आज कॉलेजात अकरावी चा #Sociology चा वार्षिक परीक्षेचा पेपर होता, मी ब्लॉक वर सुपरव्हीजन ला होतो..
प्रश्नकर्त्या मास्तराने Functions of family यावर दिर्घोत्तरी (आर्टस् चा दिर्घोत्तरी)प्रश्न विचारला होता..
एक मुलगा #म्हंजी???🤔🤔 अश्या प्रश्नार्थक वजा आश्चर्याचा नजरेने बघत होता.....
म्हटलं चला जरा तेवढाच आपलीच revision करून घेऊ... (बी. एड ला असताना #Sociology चा एक पेपर असल्याचे स्मरते...)
त्याला म्हटलं एखादे कुटुंब काय काय करते ते सविस्तर लिही..
तरी त्याच्या डोक्यात प्रकाश पडेना..
म्हटलं लिही..
1. पोरं जन्माला घालणे (#reproduction)
एवढंच सांगितलं तर पोराचा चेहरा खुलला (अच्छा हे होय, या भावनेने.. शेजारच्या Science च्या पोरीचा योगायोगाने #Biology चा पेपर होता...)
म्हटलं थांब घाई करू नको, पुढचं ऐक..
2. Socialization
3. Social Identity
4. Economic support
5.Emotional and practical support..
6.....
"बस्स सर कळलं"..
छापतो चार पानं...
#हाय_काय_नाय_काय या सदरातून...