काही दिवसांपूर्वी स्त्री जातक कन्सलटेशन ला आल्या होत्या..
लग्नाला चार वर्षे होऊनही अजून संतती होत नाही जरा पत्रिका बघून सांगा कधी होईल??
मी म्हटलं मला नवरा बायको दोघांचे बर्थ डिटेल्स लागतील...
त्या स्त्रीने डिटेल्स दिले. दोघांच्या पत्रिका तयार केल्या त्या खालील प्रमाणे...
ठीक आहे..
मी विचारलं "दोघांचे मेडिकल रिपोर्ट नॉर्मल आहेत का?"
"हो" स्त्री उत्तरली..
"बरं मग शेवटचा चान्स कधी घेतला?"- माझा प्रश्न
दोन महिन्यांपूर्वी- उत्तर
"मग?"
"नाही राहिलं"
ठीक आहे आता मी ज्योतिषी म्हणून पत्रिका बघतो...
💠 मुलाच्या पत्रिकेत संतती कारक गुरू पंचमात आहे पण, नीच राशीत आहे😢
💠नवरा बायको दोघांच्या पत्रिकेत कुटुंब स्थानात शनी आहे😢
💠 मुलाचा पंचमेश शनी आणि मुलीचा पंचमेश गुरू दोघेही केतू च्या युतीत आहेत..
💠 संतती व्हायची म्हणजे पहिल्यांदा शुक्राणू तपासला पाहिजे.. तो शुक्र ग्रहावरून बघावा लागेल.. मुलाचा शुक्र कृतिका नक्षत्रात तिसऱ्या चरणात आहे. कृतिका अतिशय उष्ण दाहक नक्षत्र आहे. मुलीचा शुक्र सिंह या अग्नी राशीत नपुंसक बुधच्या युतीत आहे.
💠 संतती चा कारक गुरू मुलाच्या पत्रिकेत नीच राशीत आहे, मुलीचा गुरू उच्च राशीत पण केतू च्या युतीत आहे..
💠 मुलाच्या पत्रिकेत ला मिथुनेचा मंगळ पौरुषत्वाला फारसा उपयोगाचा नाही..
मे 2025 पर्यंत गुरू वृषभेत आहे, जो मुलाला पाचवा आणि मुलीला पहिला आहे म्हणून मे 2025 पर्यंत एक शेवटचा नैसर्गिक चान्स घ्या अन्यथा सरळ IVF चा मार्ग धरा असा सल्ला दिला
- हर्षद मोहन चाफळकर,
ज्योतिष विशारद, वडगांव शेरी
३१०१२०२५१९००