मूळ कवी आरती प्रभूंची माफी मागून...
मूळ कविता: कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे...
कुणाच्या चिन्हावर कुणाचे नेते??
कशासाठी उतरावे शड्डू ठोकून
कोण गेले तिकिटासाठी पक्ष सोडून
मागतात तिकीट सारे रडून रडून
तरी कसे म्हणतात मतदार माझ्या मागे....
निष्ठा सारी जाती जेथे विकून विरून
पक्ष जाती कोसळून तोडफोड करून..
जनतेचा लुटती पैसा मारून झोडून...
म्हणती हे वेडे सारे तरीही आम्हीच "राजे"
-हर्षद मोहन चाफळकर,
पुणे
No comments:
Post a Comment