🌼 *।।श्रीगुरुदेव दत्त।।*🌼
सदर कुंडली ही 13 एप्रिल 2020
रात्री 8 वाजून 23 मिनिटांची
नवी दिल्ली ची असतल्याने याचे परिणाम फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात जाणवतील..
👉 *प्रमुख ग्रहयोग* 👈
❌ षडअष्टक ❌
शनी-राहू
गुरू-राहू
प्लूटो-राहू
मंगळ-राहू
❌केंद्र योग❌
शनी- रवी
मंगळ- रवी
प्लूटो- रवी
गुरू- रवी
❌युती❌
रवी-हर्षल
गुरू-मंगळ-शनी-प्लूटो
✅नवपंचम✅
रवी-केतु
राहू- नेपच्यून
💠मेष संक्रमण ची कुंडली तूळ लग्नाची आहे लग्नेश शुक्र स्वराशीत अष्टमात असल्याने सध्या जनतेच्या आरोग्याचा प्रश्न आहे हे अधोरेखित होतंय. सामान्य जनतेच्या कारक चंद्र याच्याशी लग्नेश शुक्राचा षडअष्टक सरळ सरळ दाखवतोय की जीवनशैलीशी निगडित आजार (डायबेटीस, हृदयरोग)ज्यांना आहेत ते या संसर्गातून बाधित होत आहेत, होणार आहेत.
💠 द्वितीयेश मंगळ चतुर्थात षष्ठेश गुरू चतुर्थेश,पंचमेश शनी प्लूटो यांच्या युतीत असल्याने सरकारी तिजोरी बँका यांचा सगळा निधी पुढच्या तीन महिन्यात आरोग्य आणि शेती उद्योग याना उभारी देण्यात जाणार आहे.(कालचीच बातमी आहे बँका लोकांना कर्ज देतायत.)💠 तृतीय स्थानात चंद्र केतु युती चंद्र दशमेश होऊन तृतीयात, सत्तारूढ पक्षाकडून दळण वळण, वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील राहील.
💠चतुर्थ स्थानात मकर राशीत मंगळ, गुरू, प्लूटो, शनी हे चार ग्रह आहेत त्यांचा राहू शी षडअष्टक योग होत आहे. या काळात हवामानात विचित्र बदल संभवतात. भूकंप चक्रीवादळाची शक्यता आहे.शिवाय संसर्गाच्या कचाट्यात वृद्ध व्यक्ती, जुने आजार असणारे व्यक्ती, स्थूलपणा असणाऱ्या व्यक्ती, धार्मिक स्थळे, धार्मिक कार्यक्रमासाठी लोकांचे एकत्र येण्याने संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
💠पंचमात कुंभेचा नेपच्यून शेअर बाजारात *फसवी वाढ* दाखवेल. पंचमेश शनी स्वतःच्या व्यायात असल्याने शेअर बाजार सुधारण्याची शक्यता किमान जुलै पर्यंत शक्यता दिसत नाही. जन्म मृत्यू नोंदणीत अफरातफर किंवा खोटे आकडे प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
💠 षष्ठ स्थानात नीच राशीत बुध व्ययेश होऊन सध्याच्या रोगावर हॉस्पिटलायझेशन चे प्रमाण वाढण्याचे प्रमाण अधोरेखित करतो. इथून पुढे तीन महिन्यात *"कदाचित"* लहान मुले वय वर्ष 0 ते 12 या वयोगटातील मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक वाटते.
💠 सप्तम स्थानात उच्चीचा रवी लाभेश होऊन परदेशात देशाचा लौकिक वाढेल. मित्र राष्ट्र आंतरराष्ट्रीय संघटनेकडून आर्थिक मदत, मिळेल.
💠अष्टम स्थानात स्वराशीचा शुक्र स्त्रिया, कलाकार, याना तापदायक,सोने-चांदी मौलयवान वस्तू यांच्या किमतीत वाढ शक्य आहे.
💠 भाग्यातील राहू भाग्येश षष्ठात कारणाने तीर्थक्षेत्रे, धर्मपीठ, कोर्ट येथील अपहार बाहेर येऊ शकतो न्यायाधीश, धर्मगुरू वादाच्या केंद्र स्थानी असू शकतील.
15 जुलै ते 14 ऑगस्ट 2020 हा काळ केंद्र सरकार साठी तापदायक ठरू शकतो.
वरील सर्व भाकिते ही माझ्या अभ्याससाठी आहेत. ही भाकिते पुढील वर्षभरासाठी आहेत मात्र 14 जुलै 2020 पर्यँत याची फळे तीव्रतेने जाणवतील. कर्ता करविता श्री गुरुदेव दत्त
- ✒️ _हर्षद मोहन चाफळकर_
_ज्योतिष विशारद, पुणे-१४_
🙏 *_।।श्रीदत्तात्रर्पणमस्तू।।_*🙏
No comments:
Post a Comment