आज यां ठिकानी आजच्या यां शुबमुर्ता वर पीशी /लॅपटॉप वर मराटीत कसं टायपायचं त्ये सांगतो..
समद्या जगाला ठाव हाय पर आज पुंन्यादा उजळणी होऊंदे..
तर खालती दिलेल्या इष्टेप फालो केल्यास्नी तुमी समदे someday नक्की मराटीत टायपाल याची मला खातरी हाय....
तर त्या इष्टेप खालील परमाण...
1️⃣सगळ्यात पैल्यान्दा आपला पीशी /लॅपटॉप चालू करायच म्हंजी बंद असलं झोपला असल तर त्याला चालू करायचा...
2️⃣ मंग आपला पीशी / लॅपटॉप ला विंटरनेट (म्हंजी वायफाय, डोंगल असं काय तरि) जोडलेलं हाय ना ब्वा याची खात्री करायची
3️⃣ तिसऱ्या इष्टेप ला गुगल बाबा खोलायचा अन त्याला google input tool marathi शोधायला लावायचं....
4️⃣ गुगल बाबा झटक्यात तुम्हास्नी एकं .exe फाईल ची link दिल. ज्यांना नाय सापडली त्यांनी इथं बोटं टेकवा
5️⃣ ही फाईल जी हाय ती तुमच्या डाउनलोड्स किंवा ड्राइव्ह मदी जाऊन पडल..
6️⃣ तिथं जाऊन ही फाईल उघडा अन इन्शटाल करा.
7️⃣ इन्शटाल केल्यावर मंग तुमच्या पीशी /लॅपटॉप च्या शेटिंग मदि घुसा
8️⃣ शेटिंग मदी language setting ला जा अन तिथं जाऊन add language करा.
9️⃣ add language मदी Marathi शोधा. तिथं मराठी यील तिला add करा.
🔟 add करायला ती काही मिनिटं घील. घिऊ द्या आपल्याला कुटं लढायला जायचं हाय. तोपर्यंत पाणी प्या शास घ्या..
1️⃣1️⃣ मराठी add झाल्यावर आता तुमच्या डेक्सटाप ला यां. तिथं खाली टाक्सबार असन. त्याच्या उजव्या खालच्या कोपऱ्यात *EN* दिसल
1️⃣2️⃣ मंग काय करा इंडोस🪟 आणि इस्पेस बार संग दाबा तुमाला ते *EN* लगीच *MR म* झालेलं दिसल.
1️⃣3️⃣ आता तुमी माय क्रो साफ्ट वर्ड उघडा. जवा मराठीत टायपायचं असन तवा *MR म* अन जवा विंग्रजीत टायपायचं असन तवा *EN* संपला ना इशय.. खटक्यात विंग्रजी खटक्यात मराठी...
समस्त मराठी माणसाला मराठी टायपिंग च्या सुबेच्या🎉🎉🎉💐💐💐
_*हाय काय नाय काय*_
No comments:
Post a Comment