बिथरली कोटी मुले झुक्या तुझ्या जन्मामुळे
एक mutual ने मिळती लाखो मैत्रिणी
जुळतात त्याच्याने संसार तुझ्या अँपवरती
अंधार दूर तो पळे, झुक्या तुझ्या जन्मामुळे
टुक टुक चाले हातातील मोबाईल यंत्र
नाद सुटतो तू ठोकताच restriction चा दंड
झाले गुलाम सगळे, झुक्या तुझ्या जन्मामुळे
सुखी समाधानी तैसाच होता समाज
प्रसिद्धी ची हाव अन कल्पकतेचे धुमारे
आज पडती इंस्टाची रिळे, झुक्या तुझ्या जन्मामुळे
काल कवडीमोल जीणे हर्षाचे होते
आज जुळे जगताशी हास्याचे नाते
Onlineकडे जग हे वळे, झुक्या तुझ्या जन्मामुळे
मस्तच 😁
ReplyDeleteधन्यवाद
Delete