सुप्रभात!!
बऱ्याच दिवसांपासून मनात असलेली आणि काही केल्या मुहूर्त न लागलेली #अष्टविनायक_यात्रा काल पूर्ण झाली..
म्हणजे या यात्रेसाठी मी #जून2023 पासून प्रयत्नात होतो.. पण काही ना काही कारणास्तव ती पुढे जात होती..
खरं तर अष्टविनायक ही दोन दिवसात होणारी यात्रा आहे पण त्यासाठी सुद्धा निश्चित असे नियोजन आणि वेळेचे बंधन असावे लागते..
आम्ही सौ. तृप्ती वाघूलकर ( Trupti Mahamuni ) यांच्या श्रीकृष्ण महामुनी ट्रॅव्हल्स तर्फे अष्टविनायक यात्रा केली..
पहिल्या दिवशी पहाटे साडे चार वाजता चा पहिला पिक अप घेऊन पुण्यातून सकाळी सहा वाजता आम्ही बाहेर पडलो.. सगळ्या प्रवासी सहकाऱ्यांनी दिलेल्या वेळा पाळल्यामुळे ट्रिप पूर्व नियोजनानुसार झाली..
सकाळी साडेसात ला #मोरगाव गणपती चे दर्शन, सकाळ ची श्रीगणेशाची आरती, यात्रापुर्ती चा संकल्प, सकाळ चा नाष्टा करून आम्ही सिद्धटेक च्या दिशेने निघालो.. प्रत्येक अष्टविनायक क्षेत्री अगदी मनापासून दर्शन झाले जणू काही ही तो श्रींची इच्छाच...
पहिल्या दिवशी मोरगाव, #सिद्धटेक, #थेऊर चे दर्शन घेऊन रांजणगाव च्या अलीकडे दुपारच्या भोजनासाठी थांबलो.. पुढे #रांजणगाव चा महागणपती चे दर्शन झाल्यावर #लेण्याद्री च्या गिरिजात्मकाचे दर्शन घेऊन आम्ही रात्री नऊ च्या सुमारास #ओझर मुक्कामी पोहोचलो...
दुसऱ्या दिवशी सकाळी ओझर गणपती चे दर्शन घेऊन आधी #पाली मग #महड असा प्रवास केला. विशेष म्हणजे विनायकी चतुर्थी असून देखील अगदी सहज दर्शन झाले.. महड क्षेत्री दर्शन करून आम्ही पुन्हा मोरगाव कडे निघालो कारण संकल्प करतानाच तो मोरगाव क्षेत्री मयुरेश्वराचे दर्शन घेऊन पूर्ण करू असा संकल्प केला होता...
या सगळ्या प्रवासात खरी दाद द्यायला हवी ती आमच्या टूर मॅनेजर तृप्ती ताईंना..
✅वेळेची शिस्त
✅उत्तम नियोजन
✅नियोजनाची अंमलबजावणी
तृप्ती ताईंनी पहिल्या दिवशी लेण्याद्री सहित पाच गणपतींचे दर्शन घडवून सुद्धा एकाही यात्रेकरू च्या चेहऱ्यावर प्रवासाचा शीण जाणवला नाही उलट एक प्रकारचे समाधान होते...
तृप्ती ताईंच्या संपूर्ण अष्टविनायक यात्रा नियोजनात वेळच्या वेळी चहा, नाष्टा, सुग्रास जेवण, श्री गणेशाचे मनोभावे दर्शन व्हावे याचा विचार केलेला असतो...
एवढंच नाही तर मोरगाव ला पहिल्या दिवशी केलेला यात्रेचा संकल्प पूर्णत्वास नेण्याचा त्यांचा अट्टाहास असतो.. महड ते मोरगाव प्रवास करून मोरगावी मयुरेश्वराचे दर्शन घेतल्यावर जसं यात्रेकरूंच्या चेहऱ्यावर समाधान असते तसंच तृप्ती ताईंच्या चेहऱ्यावर वेगळंच समाधान असते...
माझ्या सत्तर वर्षांच्या वडिलांचे अनेक वर्षांपासून चे अष्टविनायक दर्शनाची मनोकामना पूर्ण केल्याबद्दल मी सौ. तृप्ती महामुनी ताई, श्रीकृष्ण महामुनी यात्रा कंपनी, आमच्या यात्रेचे सारथी श्री. संजय शेळके यांचे मनापासून आभारी आहे.🙏🙏🙏
- हर्षद मोहन चाफळकर ( ह मो चा )
वडगावशेरी, पुणे