माझी एक खंत आहे...
भारतात शेन वॉर्न च्या जातकुळीतला फिरकी गोलंदाज झाला नाही आणि येत्या काही दशकात होताना पण दिसत नाही...
माझा मुख्य रोख मनगटी फिरकी गोलंदाज (मराठीत त्याला wrist spinner अस म्हणतात)असा आहे...
शेन वॉर्न ने 1993 साली भारताविरुद्ध सिडनीत पदार्पण केलं तेव्हा पासून त्याच आणि भारताचं अनोखं नातं जुळलं भारतीयांनीच त्याला लीलया खेळून त्याची पिसे काढली.. तेंडुलकर ने रातोरात त्याचा निद्रानाश केला सुरुवातीच्या काळात शास्त्री, कांबळी या मुंबईच्या खेळाडूंनी त्याला स्थिरावण्यास वाव दिला नाही पुढे येऊन भिरकावून लावला... नंतर द्रविड, लक्ष्मण हे त्याचे हाडवैरी झाले....
तरीही तो 708 कसोटी बळी घेऊन सर्वाधिक बळी मिळवण्याच्या यादीत मुरलीधरन च्या नंतर दुसरा आहे...
वॉर्न च्याच कारकिर्दीत ऑस्ट्रेलिया कडून स्टुअर्ट मॅकगील कायम वॉर्न च्या सावलीत राहिला वॉर्न च्या अनुपस्थितीत मुख्यत्वे खेळला पण त्याने सुद्धा संधी मिळताच लेग स्टंप वर मारा करत ऑफ स्टंप कडे हातभार वळणारा आक्रमक गोलंदाजी केली... क्लासिकल लेग स्पिनरच दोघे!!!
या दोघांच्या समकालीन भारताकडे कुंबळे, पाकिस्तानकडून दानिश कनेरिया एवढेच लेग स्पिनर होते इतर देशात लेग स्पिनर मला आठवत नाही!!!!
मुळात क्लासिकल लेग स्पिन (wrist spin) ही अवघड कला आहे... इतर ऑफ स्पिनर (finger spinner) च्या तुलनेत wrist spinner चा चेंडूवरील नियंत्रण किंचीत कमी असते... फ्लाईट, जास्त स्पीड कमी..
पडला तर फुल लेंग्थ, नाहीतर हाफ ट्रॅकर अशी अवस्था असते...म्हणून शक्यतो कोणी wrist spin च्या भानगडीत पडत नाही आणि आता T20 च्या झटपट जमान्यात कोणाला एवढा वेळ आहे फ्लाईट देऊन बॅट्समन ला हवेत चकवून सिक्स मारण्याचे अमिश दाखवून बाऊंडरी वर झेलबाद करायचं किंवा मागे विकेटकीपर कडून दांडी उडवायची???
आता T20 च्या जमान्यात सगळे स्पिनर शक्यतो विकेट टू विकेट मारा करतात त्याला बचावात्मक गोलंदाजी म्हणतात.. फार फार तर काय हाताच्या मागच्या बाजूने बॉल रिलीज करून गुगली टाकायची...
आयपीएल आता सुरू झाली आहे.. आठही संघातले लेग स्पिनर शोधा आणि लक्ष ठेवा त्यांच्याकडे 24 बॉल पैकी निम्मे बॉल गुगली टाकणार विकेट टू विकेट मारा करणार..
एखादा अमित मिश्रा ऑफ स्टंप वर बॉल टाकून फ्लाईट देण्याचं धैर्य दाखवेल बाकी बहुतेक लोकं गुगली नाहीतर विकेट वर बॉल...
पाकिस्तान चा यासीर शहा स्पिन करतो पण तो तितकासा फ्लाईट देताना मी बघितला नाही!!!
लेग स्पिनर हा जुगारी असतो... आपल्याकडे असणाऱ्या फ्लाईट, स्पिन आणि जास्तीत जास्त काळ बॉल हवेत ठेऊन समोरच्याला मूर्खात काढण्याची कला... (मराठीत त्याला foxing म्हणतात) तो क्रिकेट च्या मैदानावर उधळतो...
वॉर्न चे बहुतांश बळी आहे असेच बॅट्समन ला मूर्ख बनवून मिळवलेले आहेत ... बॅट्समन ला माहीत असतं बॉल ऑफ स्टंप वर आहे...
बॅकफूटवर खेळून कट करता येईल पण हवेत तरंगणारा बॉल चा मोह सुटता सूटत नाही आणि तो पुढे येऊन भिरकवण्याचा प्रयत्न करतो बॉल मारण्यात यशस्वी झाला तर सिक्स ची शाश्वती नव्हती चुकून ताकद कमी पडून बॉल फक्त उंच गेला तर??? झेलबाद होऊ.. यातून सही सलामत सुटले ते फक्त भारतीय फलंदाज...
एक दुसरा प्रकार आहे माईक गॅटिंग आणि अँड्र्यू स्ट्राऊस वाला...
लेग स्टंप(किंवा डावखुऱ्या बॅट्समन च्या ऑफ स्टंप) बाहेर पाचव्या सहाव्या स्टंप वर बॉलिंग करायची बॅट्समन ला अस वाटू द्यायचं की वळून वळून किती वळेल बॉल आपण सहज पॅडिंग करून ब्लॉक करू, असा आत्मविश्वास निर्माण होईल इतका बॉल बाहेर टाकायच ... आणि एकदा का बॉल जमिनीवर पडला की फिरकी घेत दांडी उडल्यावर बॅट्समन चा आपण मूर्ख ठरलो अश्या अविर्भावत ला चेहरा जगाला दाखवायचा....
आठवा गॅटिंग चा चेहरा... स्ट्राऊस चा दोनदा बकरा केला वॉर्न ने एकदा इंग्लंड मध्ये एकदा ऑस्ट्रेलियात!!!
ऑस्ट्रेलिया च्या मातीतच अडम झाम्पा ती चुणूक दाखवतो पण त्यालाही अजून संघात आपली जागा स्थिर करता आलेली नाही!!!😢😢😢
हे या काळात कोणी करताना दिसत नाही सगळयांना मेंडीस, सुनील नारायण, सॅम्युअल बद्री यांची भुरळ पडते... क्लासिकल लेग स्पिन दिसणं दुर्मिळ झालंय...😢😢😢
- हर्षद मोहन चाफळकर , पुणे
११०४२०२११३५०