#लोकसभा2024
#विडंबन
#होलीहै
मूळ गीत: काटा रुते कुणाला??
मूळ कवयत्री : शांता शेळके
जागा सुटे कुणाला
जागा सुटे कुणाला, आनंदतात कोणी
मज चिन्ह ही न मिळावे हा दैवयोग आहे
सुटे कुणाला, जागा सुटे कुणाला
सांगू कसे कुणाला
सांगू कसे कुणाला गणिते जागावाटपाची
पक्षाला बंडखोरीचा मग श्राप हाच आहे
सुटे कुणाला, जागा सुटे कुणाला
जागा सुटे कुणाला
तिकिटाची मागणी करु पहातो,
पोहोचतो तिसराच तेथे
माझी पक्षनिष्ठा ही कुचकामी ठरत आहे
कुचकामी ठरत आहे
मज चिन्ह ही न मिळावे हा दैवयोग आहे
सुटे कुणाला, जागा सुटे कुणाला
जागा सुटे कुणाला, आनंदतात कोणी
मज चिन्ह ही न मिळावे हा दैवयोग आहे
सुटे कुणाला, जागा सुटे कुणाला
✒️ ह मो चा ( #चाफळCurry)
२५०३२०२४११४९
No comments:
Post a Comment