Wednesday, November 1, 2023

WPL: भारतीय महिला क्रिकेट चे भविष्य

क्रिकेट.. तसा बऱ्यापैकी राष्ट्रकुल देशांमध्ये पसरलेला आणि विशेष करून भारतीय उपखंडात धर्म म्हणून ओळखला जाणारा खेळ... ही लोकप्रियता या उपखंडात ल्या विक्रमवीर खेळाडूंमुळे आली असं म्हणता येईल.. पण  "जेटलमन्स गेम" म्हणून ओळखला जाणारं क्रिकेट जर महिला खेळायला लागल्या तर???
आज याच महिला क्रिकेटची आणि महिला क्रिकेट मधील लेटेस्ट अट्रॅक्शन ठरलेल्या WPL विषयी आपण चर्चा करणार आहोत...
तत्पूर्वी  भारतातल्या महिला क्रिकेट चा थोडा मागोवा घेऊ या म्हणजे मग आपल्याला WPL चे महत्त्व कळेल..
सूरुवात: भारतीय पुरुषांचा क्रिकेट संघ जसा १९३२ पासून कसोटी क्रिकेट खेळतोय अगदी त्याच वेळेपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे महिला क्रिकेट खेळत आले आहेत.. पण भारत पहिला महिला कसोटी खेळायला १९७६ साल उजडावं लागलं.. तो पहिला महिला कसोटी सामना झाला भारतीय महिला आणि वेस्ट इंडिज च्या महिला संघ यांच्या मध्ये.. १९७६ पासून आजवर फक्त ३८ कसोटी सामने भारतीय महिला संघ खेळला.. या सगळ्या गोष्टींना थोडी संघटनात्मक बांधणी मिळावी म्हणून पुण्यात १९७३ साली वुमेन्स क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया (WCAI) ची स्थापना झाली आणि प्रेमलाकाकी चव्हाण (माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आई) पहिल्या अध्यक्ष झाल्या.. तेव्हा पासून २००६/०७ पर्यंत हीच WCAI भारतीय महिला क्रिकेट ची धुरा वाहत होती २००६/०७ मध्ये WCAI चे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(BCCI) मध्ये विलीनीकरण झाले..
विष्वचषकातील कामगिरी: आजवर भारतीय महिला संघ १९७५ चा विश्वचषक वगळता सर्व विश्वचषकात सहभागी झाला २००५ व २०१७ मध्ये उपविजेता ठरला..
यावेळी अनेक महिला क्रिकेटपटूंनी नावलौकिक मिळवला लोकप्रियतेच्या बाबतीत डायना एडलजी, शुभांगी कुलकर्णी, शांता रंगस्वामी, अंजुम चोप्रा, मिताली राज, झुलन गोस्वामी, आजच्या काळातल्या हरमनप्रित कौर, जेमीमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, स्मृती मांधना इत्यादी गाजल्या...
नियमित सामने: BCCI मध्ये विलीनीकरण झाल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट केंद्रस्थानी येऊ लागला दरवर्षी महिला क्रिकेटपटूना वार्षिक काँट्रॅक्टस मिळून नियमित निश्चित उत्पन्न आणि आर्थिक प्रश्न मार्गी लागले. महिला क्रिकेट अधिक व्यावसायिक रित्या सांभाळल जाऊ लागलं महिला क्रिकेट मधील ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज यांच्याशी नियमित सामने होऊ लागले नियमित सामने आणि आर्थिक शाश्वती यामुळे महिला अधिक मन लावून खेळू लागल्या नकळत खेळाची गुणवत्ता सुधारली.. 
WPL ची गरज: दरम्यान च्या काळात २००९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) कडून नियमित टी२० विश्वचषक आयोजित केला जाऊ लागला याकरणाने महिलांना टी२० प्रकारचा अधिक सराव मिळावा म्हणून भारतात IPL च्या धर्तीवर महिलांची IPL सुरू व्हावी म्हणून मागणी जोर धरू लागली..  IPL च्या यशाने आणि IPL चा भारतीय क्रिकेट वर झालेला सकारात्मक परिणाम, तळागळातून सापडलेले नवनवीन खेळाडू आणि छोट्या छोट्या गावातून तयार झालेले टॅलेंट ही IPL ची भारतीय क्रिकेट ला देणगी आहे. तसाच प्रयोग महिला क्रिकेट मध्ये व्हावा, क्रिकेट महिलांना करियर ऑप्शन व्हावा यासाठी WPL चा प्रयोग गरजेचा होता.
हे सगळं घडून येण्यासाठी एक घटना किंवा ट्रिगर पॉईंट गरजेचा होता. तो आला २०१७ च्या महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकात. हरमनप्रित कौर हिने २०१७ च्या त्या विश्वचषकात ऑस्ट्रेलिया विरुद्ध सेमी फायनल मध्ये नाबाद १७१ धावांची अविस्मरणीय खेळी केली आणि महिला क्रिकेट भारतात सेंटर स्टेज घेतलं... महिला क्रिकेट अधिक आवडीने पाहिले जाऊ लागले. मीडिया, मार्केट, मनी, सगळ्यांच्या मुखी भारतीय महिला क्रिकेट होते. हीच संधी साधून BCCI ने पहिल्यांदा २०१८ मध्ये प्रायोगिक तत्वावर वूमेन्स टी२० चॅलेंज ही IPL ला लागून प्रदर्शनीय सामना स्वरूपात सुरू केली. 

वूमेन्स टी२० चॅलेंज: भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू दोन संघात अनुक्रमे हरमनप्रित कौर च्या नेतृत्वात  सुपरनोव्हा आणि स्मृती मंधना च्या नेतृत्वात ट्रायलब्लेझर्स  मध्ये विभागल्या गेल्या. आणि एकच सामना २०१८ साली चॅलेंज स्पर्धेसाठी खेळवला गेला. त्यात सुपरनोव्हाज ने सामना जिंकला आणि पहिल्या टी२० चॅलेंज करंडकावर आपले नाव कोरले..
२०१९ मध्ये टी२० चॅलेंज स्पर्धा तीन संघापर्यंत विस्तारली गेली आणि व्हेलोसिटी हा नवीन तिसरा संघ यात सामील झाला दुसऱ्या सिझन मध्ये पुन्हा एकदा सुपरनोव्हाज ने बाजी मारली आणि एक प्रदर्शनीय सामना म्हणून सुरू झालेली टी२० चॅलेंज स्पर्धा आता रीतसर साखळी आणि अंतिम सामना या प्रकारात खेळली गेली. या वुमेन्स टी२० चॅलेंज ची आणखी एक खासियत म्हणजे यात IPL सारखेच परदेशी खेळाडू देखील या संघांचे भाग होते..डिअन्द्रा डॉटिन, सून लस, अलाना किंग, सोफी एक्लस्टन, ली तुहुहू, चमारी अट्टापट्टू, आयबोंगा खाका, डॅनी व्यात, मेगन शूट, एलिस पेरी, सोफी डिव्हाईन, मेग लॅनीन आदी परदेशी खेळाडूंचा सहभाग होता.. २०२० मध्ये चॅलेंज स्पर्धा कोविड काळात संयुक्त अरब अमिराती मध्ये झाली पुन्हा तिन्ही संघ सुपरनोव्हाज, ट्रायलब्लेझर्स, व्हेलोसिटी लढले आणि २०२० मध्ये ही स्पर्धा पहिल्यांदा ट्रायलब्लेझर्स ने जिंकली.. २०२१ मध्ये स्पर्धा कोविड च्या कारणास्तव पुढे ढकलली गेली आणि अखेर ती स्पर्धा २०२१ मध्ये झालीच नाही.
२०२२ च्या स्पर्धेच्या वेळी BCCI ने आणखी नियोजनबद्ध काम करून IPL आणि चॅलेंज स्पर्धा एकत्र खेळवण्याचा प्रयोग केला जो यशस्वी झाला. पुरुषांच्या सामन्याधी महिलांचा सामना व्हायचा.. २०२२ च्या मोसमात सुपरनोव्हाज आणि व्हेलोसिटी मध्ये अंतिम सामना झाला आणि त्यात विक्रमी तिसऱ्यांदा सुपरनोव्हाज विजयी ठरले. याच दरम्यान अधिकृत WPL ची चाचपणी सुरू झाली होती आणि सौरव गांगुली यांच्या अध्यक्षते खाली WPL ची पहिली स्पर्धा २०२३ मध्ये IPL च्या साथीने खेळवली जाईल अशी घोषणा झाली..

WPL चा आरंभ: तीन- चार मोसम चॅलेंज स्पर्धा आणि वाढती लोकप्रियता पाहून BCCI ने WPL चा घाट क
घातला अगदी गेली १६ वर्ष यशस्वी IPL संयोजनाचा अनुभव गाठीशी असल्याने WPL देखील IPL च्या पावलावर पाऊल टाकत फ्रांचाईज क्रिकेट मॉडेल वर सुरू झाले. पाच क्रिकेट संघांसाठी बोली लावली गेली त्यात दिल्ली कॅपिटल्स, युपी वॉरीयर्स, गुजरात जायंट्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर बंगलोर यांनी बोली जिंकल्या आणि हे संघ प्रस्थापित झाले..
टी२० चॅलेंज मधील सर्व खेळाडूंचा पुन्हा एकदा लिलाव पद्धतीने संघबांधणी झाली त्यात स्मृती मंधना या भारतीय खेळाडूला ३.४० कोटींची सर्वाधिक बोली रॉयल चॅलेंजर बंगलोर ने लावली आणि तीच संघाची कर्णधार झाली आणखी काही लक्षवेधी बोली मध्ये, हरमनप्रित कौर १.८० कोटी, दीप्ती शर्मा, जेमिमा रोड्रीग्ज यांना युपी वॉरियर्स ने २.८० कोटी ची बोली लावली, परदेशी खेळाडूंमध्ये आश्ले गार्डनर आणि नताली स्कायव्हर ह्या सर्वात महागड्या परदेशी खेळाडू ठरल्या...
WPL चा थरार: पाच संघ एकमेकांशी प्रत्येकी दोन सामने खेळणार असा स्पर्धेची रचना होती. टॉप तीन संघ प्ले ऑफ मध्ये व टॉपर संघ थेट अंतिम सामना खेळेल या नियमात स्पर्धा मुंबई च्या डी. वाय पाटील स्टेडियम, ब्रेबॉन स्टेडियम येथे खेळले गेले. स्पर्धा चांगली च चुरशीची झाली. एकवेळ अशी होती स्पर्धेच्या मध्यात की कोणताही एक संघ प्ले ऑफ साठी पात्र होईल असे खात्री ने सांगता येत नव्हते मात्र दुसऱ्या उत्तरार्धात, मुंबई, दिल्ली आणि युपी यांनी जम बसवला आणि प्ले ऑफ ला पात्र झाले, दिल्ली कॅपिटल्स टेबल टॉपर म्हणून थेट अंतिम फेरीत पोहोचले तर मुंबई आणि युपी मध्ये क्वालिफायर सामना झाला. या सामन्यात एलिसा हिली आणि  ताहिली मॅकग्रा यांच्या खेळामुळे युपी वॉरियर्स ने प्रथम बॅटिंग करताना ६ बाद१३८ धावा केल्या.. उत्तरादाखल मुंबई इंडियन्स ने मेग लॅनिन, एलिस कॅप्सी, मॅरिझन कॅप्प यांच्या जोरावर आव्हान सहज पार केले..
२६ मार्च २०२३ रोजी अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स चा सामना दिल्ली कॅपिटल्स शी मुंबई च्या ब्रेबोर्न स्टेडियम वर झाला. पहिल्यांदा बॅटिंग करताना दिल्ली कॅपिटल्स ने २० षटकात ९ बाद १३१ धावा केल्या त्यात मेग लेनिन च्या ३५ आणि राधा यादव च्या २७ धावांचा मोठा वाटा होता..
धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स यांनी नताली स्कायव्हर च्या ६० आणि कर्णधार हरमनप्रित कौर च्या ३७ धवांच्या आधारे १३२ धावांचे आव्हान लीलया पार करून पहिल्या WPL च्या विजयी संघ होण्याचा मान मिळवला..
या WPL च्या प्रयोगामुळे भारतातील महिला क्रिकेट अधिक आकर्षक, लक्षवेधी आणि स्पर्धात्मक झाले..

No comments:

Post a Comment

espncricinfo प्रश्न

मी विचारलेला प्रश्न espncricinfo वर प्रकाशित झाला