Thursday, September 3, 2020

सब चॅनल बारा टक्के

विंदांची माफी मागून.


जितके चॅनल, तितके संपादक 
जितके पत्रकार तितके बोंडुके;
कोणी भडवा, कोणी दलाल 
कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ
कोणी लाचार कोणी भक्त; 
कोणी लुच्चे कोणी फक्के
सब चॅनल बारा टक्के!

गोड गोड स्क्रीप्टेड मुलाखती
(त्यांचेच प्रश्न  त्यांचीच उत्तरे)
जुना धोंडा नवा रंग
जुनी आश्वासने नवा भंग;
पत्रकार तरी काय करणार? 
जनता तरी काय करणार?
त्याच त्याच बातम्यांमध्ये
पुन्हा पुन्हा तोच बाईट;
भंकस बातमीला ब्रेकिंग चे पट्टे
सब चॅनल बारा टक्के!

जिकडे सत्ता, तिकडे मालकी
जिकडे सत्य, तिकडे नालायकी;
ज्याचा पैसा त्याचा चॅनल
चर्चेला पुन्हा पुन्हा त्याचंच पॅनल; 
सत्तेच्या लाथा, विरोधकांचे बुक्के
सब चॅनल बारा टक्के!

सब स्टंट! बातमी कमी; 
कोण देईल त्यांची हमी?
कोणी सरदेसाई, कोणी चव्हाणक्के; 
सब चॅनल बारा टक्के!

- हर्षद मोहन चाफळकर, पुणे
०३०९२०२००८२९

No comments:

Post a Comment

espncricinfo प्रश्न

मी विचारलेला प्रश्न espncricinfo वर प्रकाशित झाला