मित्र परदेशात जॉब साठी प्रयत्न करत होता काही केल्या योग जुळून येत नव्हता म्हणून व्हाट्सअप्प ला त्याने मेसेज केला...
ओमान मध्ये प्रयत्न करत होतो पण माझ्याऐवजी मित्राचं सिलेक्शन झालं, जरा बघतोस का कुठे जॉब लागेल आणि कधी जॉब लागेल???
दिलेली माहिती अशी
पुरुष
1 सप्टेंबर 1988
20.17
सांगली
प्रश्नवेळी जातकाला
#राहू महादशा
राहू 12/9,11,12 दृष्ट रवी 6/6,
नस्वा. गुरू 2/10,1
#बुध अंतर्दशा
बुध 6/4,7
नस्वा. रवी 6/6
#शुक्र विदशा
शुक्र 4/3,8
नस्वा.गुरू 2/1,10
आता दशा, अंतर्दशा, विदशा 2,6,10 प्रत्येक वेळी देत आहे तर मग नोकरी ला कॉल का येत नाही???
कदाचित लाभात व दशमात अनुक्रमे वक्री शनी आणि वक्री गुरू चा चेक बसला असावा!!!
मी शुक्राची विदशा सोडून द्यायचं ठरवलं आणि एकदम पुढची रवी विदशा विचारात घेतली!!!
रवी 6/6
नस्वा. शुक्र 4/3,8
उनस्वा. रवी 6/6
म्हणजे राहू/ बुध/रवी हा कालावधी
28/9/2020 ते 14/11/2020 चा कालावधी कळवला...
आता विदशा स्वामी 3,8 चा कार्येश असल्याने व्हिसा संबंधी अडचण येऊ शकते असे कळवले आहे...
पण रवी उपनक्षत्र स्वामी पातळी ला 6 चा कार्येश असल्याने आशादायक परिस्थिती आहे!!
पुढचा प्रश्न कुठे प्रयत्न करू???
त्याने क्रम खालील प्रमाणे दिला होता
1.कतार
2. ओमान
3. अबुधाबी
4. कुवेत
प्रश्न कुंडली मांडली...
स्क्रीन शॉट देत आहे!!!
#प्रश्नकुंडली
1 सप्टेंबर 2020
23.04
पुणे
प्रश्नकुंडलीत चंद्र तृतीयेश होऊन दशमात आहे, दशमेश नवमात आहे परदेश संबधी नोकरी.. प्रश्नाचा रोख बरोबर आहे!!!!
L: शुक्र 2+7 =9
S: राहू(बुध) 3+6= 9
R: शनी(व)❌
D: मंगळ 1+8= 9
=================
बेरीज 27=2+7=9
9/4 = 1
1 शिल्लक राहिली म्हणून पर्याय क्रमांक 1. कतार मध्ये प्रयत्न करावा!!!!
No comments:
Post a Comment