आजचे दोन्ही विषय विचारात घेता पहिल्या विषयावर दुसरा विषय अवलंबून आहे...
मुळातच आत्मा म्हणजे काय? या प्रश्नापासून सुरुवात करावी लागेल.
भगवान श्रीकृष्णाने गीतेत स्पष्ट पणे आत्म्याची व्याख्या एका लोकप्रिय श्लोकातून केली आहे...
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ।।
अर्थ: ज्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाहीत, अग्निद्वारे जाळता येत नाही,पाण्याने भिजवता येत नाही तसेच वाऱ्याने सुकवता ही येत नाही त्याला आत्मा म्हणावे....
आता इतकी व्यापक व्याख्या स्वतः भगवान श्रीकृष्णाने केली आसतना पुन्हा नव्याने ती करण्यात अर्थ नाही...
श्रीकृष्णाने आत्मा कुठल्याच प्रकारे संपवता येत नाही हे सांगितले याचाच अर्थ आपली भारतीय संस्कृतीत जे सांगितले आहे की मनुष्य जन्म हा ८४लक्ष योनी फिरून आल्यावर प्राप्त होतो...
त्या ८४ लक्ष योनी सुद्धा मी थोड्या शोधल्या त्या मला खालील प्रमाणे मिळाल्या...
जलचर - ९ लक्ष
पक्षी - १० लक्ष
कीटक - ११ लक्ष
वनस्पती - २० लक्ष
पशु - ३० लक्ष
मानव - ४ लक्ष
असे एकूण ८४ लक्ष होतात.
आता आपण सहज म्हणू शकतो की एवढे जीव खरच पृथ्वी तलावर आहेत का?
त्याच उत्तर कदाचित डिस्कव्हरी, animal planet, किंवा तत्सम निसर्गाला वाहून घेतलेल्या वाहिन्यावरचे माहितीपट पाहिल्यावर जीवसृष्टीत ले वैविध्य लक्षात येईल व आपली ८४ लक्ष योनी आहेत हे ही लक्षात येईल....
यातल्या कित्येक योनीचं जीवनकाल हा काही तासापासून कासवासारखे प्राणी ४०० वर्ष जगतात(कोलकात्यात एक आहे.)
एवढा अवाढव्य सृष्टीचा विस्तार असताना त्यात कित्येक आत्मे फिरत राहतात...
आपल्या वेद उपनिषदांचा एक भाग असलेल्या ज्योतिष शास्त्रात सुद्धा एखाद्या व्यक्तीची पत्रिका करताना त्या पुस्तिकेत पहिले वाक्य हेच लिहलेले असते
"अस्य बालकस्य पूर्वकर्मानुसारेण"
याचाच अर्थ आपली संस्कृती ही पूर्वजन्म मानते आणि गेल्या जन्मीचे भोग संपवण्यासाठी मनुष्य अथवा कोणत्याही योनीत जन्म घेऊन ते भोग पूर्ण करते....
साधी गोष्ट आहे, आजच्या आधुनिक जगतात जिथं सगळ्या सुख सुविधा सहज उपलब्ध आहेत अश्या काळात ही कित्येक लोक उपाशी मरतात, त्यांना समाजात प्रतिष्ठा नसते....
जन्माने कोणी श्रीमंत,गरीब, लहान, मोठा जन्माला येत नाही. पुरुष किंवा स्त्री कोणीही असो आपल्या कर्माने आपले भाग्य ठरवते. आणि सतकर्म करण्यासाठी मनुष्यासारखा प्रगत कुठला देह नाही, योनी नाही
आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे... तरीही स्त्रीवर्गाचा काही भाग वेश्याव्यवसायात आहे... का? त्यांना शिक्षणाच्या संधी नव्हत्या? उन्नतीचे मार्ग उपलब्ध नव्हते? पण या स्त्रियांचे हे गतजन्मीचे भोग आहेत जे ते मनुष्य योनी ला येऊन भोगत आहेत....
याचाच अर्थ आत्मा हा वासना एका देह कडून दुसऱ्या देहाकडे एका योनीतुन दुसऱ्या योनीत घेऊन जात असतो. आत्मा नश्वर आहे. याच एक उदाहरण महर्षी वाल्मिकी यांचं देता येईल....
आयुष्याच्या एका टप्प्यापर्यंत तो वाल्या कोळीच होता... रोज जाऊन शिकार करायचा हत्या, खून करायचा....
त्याला का नारदमुनी भेटावेत आणि वाल्याचा वाल्मिकी व्हावा जो पुढे जाऊन आदर्श जीवनपद्धती चे मानदंड ठरणारे *रामायण* लिहून अमरत्वाला प्राप्त झाला...
हा प्रत्येकाचा गेल्या जन्मीचे भोग असतात ते भोग संपले की मग तुमचे या जन्मीचे कर्म कारणी लागतात आत्मा पवित्र तेव्हाच असेल जेव्हा तुमची कर्म स्वच्छ असतील...
आणि
असा पवित्र आत्माच पुढच्या जन्मी चांगल्या योनीत जन्म देऊन या जन्मीच्या सत्कर्माची फळे देईल....
एकदा आत्मा नश्वर आहे हे मान्य केले की देह समजायला फार सोपा जातो...
आपले पूर्वजन्मीचे भोग भोगण्याचे माध्यम आणि या जन्मी काही सत्कर्म करण्याचे साधन म्हणून देहाकडे पाहिले पाहिजे....
देह साधन(tool)आहे साध्य(goal) नाही. हे एकदा मनाशी ठाम ठरवलं की मग देहदान वगैरे संकल्पना पचवायला सोप्या जातात...
आपले या जन्मीचे कार्य संपले की आनंदाने तृप्त मनाने देह ठेवावा....
देहदान हे पुण्यदान म्हणून समाजात बिंबवले पाहिजे...
तुमच्या देहाची त्यातील उपयोगी अवयवाचा उपयोग कोण्या गरजवंताला होईल...
त्या देहाचा उपयोग नवीन शिकणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थांना होईल...
जोपर्यंत तुम्ही वासनेत अडकून राहाल तोवर तुम्ही या ८४ लक्ष योनी आणि आत्मा देह याच्या फेऱ्यातून सुटणार नाही....
धन्यवाद!!!
- हर्षद मोहन चाफळकर,
पुणे-१४