हितचिंतक)
No comments:
Post a Comment