Thursday, January 16, 2020

जन्मवेळ नक्की कोणती?- ज्योतिष विशारद हर्षद मोहन चाफळकर

जन्मवेळ नक्की कोणती???

माझ्या जन्मवेळ शुद्धीकरणाची फेसबुक पोस्ट पाहून एका महिलेने माझ्याशी संपर्क साधला .
जन्मतारीख, जन्मठिकाण नक्की माहीत आहे मात्र जन्मवेळ रात्री 1 ची की रात्री 2.30 हा गोंधळ आहे तर तुम्ही ती वेळ शोधून द्याल का?

मी म्हटलं प्रयत्न करतो.
मिळालेली माहिती अशी

स्त्री
19/9/1955
जन्मवेळ रात्री 1 ते 2.30 च्या दरम्यान 
अमरावती
इतर माहिती अशी 
👉लग्न 30 मे 1974 ला 
👉 पती(वृश्चिक/ अनुराधा)
👉प्रथम संतती 30 जानेवारी 1977
👉दुसरी संतती5 मार्च 1982
मला वेळ शोधण्यासाठी स्कोप फक्त दीड तासाचा होता. दीड तासातली नक्की वेळ कोणती?

RP घेतली ती वेळ

16/1/2020
18.51.18
पुणे

L कर्क-चंद्र
LS- शनी
S- हस्त-चंद्र
R- कन्या -बुध
D- गुरू

RP त गुरू आला मनाला जरा धीर आला की ये काम हो सकता है.

जरा प्राथमिक तयारी म्हणून मी वार तपासला तो इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे सोमवार होता आणि घेतलेल्या RP मध्ये चंद्र आहे. म्हणजे वार बरोबर आहे आपोआप तारीख ही बरोबर आहे.

आता दुसऱ्या टप्प्यावर दिलेल्या मर्यादांवर कोणती लग्ने आहेत ती बघितली

रात्री 1 वाजताचे लग्न - मिथुन/पुनर्वसू/शनी/शनी असे होते
आणि 
रात्री 2.30 वाजताचे लग्न- कर्क/पुष्य/चंद्र/बुध असे होते


आता अली का पंचाईत?

RP मधले सगळे ग्रह दोन्ही लग्नाच्या कॉम्बिनेशन मध्ये होते.
आता काय करायचं?

तीन पर्याय होते
कर्क/आश्लेषा/शनी/गुरू (रात्री 03वाजून50मिनिटे) दिलेल्या वेळेच्या मर्यादेपेक्षा खूप लांब होती म्हणून ❌
किंवा
कर्क/पुष्य/बुध/गुरु(रात्री 2 वाजून 7 मिनिटे 30 सेकंद) ही वेळ दिलेल्या मर्यादेत होती पण माझे मन शनी ला नक्षत्रस्वामी म्हणून न बसवता त्याला उपनक्षत्रस्वामी ठिकाणी बसव असे सांगू लागले. अखेर मी कर्क लग्नाचा पर्याय सोडून दिला आणि पुन्हा मिथुन लग्नावर आलो

आता मी बसवलेलं कॉम्बिनेशन असे
मिथुन/पूनर्वसू/शनी/चंद्र
ही वेळ आली रात्री 1 वाजून 4 मिनिटे 55 सेकंद

आता चंद्र सब थिअरी वापरू
1.लग्नाचा सब शनी तूळेत चंद्रबरोबर आहे✅
2. सप्तमाचा सब शनी पतीच्या चंद्राचा नक्षत्रस्वामी आहे✅
3. लग्न झाले त्यावेळी 
राहू महादशा(5,8,9)
चंद्र अंतर्दशा(3,5,12)
केतु प्रत्यंतर दशा(5,8,9) 5वे, 8वे स्थान विवाहाला पूरक आहे.✅
4. पहिली संतती झाली तेव्हा 
गुरू महादशा (2/7,10)
गुरु अंतर्दशा (2/7,10)
शुक्र प्रत्यंतर दशा(3,5,12)
2,5 ही स्थाने संततीस पूरक आहेत.✅
5. दुसऱ्या संतती वेळी 
गुरू महादशा(2/7,10)
बुध अंतर्दशा(5/8,9)
गुरू प्रत्यंतर दशा(2/7,10)
2,7 ही स्थाने दुसऱ्या संततीस पूरक आहेत.✅

अश्या रीतीने  जन्मवेळ कोणती हे शोधता आले.
✒ हर्षद मोहन चाफळकर
ज्योतिष विशारद, पुणे

Wednesday, January 15, 2020

जन्मवेळ शोधणे एकाची नाही दोघांची- ज्योतिष विशारद हर्षद मोहन चाफळकर

जन्मवेळ शोधणे एकाची नाही, दोघांची...🤔🤔

माझ्या परिचयातील एका व्यक्तीने माझ्याशी संपर्क साधला...
"आम्हा पती-पत्नीची जन्मतारीख आणि जन्मठिकाण माहीत आहे मात्र वेळ नक्की माहीत नाही त्यामुळे बाकी कोणतीच गोष्ट बघता येत नाही. दोघांचीही वेळ शोधता येईल का?"

मला एकाची वेळ शोधण्याचा अनुभव होता मात्र दोघांचीही काढायची म्हटल्यावर मला थोडा घाम फुटला म्हटलं वेळ लागेल, दैवी इच्छा असेल तर नक्की शनिवार(11जानेवारी2020 पर्यंत) कळविन म्हणून  सोडून दिले. पण मला काही केल्या शनिवार पर्यंत वेळ मिळाला नाही शाळेच्या परीक्षा, दहावी प्रिलीम सगळं सूरु असताना हा विषय मागे ठेवला.

सांगितलेल्या वेळेत मला काम न करता आल्याचं बोचत होतं... काल संध्याकाळी शाळेने अचानक मकर संक्रांतीची सुट्टी जाहीर केली. मला थोडा मोकळा वेळ मिळाला होता.

मिळालेली माहिती अशी

पुरुष
9 मार्च 1977(बुधवार)
सकाळी???(रवि RP त आहे😇)
अमरावती

स्त्री
5 डिसेंम्बर 1979(बुधवार, बुध RP त आहे😇)
पहाटे 5 च्या आसपास(बरं वाटलं, किमान एक तरी कुंडली नीट सुटेल)
नागपूर

मी RP घेतले ती वेळ
15 जानेवारी 2020
10.00.21
पुणे

आलेले RP
#L: कुंभ(शनी) लग्नात शुक्र
#LS: शततारका(राहू) राहुवर शनी,गुरू, मंगळ ची दृष्टी
#S: उत्तरा फाल्गुनी(रवि)
#R: सिंह(रवि)
#D: बुध

म्हटलं ज्याची अंदाजे वेळ माहिती आहे त्याला मार्गी लावू.

स्त्रीने दिलेली सकाळी 5 ची नागपूर स्थित कुंडली मांडली. तूळ लग्न सुरू होतं RP त शुक्र लग्नी आहे...👍👍👍

मग तूळ लग्नच निश्चित केले त्यात मंगळ, राहू, गुरू ची नक्षत्रे येतात मंगळाचे नक्षत्र घेतले तर सांगितलेल्या 5 वाजता पेक्षा फार लांब होते. राहूचे पण नक्षत्र फार मागे जाईल म्हणून गुरू चे नक्षत्र, शनी सब आणि बुध सब सब सेट केला

In short
तूळ/ विशाखा/ शनी/बुध

ती वेळ आली सकाळी 04वाजून 40मिनिटे 21सेकंद

आता चंद्र सब थिअरी
लग्नाचा सब शनी त्याची चंद्रावर 10वी दृष्टी आहे.✅

स्त्रीच्या कुंडलीत सप्तमाचा सब शनीच आहे त्या शनी ची पतीच्या कुंडलीत पतीच्या चंद्राचा राशीस्वामी(तूळ) शुक्रावर दहावी दृष्टी आहे.✅

आता अवघड प्रकरण सोडवू या 

पतीची वेळ फक्त सकाळी एवढीच माहिती आहे.

9 मार्च 1977 चा अमरावती चा सूर्योदय सकाळी 6.33 चा होता त्यामुळे सकाळी 6.33 ते दुपारी 12 पर्यंत विचार करणे भाग होते

दुसरा टप्पा त्यादिवशी ची लग्ने तपासली
ती खलील प्रमाणे
कुंभ 05.16 am -6.56 am(शनी)
मीन 6.56am - 8.24 am(गुरू)
मेष 8.24am - 10.06am(मंगळ)
वृषभ 10.06am - 12.05 pm(शुक्र)

RP त चारही ग्रह आहेत आता काय करायचं?

सोपं केलं बलवान शनी चे कुंभ च लग्न घेतलं

त्यात मंगल,राहू,गुरू ची नक्षत्र

राहू LS होऊन आलाय त्यामुळे त्याचेच नक्षत्र घेतले गुरू सब आणि रवी सब सब

आलेला SEQUENCE असा

"कुंभ/शततारका/गुरू/रवि"

वेळ आली सकाळी 05 वाजून 49 मिनिटे 43 सेकंद

आता चंद्र सब थिअरी ने तपासू 
लग्नाचा सब गुरू वृषभेत आहे, शुक्र चंद्राचा राशीस्वामी आहे.✅

पुरुषाचा सप्तमाचा सब शनी आहे जो पत्नी च्या कुंडलीत कन्या राशीत आहे. बुध पत्नीचा राशीस्वामी आहे✅

अश्या रीतीने जन्मवेळ सिद्ध करण्याचा प्रयत्न केला...🙏🙏

Thursday, January 9, 2020

घोरबंद केसस्टडी

जातकाचा एमडी चा निकाल साधारण आपण मार्च पर्यंत लागेल असा गृहीत धरूया.

निकाल कसा लागेल हे सांगण्यासाठी परीक्षा देताना दशा कश्या होत्या त्या बघितल्या पाहिजेत.
परीक्षा देताना जर दशा अनुकूल असतील तर निकाल आपोआप चांगला लागतो 
जातक म्हणाल्या की परीक्षा गेल्या महिन्यात झाली आहे. 
परीक्षा देताना जातकाला 
गुरू/राहू/ चंद्र अशी दशा सुरू होती


आता गुरू , राहू, आणि चंद्र तिघेही उपनक्षत्र पातळी ला 2,8,11 दाखवतात 
एमडी उच्च शिक्षण आहे.
उच्चशिक्षणासाठी 9 वे स्थान पाहिजे. परीक्षेसाठी 6 वे स्थान पाहिजे 
महादशा अंतर्दशा प्रत्यंतर दशा तिघेही कुठे ना कुठे तरी 6,11 असा sequence जुळवतायत पण त्यामध्ये कुठे कुठे 8,12 वे स्थान पण लागलंय म्हणजे काही पेपर बाबत चिंता असावी.
तर एकूण पाहता निकालाची काळजी करावी अशी काही परिस्थती दिसत नाही कारण ग्रहांचे कार्येशत्व सिद्धीस नेणारे उपनक्षत्र स्वामी या पातळी ला गुरू तिन्ही ग्रहांचा कार्येशत्व ताब्यात घेतोय आणि 11 वे स्थान ऍक्टिव्ह करतोय म्हणजे निकाल कितीही टेन्शन वाटत असेल तरी चांगला✅ लागण्याची शक्यता आहे.

 आता सरकारी नोकरी चे प्रयत्न आणि त्यात यश
सरकारी नोकरी साठी 
6,10,11 ही स्थाने ऍक्टिव्ह पाहीजेत आणि रवी, मंगळ यांसारखे अधिकार देणारे ग्रहांनी ती स्थाने ऍक्टिव्ह केली पाहिजेत.

आता मार्च 2020 नंतर शनी महादशा सुरू होईल. ती 19 वर्षे आहे म्हणजे तिचा फार विचार करून उपयोग नाही 
अंतर्दशा तपासू
शनी नक्षत्रस्वामी पातळीवर 6 आणि उपनक्षत्रस्वामी पातळीवर 11 ऍक्टिव्ह करतो. म्हणजे याच काळात शनी अंतर्दशा संपण्याच्या आधी सरकारी नोकरी लागण्याचा चान्स आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे तो काळ *मार्च2022 ते मे 2022* च्या दरम्यान होताना दिसतो. नोकरी सहजासहजी मिळणार नाही अडथळे येऊ शकतात 2,8 लागतंय म्हणजे कदाचित टेबलाखालून व्यवहाराची शक्यता दिसते.तयारी असेल तर रक्कम मोठी मोजावी लागू शकते. मनस्तापाची शक्यता आहे. (सरकारी नोकरीसाठी वयाची मर्यादा असते. ती तुमच्या बाबतीत किती धरायची हा प्रश्न माझ्या समोर आहे. कारण आता चाळीशी आलेली आहे. दिलेल्या काळात आपले वय 42 सुरू असेल.) 
माझ्या अभ्यासप्रमाणे मी कालावधी सांगितला. त्याआधी योग जुळून यावा ही दत्त चरणी प्रार्थना🙏

बाकी इतर ग्रुप वरचे तज्ञ लिहितील..

🙏 *श्रीदत्तात्रयर्पणमस्तू*🙏

ग्रहांच्या उच्च नीच राशी

माझ्याच ग्रहांच्या उच्च नीच राशी संदर्भात ग्रहपरत्वे विश्लेषण करू इच्छितो

#रवी: मेषेत उचीचा कारण मेषेत रवी चे गुण असलेले नेतृत्व, अभिमान, आरोग्य यास व मिळतो, तोच तुळेत नीचीचा कारण तूळ हा बॅलन्स आहे, पडत नंत हे सहज घेतात म्हणून रवी तुळेत नीचीचा

#चंद्र: वृषभेत उचीचा कारण चंद्र मनाचा तसेच कलेचा कारक, वृषभेत चंद्राला वाव आहे, वृश्चिकेत नीचीचा कारण चंद्रसरख्या मनस्वी ग्रहाला, वृश्चिकेचा तामसी, खुनशी स्वभाव मानवत नाही

#मंगळ: मंगळ कर्केत नीच कारण मंगळाचा रंगडेपणाला कर्केत वाव नाही, तोच मकरेत उचीचा कारण मकर सारख्या lathergic, काहीश्या कंटाळवाण्या राशी ला एक प्रकारचे ऊर्जा देतो

#बुध: कन्येत उचीचा कारण बुध हा माहिती, चिकित्सा हिशोब, व्यापार चा कारक आहे, कन्येत त्याला उत्तम वाव आहे मीनेत नीचीचा कारण बुधला देव भोळेपणा, बाबा वाक्यम प्रमाणम मेनी नाही म्हणून मीनेत नीच

#गुरू: कर्केत उचीचा गुरुच्या ज्ञान यज्ञाला कर्केसारख्या सुबकचित्त राशीत बरे वाटते मात्र मकरेत तोच गुरू हतबल होतो

#शुक्र: शुक्र रसिकतेचा, विलासी वृत्तीचा कारक आहे, अश्या शुक्राला कन्येचे चिकित्सा मान्य नाही, तोच शुक्र मीनेत उचीचा होऊन उच्च प्रतीच्या आध्यत्मिक अनुभव देतो

#शनी: तूळेचा बॅलन्स, नम्रता, शनीला मानवते म्ह्णून तुळेत उचीचा, मेषेचा अविचारी, आरपार मनोवृत्ती शनी ला मान्य नाही म्हणून मेषेत नीचीचा

#राहू: राहू हा भोगवादाचा कारक आहे त्याला मिथुनसारख्या वयव्हर चतुर राशीत उत्तम वाव आहे तोच धनु सारखया कर्माला धर्माची साथ देणाऱ्या राशीत प्रभावहीन होतो

#केतू: केतू अध्यात्माचा कारक आहे, धनू सारख्या कर्माला धर्माची साथ देणाऱ्या राशीत चांगले फळ देतो, मिथुनेत प्रभावहीन होतो.

#हर्षल: आधुनिक ज्योतिषशास्त्रात हर्षल हा कुंभेचा राशीस्वामी मानला आहे, हर्षलचा शास्त्रीय दृष्टिकोन आणि कुंभेची सखोल ज्ञानाची आसक्ती चांगली जुळते.

#नेपच्यून: आधुनिक ज्योतिष्यात नेपच्यून मीनेचा राशीस्वामी मानला आहे, नेपच्यून ची ज्ञान पलीकडची गूढ वाचसिद्धी मीनेत दिसते

#प्लूटो: हा समूहाचा कारक आहे तो वायू राशी (मिथुन, तूळ,कुंभ) मध्ये चांगले फळ देतो.
 
#नोंद: ग्रहांची उच्च नीच राशी लक्षात ठेवण्याचा सोपा नियम जो ग्रह ज्या राशीत #उच्च तिथून #सातव्या राशीत #नीच

espncricinfo प्रश्न

मी विचारलेला प्रश्न espncricinfo वर प्रकाशित झाला