निवडणुकीच्या काळातील राजकीय पक्षाचा कार्यकर्त्याला काय करावं लागतं याचं हे विडंबन...
मूळ कवी: मंगेश पाडगावकर
दिवस तुझे हे फिरायचे
नेत्यामागुनी हिंडायचे..
उन्हात भटकत जाणे,वाटेत मिळते खाणे
उन्हात भटकत जाणे,वाटेत मिळते खाणे
खाण्यात मन हे रमवायचे
खाण्यात मन हे रमवायचे
दिवस तुझे हे फिरायचे
नेत्यामागूनी हिंडायचे...
मोजावी नोटांची खोकी,वाटावी ती गल्लोगल्ली
मोजावी नोटांची खोकी,वाटावी ती गल्लोगल्ली
वाटत मतदान मोजायचे
वाटत मतदान मोजायचे
घशाला कोरडी तहान,सोसेना उन्हाचा दाह
घशाला कोरडी तहान,सोसेना उन्हाचा दाह
बिसलेरी रिकामी करायचे,बिसलेरी रिकामी करायचे
दिवस तुझे हे फिरायचे
नेत्यामागूनी हिंडायचे...
आमच्या या सोसायटी पाशी,
थांबा हो नेते जराशी
आमच्या या सोसायटी पाशी,
थांबा हो नेते जराशी
पप्पांना भेटून बोलायचे
पप्पांना भेटून बोलायचे
तुमच्याबरोबर सेल्फी काढायचे...
दिवस तुझे हे फिरायचे
नेत्यामागूनी हिंडायचे...
दिवस तुझे हे फिरायचे
नेत्यामागूनी हिंडायचे...
हर्षद मोहन चाफळकर, पुणे
१५०५२०२४२०००